Current Affairs February 2017 Part- 2
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹'फोर्ब्ज'च्या यादीत आलोक राजवाडे
पुण्यातील युवा रंगकर्मी आणि प्रयोगशील अभिनेता-दिग्दर्शक आलोक राजवाडे याचे नाव प्रतिष्ठेच्या 'फोर्ब्ज इंडिया' मासिकात झळकले आहे. 'फोर्ब्ज इंडिया थर्टी अंडर थर्टी' अंतर्गत जगभरात विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत 'आश्वासक ३०' युवक-युवतींना या विशेष यादीमध्ये स्थान देण्यात येते. त्यामध्ये २७ वर्षीय आलोकचा समावेश झाला आहे. सलग द ुसऱ्या वर्षी पुणेकर तरुण 'फोर्ब्ज'मध्ये झळकला आहे.
देशातील युवा प्रतिभावान व आश्वासक युवकांच्या यादीमध्ये गेल्यावर्षी पुण्यातील तरुण रंगकर्मी निपुण धर्माधिकारी याचा समावेश झाला होता. निपुणनंतर आलोकच्या रुपाने देशातील नाट्य चळवळीतील आश्वासक तरुण म्हणून पुन्हा पुण्यातील कलाकाराची निवड झाली आहे. संगीत, क्रीडा, रंगभूमी, ई-कॉमर्स, साहित्य, कायदा अशा विविध क्षेत्रातील ३० व र्षांखालील युवकांचा या यादीमध्ये समावेश असतो. पुरुषोत्तम स्पर्धा, आसक्त व नाटक कंपनी या संस्थांच्या माध्यमातून आलोक प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत आहे. 'सायकल' या एकांकिकेसह 'गेली एकवीस वर्षे', 'आषाढस्य प्रथम दिवसे' ही नाटके तसेच 'विहीर' या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याचे कौतुक झाले आहे. 'मी गालिब' या नाटकातून त्याने दिग्दर्शनातही पाऊल टाकले आहे.
'दहा दिवसांपूर्वी माझ्या� ��ी संपर्क साधण्यात आला होता. त्यानंतर ही यादी जाहीर झाली. देशातील विविध ३० प्रकारात एका तरुणाची निवड केली जाते. भारतातून नाटकसाठी माझी निवड झाली आहे. फोर्ब्जच्या यादीत नाव आल्याचा आनंद नक्कीच आहे,' अशी भावना आलोकने मटाशी बोलताना व्यक्त केली.
नाटकातील कामामुळे माझे नाव समाविष्ट केले आहे. नाटक ही समूह कला असल्याने त्यामध्ये माझ्या एकट्याचे योगदान नाही. आसक्त व नाटक कंपनी या स� �स्था तसेच सर्व सहकारी यांच्यामुळेच हे होऊ शकले. नाटकासाठी अनेकांना एकाचवेळी एकत्र यावे लागते. नाटकाचे काम चित्रपटासारखे नसते. या यशामागे सर्वांचा सहभाग व सहकार्य आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹अंदमान-निकोबारला धावणार रेल्वे
अंदमान आणि निकोबारमध्ये २४० किमीचा ब्रॉड गेज रेल्वेमार्ग उभारण्यास रेल्वेने हिरवा झेंडा दाखवला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात दिगलीपूर आणि पोर्ट ब्लेय� �� यांना पुलाने जोडले जाणार असून हा द्वीपसमूह प्रथमच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे.
🔹बेरोजगारी वाढल्याची सरकारची कबुली
🔹भारतीय वंशाच्या शिल्पकाराला इस्राईलचा प्रतिष्ठेचा पुरस्कार
🔹उत्तेजकसेवनाला लगाम घालण्यात 'नाडा'ला यश
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या शेवटच्या सैनिकाचे निधन
🔹टी-२० सामन्यात मोहीतने झळकवले त्रिशतक
अमेरिकन क्षेपणास्त्रांच्या वर्चस्वास चीनचे आव्हान
• जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील निशा पाटील हिला 2016चा राष्ट्रीय "वीरबाला' पुरस्कार जाहीर झाला
• केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन किमान नऊ हजार रुपये मिळणार
• भारत पुढील सात वर्षांत हवाई क्षेत्रातील जगातील तिसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ बनणार आहे
🔹2040 मध्ये भारत अमेरिकेला टाकणार मागे
क्रयशक्तीच्या आधारे बनणार जगातील दुसऱया क्रमांकाची अर्थव्यवस्था
🔹देशातील 23 रेल्वे स्थानकांचा विकास : प्रभू
पुणे, ठाण्यासह मुंबईतील चार स्थानकांचा समावेश
🔹वेतन कायद्यातील सुधारणांना मंजुरी
जुन्या नोटांचा वापर रोखणारे विधेयक मंजूर
🔹माउंट एव्हरेस्टवर मिळणार फ्री वायफाय
🔹"ग्रीन कार्ड'च्या अटी आणखी कठोर होणार
🔹आशिया, युरोप, आफ्रिकेत "ड्रॅगन'चा पदरव...
सध्या आकारण्यात येणारे शुल्क
(१ जानेवारी ते ३१ मार्च २०१७पर्यंत)
(*पूर्वी या व्यवहारांसाठी एक टक्का शुल्क आकारण्यात येत असे.)
🔹ED प्रमुखांना 2 वर्षांचा स्थिर कार्यकाळ
🔹2018 पर्यंत सर्व ग्रामपंचायतींत इंटरनेट कनेक्टिव्हिटी
🔹राजस्थान सरकार नव्य� �ने इतिहास लिहिणार
🔹'डिस्कव्हरी'चा नवीन क्रीडा वाहिनीसह भारतात विस्तार
राज्याच्या अर्थसंकल्पीय निधीत 20 टक्के कपात
वृद्धिदर अनुमान घटवून केले 6.9 टक्के -
* नोटाबंदीमुळे देशातील आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने रिझर्व्ह बँकेने वृद्धिदर अंदाज घटवला
🔹फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, स्नॅपडीलचा जीएसटी कर प्रणालीला विरोध
🔹व्हेकेशनसाठी भारतीयांची न्यूयॉर्क शहराला पसंती !
व्हेकेशनसाठी न्यूयॉर्क शहरातील पर्यटन क्षेत्राला सर्वाधिक जास्त भारतीयांनी पसंती दाखविली आहे.
🔹अंतराळात जाणारी तिसरी महिला ठरणार शॉना पांड्या
🔹फ्रान्सच्या अणुऊर्जा प्रकल्पात स्फोट
फ्रान्सच्या एका अणुऊर्जा प्रकल्पात स्फोट झाला असून या स्फोटात काही जण ज� ��मी झाल्याचे समजते.
🔹विस्थापितांचे प्रश्न सोडवण्यासाठी समिती
🔹गुगलच्या मदतीने पुणे बनणार वाय-फाय सिटी
🔹देशातील पहिला स्टीलचा जलतरण तलाव औरंगाबादेत
ओझोन फिल्टरेशनने होणार पाणी स्वच्छ
पारंपरिक पद्धतीचे फिल्टिरेशन प्लांट बाद करून या जलतरण तलावात आधुनिक ओझोन पद्धीने पाण्याची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यासाठी ब्लिचींग पावडरची गरज राहणार नसून ओझोन जनरेटरच्या मदतीने हा पूल तयार करण्यात येणार आहे. या पूलाच्या एका बाजूने पाणी ओझोन फिल्टरेशन प्लांटकडे जाते. पंपाच्या मदतीने हे पाणी एका फिल्टरमध्ये नेले जाणार असून त्या त कचरा आणि अन्य वस्तू अडकतील. त्यातून हे पाणी पुढे सरकल्यावर ओझोन जनरेटरकडे जाणार आहे. त्यातून हे पाणी स्वच्छ होत पुन्हा तलावात येणार आहे.
संपूर्ण पुलावर छत, जिमचीही सोय
जलतरण तलावावर पूर्णपणे बंदिस्त छत राहणार आहे. त्यामुळे येथे दिवसभर सराव करणे शक्य होणार आहे. ऑलिंपिकच्या मोजमापासह तयार होणाऱ्या या पूलमध्ये परिसरातून धूळ येण्याचे काम शिल्लक राहणार नाही. याशिवाय येथे ज� ��मची सोयही करण्यात आली असून त्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार असणार आहे. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्नानगृह आणि शॉवर येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्पर्धा लक्षात घेता येथे रेफ्री आणि प्रशिक्षकांच्या बसण्याची स्वतंत्र सोय करण्यात येणार आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹पहिल्या घरासाठी मिळणार 2.4 लाखांची सवलत
केंद्र सरकारने 21 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (पीएमएवाय) � �ोन नवीन अनुदान योजनांची घोषणा केली होती. सरकारच्या या योजनेमुळे नवीन घर घेणार्यांना फायदा होणार आहे. योजनेनुसार घर खरेदीदाराला त्याच्या उत्पन्नाच्या आधारे अनुदान मिळणार आहे.
पहिल्यांदा घर घेणार्याला 2.40 लाखांची सवलत मिळणार आहे. वार्षिक उत्पन्न 18 लाख असणार्यांना आणि पहिल्यांदा घर घेणार्यांना ही सवलत मिळणार आहे. याआधी ही सवलत फक्त 6 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना च मिळत होती. आता ती मर्यादा वाढवण्यात आली आहे. या योजनेनुसार सरकार गृहकृजावरील व्याजावर अनुदान देणार आहेत. याशिवाय 15 वर्षांच्या गृहकर्जाच्या कालावधीसाठी हो योजना लागू होती. आता 20 वर्षांच्या गृहकर्जासाठी ही सवलत देण्यात येणार आहे.
पंतप्रधान आवास योजनेतंर्गत व्याजावर मिळत असलेले अनुदान हे प्राप्तिकरमध्ये मिळणाऱ्या सवलती व्यतिरिक्त असणार आहे. हुडको आणि नॅशनल हाऊसिंग बँक (� �नएचबी) यांच्यावर अनुदान देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आतापर्यंत कमी उत्पन्न असलेल्या 18 हजार लोकांना एकूण 310 कोटींचे अनुदान दिले आहे. आता या नव्या निर्णयामुळे मध्यम उत्पन्न लोकांना दिलासा मिळणार आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹माझ्या अंतराळयात्रेचे वृत्त चुकीचे : शावना पंड्या
कॅनडामधील शावना पंड्या (वय 32) हिची सिटिझन सायन्स ऍस्ट्रोनॉट कार्यक्रमाअंतर्गत अवकाशमोहिमेमध्ये निव� �� झाल्याचे वृत्त चुकीचे असल्याचा खुलासा शावनाने फेसबुक पोस्टद्वारे केला आहे.
गुरुवारपासून शावना पंड्याची अवकाशमोहिमेसाठी निवड झाल्याचे वृत्त पसरले होते. या पार्श्वभूमीवर तिने फेसबुक पोस्टद्वारे खुलासा केला आहे. तिने म्हटले आहे की, "तुम्हा साऱ्यांच्या शुभेच्छांबद्दल आभार. गेल्या 24 तासांत माध्यमांमध्ये वृत्त पसरले आहे. त्यामध्ये काही चुकीची माहिती देण्यात आली आहे. त्या� �ाबत मला खुलासा करावासा वाटतो. सिटिझन सायन्स ऍस्ट्रोनॉट कार्यक्रमासंदर्भात कोणतीही नवी घोषणा झालेली नाही. या कार्यक्रमात 24 तासांपूर्वी मी सहभागी होण्याची शक्यता होती. मात्र आता या कार्यक्रमात इतर सदस्यांपेक्षा माझा सहभाग होण्याची शक्यता खूप कमी आहे. कॅनडातील अवकाश संस्थेपक्षा माझे काम वेगळे आहे. मी त्यांचे प्रतिनिधीत्व करत नाही. कॅनडातील अवकाश संस्थेतील अवकाशयात्रींच्य� �� निवडीची प्रक्रिया सुरू असून या वर्षी अंतिम होईल. मी या निवडप्रक्रियेत सहभागी नाही. मी सध्या इतर कोणत्याही संस्थेशी संलग्न नाही.' असा खुलासा करत "माझ्यासंदर्भात जी काही माहिती देण्यात येत आहे, ती चुकून देण्यात येत आहे', असे शावनाने स्पष्ट केले आहे.
"काही लेखांमध्ये मी न्यूरोसर्जन असल्याचे चुकून म्हटले आहे. मी यापूर्वी फार कमी काळ न्यूरोसर्जनचे प्रशिक्षण घेतले होते. मात्र, मा� �्याकडे जनरल प्रॅक्टिसचा परवाना आहे', असा खुलासाही तिने केला आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹विराटचा द्विशतकांचा चौकार
बांगलादेशविरुद्ध कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहलीने धावांचा पाऊस पाडत खणखणीत द्विशतक ठोकलं आहे. विराटने २३९ चेंडूत आपलं द्विशतक पूर्ण केलं. दरम्यान, क्रिकेटच्या इतिहासात लागोपाठ चार मालिकांमध्ये चार द्विशतक ठोकण्याचा विक्रम आता विरा� �च्या नावावर नोंदवला गेला आहे.
विराटच्याआधी सर डॉन ब्रॅडमन आणि राहुल द्रविड यांनी लागोपाठ तीन कसोटी मालिकांमध्ये द्विशकतं ठोकली होती. विराटने लागोपाठ चार मालिकांमध्ये द्विशतकांचा चौकार ठोकून या दोन्ही महान फलंदाजांना मागे टाकले आहे.
भारताकडून सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सहा द्विशतकं झळकावली आहेत. राहुल द्रविडच्या नावावर पाच द्व� �शतकं आहेत तर विराटच्या नावावर आता चार द्विशतकांची नोंद झाली आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹न्यूझीलंडच्या किना-यावर ४०० हून अधिक व्हेल मृतावस्थेत
न्यूझीलंडच्या किना-यावर शुक्रवारी पहाटे ४०० हून अधिक व्हेल मृतावस्थेत आढळल्या. आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात व्हेल समुद्र किना-यावर आल्याची ही पहिलीच घटना आहे. गुरूवारी रात्री न्यूझीलंडच्या गोल्डन बे किना-यावर शेकडोंनी व्हेल मासे � �ले होते. या व्हेल माशांना समुद्रात सोडण्यासाठी सुरक्षारक्षक धावून आले. मेहनत घेऊन शक्य असेल तितक्या व्हेल माशांचे प्राण वाचवण्यासाठी हे रक्षक धडपडत होते पण त्यांच्या हाती निराशाच आली.
न्यूझीलंडच्या गोल्डन बे किना-यावर पहिल्यांदाच असे विदारक दृश्य पाहायला मिळाले. या किना-यावर एक दोन नाही तर तब्बल चारशे व्हेल मृतावस्थेत आल्या होत्या. किना-यावर लांबपर्यंत या मृत व्हेल माशा ंचा खच पडला होता. या व्हेलचे प्राण वाचवण्याचे तटरक्षक दलाने खूप प्रयत्न केले पण त्यांना समुद्रात परत पाठवण्यात अपयश आले. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात व्हेल मृतावस्थेत या किना-यावर आल्या. गोल्डन बे किनारा उथळ आहे. त्यातून अहोटीमुळे या व्हेलना परत जाता आले नाही, त्यामुळे व्हेल मृत्यूमुखी पडल्या.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹गावांना डिजिटल साक्षर बनविणार सरकार
केंद्रीय मंत्रिमंड ळाने 2351.38 कोटी रुपयांच्या पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता मोहिमेला मंजुरी दिली आहे. याद्वारे मार्च 2019 पर्यंत 6 कोटी ग्रामीण कुटुंबांना डिजिटल रुपाने साक्षर बनविले जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. याद्वारे 6 कोटी ग्रामीण कुटुंबांना डिजिटल रुपाने साक्षर बनविण्याचे लक्ष्य आहे. ही योज ना अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याद्वारे 2017-18 च्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणेच्या अनुरुप आहे. ही योजना जगाच्या सर्वात मोठय़ा डिजिटल साक्षरता कार्यक्रमांपैकी एक असेल असे वक्तव्यात म्हटले गेले.
योजनेंतर्गत आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 25 लाख लोकांना प्रशिक्षित केले जाईल. 2017-18 मध्ये 275 लाख आणि 2018-19 साली 3 कोटी लोकांना प्रशिक्षण दिले जाईल. सर्व क्षेत्राच्याा लेकांना या योजनेचा लाभ म� �ळावा यासाठी अडीच लाख ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी 200 ते 300 उमेदवारांची नोंदणी केली जाईल.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹हाशिम अमलाचा रेकॉर्ड, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतकं
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम अमलाने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतकं पूर्ण केली आहेत. श्रीलंकेविरूद्ध सुरू असलेल्या वन-डे सामन्यात त्याने 154 धावा फटकावल्या. अशी कामगिरी करणारा तो जगातील सातवा फलंदा� �� बनला आहे. त्याच्या 154 धावांच्या जोरावर आफ्रिकेने श्रीलंकेला 385 धावांचं आव्हान दिलं आहे.
सर्वाधिक शतक झळकावण्याच्या यादीत भारतीय दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर १00 शतकांसह अव्वल स्थानावर आहे. अमलाने येथे श्रीलंकेविरुद्ध पाचव्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावताना ही कामगिरी केली. या शैलीदार फलंदाजाने १00 कसोटी सामन्यांत २६ आणि १४५ वनडे सामन्यात २४ शतके ठोकली आहेत.
अमला आधी तेंडुलकर (१00 शतके), आॅस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग (७१), श्रीलंकेचा कुमार संगकारा (६३), दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस (६२) आणि श्रीलंकेचा माहेला जयवर्धने (५४) आणि वेस्ट इंडीजचा ब्रायन लारा (५३) यांनी ही कामगिरी केली आहे. या यादीतील फक्त अमलाच सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेचा डिव्हिलियर्स (४५ शतके) आणि भारताचा कर्णधार विराट कोहली (४३) हेदेखील याा यादीत स्था न मिळवण्याच्या स्थितीत आहेत. अमलाने वनडेतील २४ वे शतक पूर्ण करताना आपला सहकारी डिव्हिलियर्सशी बरोबरी साधली. वनडेत सर्वाधिक शतके तेंडुलकर (४९), पाँटिंग (३0), सनथ जयसूर्या (२८), कोहली (२७) आणि संगकारा (२५) यांच्या नावावर आहे.
नागालँडमधील महिला-विरोधक
पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांचे हक्क दडपणे हे काही नवीन नाही. भारतातील सर्व प्रांतांत हे थोड्याबहुत प्रमाणात आजही चालते . नागालँडमधील सध्याची परिस्थिती ही त्याची नवी आवृत्ती आहे. प्रथा आणि परंपरांच्या नावाखाली स्त्रियांचे मूलभूत हक्क उघडपणे नाकारले जातात व त्यासाठी राज्यघटनेतील तरतुदींचा स्वतःच्या सोयीप्रमाणे अर्थ लावला जातो.
राज्यघटनेतील कलम 371(अ) अन्वये 'नागालँडमधील प्रथा-परंपरा यांना बाधक ठरतील अशा तरतुदी भारतीय संसद करू शकत नाही. त्यासंबंधी काही तरतुदी करावयाच्या असतील तर प्� �थम तशी मागणी तेथील जनतेने करावयास हवी'. या तरतुदींचा अर्थ लक्षात घेता पुढील काही प्रश्न उद्भवतात -
1) स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजचे स्वरूप हे 1993 मध्ये झालेल्या 73 व्या घटनादुरुस्तीनुसार आहे. या संस्था 'आधुनिक' आहेत. असे असताना या संस्थांचे प्रथा-परंपरांशी काय संबंध आणि या आधुनिक संस्थांच्या नियमावलीत बदल केल्याने 'प्राचीन' प्रथा-परंपरांना कोणती बाधा येते?
� �2) नागालँडमध्ये 'ग्राम विकास मंडळा'त स्त्रियांना आरक्षण आहे. असे असताना पंचायत पातळीवरील आरक्षण, कोणत्या आधारावर नाकारले जात आहे?
3) 371 (अ) अन्वये स्थानिक जनतेने मागणी केल्यास संबंधित प्रश्नाबाबत हस्तक्षेप करण्याचा अधिकार भारतीय संसदेला आहे. असे असताना आरक्षणाची मागणी करणार्या महिलांचा समावेश 'स्थानिक जनतेत' होत नाही का?
4) 371 (अ) अन्वये, भारतीय संसदेला कायदा � �रण्याबाबत प्रतिबंध करण्यात आलेला आहे, मात्र आरक्षण हे अनुच्छेद 243 अनुसार प्रत्यक्ष राज्यघटनेत नमूद आहे. तो संसदेने केलेला कायदा नाही. तरीही घटनात्मक तरतुदीचे अवमूल्यन का केले जात आहे?
5) भारतीय राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला काही मूलभूत हक्क दिलेले आहेत व सर्वोच्च न्यायालयाने विविध खटल्यांत निकाल देताना राज्यघटनेतील इतर कोणत्याही तरतुदीपेक्षा मूलभूत हक्कांचे रक� ��षण करण्याच्या बाजूने निकाल दिले आहेत. असे असताना स्त्रियांना आरक्षण नाकारणे हे अनुच्छेद 14 (कायद्यासमोर समानता), अनुच्छेद 15 (लिंगाधारित भेदभावास प्रतिबंध), अनुच्छेद 21 (सन्मानाने जगण्याचा अधिकार) यांचे उल्लंघन नाही का? सदर प्रकरण न्यायालयात गेल्यास काय निर्णय लागेल हे पुरेसे स्पष्ट आहे. त्यामुळे न्यायालयीन निर्णयामुळे येणारी कटुता टाळून, काळाची पावले ओळखून स्त्रियांना सन्मा� �ाने त्यांचे अधिकार बहाल करून नागालँडने नवीन पायंडा पाडावा हेच योग्य.
सोलार एक्स्प्रेस
शास्त्रज्ञ दळण-वळणाची वेगवान साधणे विकसित करण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतात. याचाच भाग म्हणून बुलेट ट्रेनबरोरच जेट अथवा सुपर सॉनिक विमानांची कल्पना सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
एक इनोवेटिव्ह फर्म म्हणून प्रसिद्ध असलेली कॅनडाची 'चार्ल्स बॉम्बार्डियर'कडून मना� ��्या गतीपेक्षा वेगाने धावणारी एक्स्प्रेस विकसित करण्याच्या कल्पनेवर काम करत आहे. भविष्यातील ही 'सोलार एक्स्प्रेस' जमिनीवरून अंतराळात फेरी मारेल. या एक्स्प्रेसला पृथ्वीवरून मंगळावर पोहोचण्यासाठी फक्त 2 दिवस लागणार आहेत, तर काश्मीरहून कन्याकुमारीला जाण्यास केवळ 1.20 सेकंदाचा वेळ लागेल.
तसे पाहिल्यास सोलार एक्स्प्रेस म्हणजे सिलिंडरची एक मालिकाच असेल. प्रत्येक सिलिंडरची क मीत कमी लांबी 50 मीटर असेल. एक ट्रेनमध्ये असे 6 सिलिंडर असतील. याची संपूर्ण लांबी 300 मीटरपर्यंत होईल. प्रत्येक सिलिंडर 4 भागांत विभागलेला असेल. ही विशेष सोलार एक्स्प्रेस संचलित करण्यासाठी प्रामुख्याने गुरुत्वाकर्षणाचा उपयोग होणार आहे.
गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने ही सोलार एक्स्प्रेस पृथ्वी आणि अंतराळात फेरी मारेल. इंजिनिअर ओलिविएर पॅरल्डी नावाच्या कंपनीने या इंजिनचे डिजाई� �� तयार केले आहे.
'मिल्की वे'मध्ये 'शांत' कृष्णविवर
प्रत्येक आकाशगंगेच्या मध्यभागी एक कृष्णविवर असते. आपल्याही 'मिल्की वे' नावाच्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी एक कृष्णविवर आहे. मात्र, अशा सक्रिय कृष्णविवरांशिवायही काही शांत कृष्णविवरे असू शकतात. आपल्या आकाशगंगेच्या टोकाला अशाच प्रचंड वस्तुमानाच्या कृष्णविवराचे अवशेष सापडले आहेत. अतिशय वेगाने फिरणार्या वैश् विक मेघाच्या विश्लेषणातून हे शक्य झाले आहे.
तुलनेने शांत कृष्णविवरे शोधली जाण्याची ही सुरुवात आहे. अशी लधावधी कृष्णविवरे आकाशगंगेत असून आतापर्यंत फार थोडी गवसली आहेत. कृष्णविवरांमधून प्रकाश बाहेर पडत नसल्याने ती सापडणे अवघड असते. काही ठिकाणी कृष्णविवरांचे इतर परिणाम दिसत असतात, त्यामुळे त्यांचे अस्तित्व शोधणे शक्य असते.
जपानमधील कियो विद्यापीठाचे मास� ��या यामादा व टोमाहारू ओका यांनी एएसटीई ही चिलीतील दुर्बीण व नोबेयामा रेडिओ वेधशाळेतील 45 मीटरची रेडिओ दुर्बीण यांचा वापर करून, सुपरनोव्हाचे अवशेष 'डब्ल्यू 44' च्या आजूबाजूला असलेल्या रेणवीय ढगाचे निरीक्षण केले. ते अवशेष 10 हजार प्रकाशवर्षे दूर आहेत. सुपरनोव्हा स्फोटातून किती ऊर्जा रेणवीय वायूत गेली, याचा अदमास घेणे हा याचा उद्देश होता, पण त्यातून 'डब्ल्यू 44' च्या कडेला एक कृष्ण� ��िवर असल्याचे निष्पन्न झाले आहे.
संजीव सन्याल
प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ संजीव सन्याल यांची अर्थ व्यवहार विभागाचे प्रधान आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली.
कोलकात्यातील जन्म आणि शालेय शिक्षण असलेल्या सन्याल यांनी नवी दिल्लीतील श्री राम महाविद्यालयातून कला विषयात स्नातक पदवी प्राप्त केली. दिल्ली विद्यापीठातील एक आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातील दोन पदव्युत्� �र पदवीप्राप्त ते आहेत. जागतिक वित्तीय बाजाराबाबतचे धडे त्यांना येथूनच मिळाले. अमेरिकेतील भारतीय राजकारणी बॉबी जिंदाल यांचे सहविद्यार्थी म्हणून त्यांना काही जण ओळखतात.
सन्याल हे डॉईश या जागतिक स्तरावरील आघाडीच्या बँकेचे 2008 पर्यंत व्यवस्थापकीय संचालक राहिले. आंतरराष्ट्रीय वित्तीय बाजारपेठेत कार्य केल्याचा गेल्या दोन दशकांचा त्यांचा अनुभव आहे. क्षेत्रीय अर्थव्य� ��स्था वाढीबद्दलचे तब्बल दशकभराचे निरीक्षण त्यांनी आपल्या विविध लिखाणांतून नोंदवून ठेवले आहे. दावोसमध्ये जागतिक आर्थिक मंचाद्वारे 2010 मध्ये झालेल्या कार्यक्रमात जागतिक तरुण नेतृत्व म्हणून त्यांना गौरविले गेले आहे. राजकारण, क्रीडा, व्यापार, कला आदी क्षेत्रांत 40 वयोगटातील व्यक्तींनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा असा गौरव करण्यात आला.
शहरी मुद्यांवरील त्य� ��ंनी केलेल्या अर्थविषयक कार्यासाठी सन्याल यांना 2007 मध्ये 'एसनहोवर' शिष्यवृत्ती दिली गेली. 2014 मध्ये झालेल्या जागतिक शहर परिषदेत त्यांना सिंगापूर सरकारने सन्मानित केले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर भिन्न क्षेत्रात एखाद्या भारतीयाने केलेल्या कार्याची दखल घेऊन दिला जाणारा 'इंटरनॅशनल इंडियन अॅचिव्हर' पुरस्काराचे ते जुलै 2014 मध्ये मुंबईत झालेल्या साहित्यविषयक कार्यक्रमात मा नकरी ठरले होते.
भारतातील आविष्कार या सूक्ष्म भांडवल उभारणी कंपनीचे सल्लागार असलेले सन्याल यांनी सिंगापूर, ब्रिटन येथे प्राध्यापकीय जबाबदारी हाताळली आहे. भारताबरोबरच जॉन टेम्पलटन फाऊंडेशन या आशिया-पॅसिफिकमधील वित्तसंस्थेचेही ते सल्लागार राहिले आहेत. भारतातील विविध राज्यांमध्ये साकारले जाणार्या प्रकल्पांसाठी हरितविषयक अभ्यास गटाचे ते संचालक राहिले आहेत.
'लॅण्ड ऑफ सेव्हन रिव्हर्स : अ ब्रीफ हिस्टरी ऑफ इंडियाज जिओग्राफी', 'द इंडियन रेनायसेन्स : इंडियाज राइज आफ्टर अ थाऊजंड इअर्स ऑफ डिक्लाइन', 'द इन्क्रेडिबल हिस्टरी ऑफ इंडियाज जिओग्राफी', 'द ओशन ऑफ चर्न' आदी भारताच्या इतिहासावरील त्यांचे पुस्तकरूपी लिखाण प्रसिद्ध आहे.
तूर्त सुब्रमण्यन यांच्यानंतर सन्याल हेच अर्थ खाते तसेच देशाचे दुसरे आर्थिक सल्लागार असतील. प्रत्� ��क्षात 8 महिन्यांनंतर सुब्रमण्यन यांच्या जागी सन्याल यांची देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली तर आश्चर्य वाटायला नको.
आयआयएम'च्या दहा नव्या संचालकांची नियुक्ती
केंद्र सरकारने दहा 'आयआयएम'च्या संचालकांची नियुक्ती केली असून, यामध्ये आयआयएम बंगळूर'चाही समावेश आहे. प्रो. जी. रघुराम हे आयआयएम बंगळूरचे संचालक असतील, असे कार्मिक मंत्रालयाने आपल्या आ� ��ेशात म्हटले आहे. रघुराम हे 1985 पासून आयआयएम-अहमदाबादमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. सप्टेंबर 2013 ते डिसेंबर 2015 या काळात त्यांनी अधिष्ठाता म्हणूनही काम केले. रघुराम हे सध्या 'आयआयएम अहमदाबाद'मध्ये 'पब्लिक सिस्टीम ग्रुप'चे अध्यक्ष आहेत.
आयआयएम रांची आणि रोहतकच्या प्रमुखपदी अनुक्रमे शैलेंद्र सिंह आणि धीरज शर्मा यांची, तर आयआयएम रायपूरच्या प्रमुखपदी भरत भास्कर यांच� �� नियुक्ती करण्यात आली आहे. आयआयएम संबळपूरची धुरा महादेव प्रसाद जैस्वाल, तर आयआयएम नागपूरची सूत्रे एल. एस. मूर्ती हे सांभाळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पुढील 5 वर्षांसाठी या नियुक्त्या केल्या आहेत.
जगातील सर्वात लांब कार
अमेरिकेतील एकाने जगातील सर्वात लांब कार तयार केली आहे. सामान्य कारची लांबी सरासरी 16 फूट असते आणि ती 4 चाकांवर धावते, � �रंतु या कारची लांबी 110 फूट असून, तिला तब्बल 24 चाके आहेत. ही कार रस्त्यावर धावताना वेगळेपणामुळे प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते.
कॅलिफोर्नियाचे कस्टम कार गुरू जे आर्हबर्ग यांना कारच्या रुपड्यात बदल करून ते अधिक उठावदार करण्याचा छंद आहे. त्यांनीच ही कार तयार केली. 'द अमेरिकन ड्रीम' असे या कारचे नाव आहे. जगातील सर्वांत लांब लिमोजिन म्हणून ती ओळखली जाते. या कारची 'गिनीज बुक ऑफ व र्ल्ड रेकॉर्डस्'मध्ये नोंद झाली आहे. 27.1 कोटी रुपये मोजण्याची तयारी असेल, तर तुम्ही ही कार आपल्या घरी आणू शकता. या कारच्या लांबी आणि विशेष रचनेमुळे ही कार लोकांना आकर्षित करते.
कारची वैशिष्ट्ये -
* लांबीशिवाय ऐषोआराम, स्टाईल आणि सुरक्षेबाबत ती इतर अव्वल कार्सच्या तोडीस तोड आहे.
* या कारमध्ये शाही बाथटब, डायव्हिंग बोर्ड, किंग साईज वॉटर बेड, लिव्हिंग रूम आणि 2 चालकांच्या खो� �्या आहेत.
* विशेष म्हणजे या कारला सरळ किंवा मधून दुमडून चालविता येऊ शकते.
* ही कार समोरून किंवा मागूनही चालविता येते. ही कार अनेक चित्रपटांत चमकली आहे.
* या कारचे 2 भाग होऊ शकतात तसेच हे 2 भाग ट्रकमध्ये घालून एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेता येतात.