Skip to content Skip to sidebar Skip to footer

Current Affairs May 2017 Part - 2

🔰 Current Affairs Marathi 🔰

🔹फिफाच्या जागतिक क्रमवारीत 21 वर्षांनंतर पहिल्यांदाच 100 वे स्थान

    बहारदार कामगिरीच्या बळावर भारतीय फुटबॉल संघाने फिफाच्या जागतिक क्रमवारीत 21 वर्षांनंतर पहिल्यांदाच 100 वे स्थान पटकावले आहे.

     आशियाई फुटबॉल महासंघाच्या क्रमवारीत भारतीय संघ 11 व्या स्थानावर आहे. ज्या पद्धतीने भारतीय संघात सुधारणा होत आहे, त्यामुळे मी समधानी असलो तरी आता जबाबदारी वाढली असल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेटियन यांनी दिली आहे. अ.भा. फुटबॉल महासंघाचे सचिव कुणाल दास यांनीही भारतीय संघाचे अभिनंदन करताना 2019 साली होणार्‍या आशिय ाई चषकासाठी पात्र ठरण्याचे टार्गेट ठेवावे, असे आवाहन केले आहे.

      आशियाई कप पात्रता फेरी स्पर्धेत भारताने म्यानमारवर 1-0 ने विजय मिळवला होता. 64 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारताने म्यानमारमध्ये विजय साजरा केला. त्यानंतर एका मैत्रीपूर्ण लढतीत कंबोडियावर 3-2 ने, तर दक्षिण आफ्रिकन देश असलेल्या प्युर्टो रिकोचा 4-1 ने धुव्वा उडवला होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹11 मे: राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस देशात साजरा


या निमित्ताने राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते अभिनव कल्पकता ठेवणार्या व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.

▪️11 मेला हा दिवस का साजरा केला जातो?

11 मे 1998 रोजी भारताने एरोस्पेस अभियंता आणि मृत माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान येथील भारतीय लष्कराच्या पोखरण चाचणी क्षेत्रात शक्ती-I या आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे पार पाडली. दोन दिवसानंतर लगेचच, पोखरण-II / ऑपरेशन शक्ती पुढाकारचा एक भाग म्हणून यशस्वीपणे आणखी दोन आण्विक चा चण्या घेतल्या. पूर्वी पोखरन-I हे 1974 साली 'स्माईलींग बुद्ध' क्षेपणास्त्राच्या सहाय्याने उडवण्यात आले होते. या चाचण्यांमुळे भारत राष्ट्रांच्या 'न्यूक्लियर क्लब' मध्ये सामील होणारा सहावा देश ठरला आणि नॉन-प्रोलीफरेशन ऑफ न्यूक्लियर वेपन (NPT) तहामध्ये भागीदार नसलेला प्रथम देश बनला.

याशिवाय, याच काळात देशातच विकसित पहिले स्वदेशी विमान 'हंस-3' ने त्याचे पहिले उड्डाण बेंगळुरू येथे घेतले. हे विमान वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) च्या विमान नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज (NAL) ने विकसित केले होते.

तसेच 11 मे 1998 रोजी संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) कडून 'त्रिशूल' क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी पूर्ण केली गेली, जे नंतर भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेत समाविष्ट करण्यात आले. कमी पल्ल्याचे, जलद-प्रतिक्रिया देणारे, जमिनीवरून हवेत मारा करणारे (SAM) क्षेपणास्त्र 'त्रिशूल' हा भारतातील एकात्मिक ग ाइडेड क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचा एक भाग होता.

देशाच्या या प्रचंड यशानंतर, भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 11 मे हा दिवस 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस' म्हणून घोषित केला. भारतात 1999 सालापासून दरवर्षी तंत्रज्ञान विकास मंडळ (TDB) यांच्या नेतृत्वात हा दिवस साजरा केला जातो.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹2040 पर्यंत भारतात औषध प्रतिरोधी
क्षयरोग वेगाने वाढू शकतो

क्षयरोगाबाबत एका नव्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, पुढील दोन दशकात भारतात औषध प्रतिरोधी क्षयरोगाच्या प्रकरणात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज आहे, जर सध्याचे क्षयरोग व्यवस्थापन यंत्रणा बदलली नाही तर.

यानुसार, वर्ष 2040 पर्यंत सर्व क्षयरोग प्रकरणांमध्ये औषध प्रतिरोधी क्षयरोगाचे प्रमाण भारतात 12.4% असणार.

🔹अमेरिकेच्या फेडरल ऊर्जा संस्थेसाठी नील चटर्जी यांचे नामांकन

अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नील चटर्जी यांचे नामांकन फेडरल एनर्जी रेग्युलेटरी कमिशन (FERC) मधील मुख्य प्रशासकीय पदासाठी दिले गेले आहे. चटर्जी पदावर आल्यानंतर 30 जून 2021 पर्यंत FERC चे सदस्य असतील.

🔹ODI मध्ये जगात सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज: झुलन गोस्वामी

भारतीय महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी ही एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली आहे. गोस्वामीने आतापर्यंत 181 बळी घेतले आहेत. तिने 50 षटकांच्या सामन्यात फिझपॅट्रिकचा 180 बळींचा विक्रम मोडीला आहे.

🔹दक्षिण कोरियाचे नवे राष्ट्राध्यक्ष: मून-
जे-इन

दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्ष पदाची मून जे-इन यांनी शपथ घेतली आहे. ते देशाचे 19 वे राष्ट्राध्यक्ष आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सापडलेल्या पार्क गेऊन-हे यांच्याकडून त्यांनी पदभार घेतला आहे.

🔹प्रमुख पायाभूत सुविधा
क्षेत्रातील कामगिरी चा आढावा

देशाच्या विकासाच्या दृष्टीने तेल व नैसर्गिक वायू, ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जा आणि गृहनिर्माण क्षेत्रातील प्रमुख पायाभूत सुविधा क्षेत्रांतील प्रगतीचा आढावा घेण्यात आला आहे.
या दरम्यान स्पष्ट झालेल्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत -

प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेमधून आतापर्यंत दारिद्र्यरेषेखालील 1.98 कोटी कुटुंबांना लाभ झाला आहे. ऊर्जा क्षेत्रात गॅसचे योगदान 8% ने वाढले आहे. शहरी गॅस वितरण जाळयांतर्गत 81 शहरांना समाविष्ट करण्यात आले आहे.

ग्रामीण विद्युतीकरण कार्यक्रमांतर्गत एकूण 18,452 गावांपैकी 13,000 हून अधिक गावांचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. वर्ष 2016-17 मध्ये 22 लाख ग्रामीण दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना वीज जोडणी दिली गेली आहे आणि 40 कोटी हून अधिक LED दिवे वितरित केले गेले आहे. मे 2014 ते एप्रिल 2017 या काळात एकूण आंतर-प्रादेशिक प्रेषण क्षमतेत 41GW ची वाढ झाली आहे.

वर्ष 2016-17 मध्ये 24.5% च्या वाढीसह एकूण नवीकरणीय वीजनिर्मिती क्षमता 57GW वर पोहोचलेली आहे. सौरऊर्जा क्षमतेत 81% ने वाढ झाली आहे.

प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत, 2016-17 या आर्थिक वर्षात ग्रामीण भागात 32 लाखांहून अधिक घरे उभारली गेली आहेत.

🔹29 व्या भारत-इंडोनेशिया CORPAT ला सुरुवात

भारत-इंडोनेशिया CORPAT ची 29 वी मालिका 9-25 मे 17 दरम्यान आयोजित केली आहे. हा कार्यक्रम अंडमान व निकोबार च्या आदेशाखाली चालविला जाणार आहे. कार्यक्रम पोर्ट ब्लेअर येथे सुरु होऊन बेलवन, इंडोनेशिया येथे शेवट होणार. CORPAT दरम्यान नौदलाकडून सागरी व्यापार मार्ग सुरक्षीत केला जातो.

🔹चार स्वच्छ हिमालय मोहिमांचे उद्घाटन

विजय गोयल यांनी 9 मे 2017 रोजी
 भारतीय पर्वतारोहण प्रतिष्ठान (IMF) येथे सातोपंथ पर्वत (7075 मीटर) यासाठी चार 'स्वच्छ हिमालय' आणि एक 'वैद्यकीय पर्वतारोहण' मोहिमांना सुरुवात केली आहे. काश्मिर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेश येथे हिमालयीन स्वच्छता मोहिमा आणि 'वैद्यकीय पर्वतारोहण' या अभ्यासक्रमाला सुरुवात केली आहे.

🔹आयोवा विद्यापीठ आंध्रप्रदेशमध्ये मेगा
सीड पार्क उभारणार

अमेरिकेतील आयोवा स्टेट यूनिवर्सिटी आंध्रप्रदेशमध्ये मेगा सीड पार्क उभारणार आहे आणि त्यासंबंधी सहकार्य करार केला आहे. विज्ञान, कृषि आणि जीवनविज्ञान क्षेत्रात संशोधन आणि विकासास चालना देण्यासाठी हा करार झाला आहे.

🔹प्राचीन नद्यांसाठी MGNREGA निधीवर समितीचा आराखडा

प्राचीन नद्यांच्या पुनरुज्जीविकरणासाठी MGNREGA निधीची पूर्तता करण्यासाठी मार्ग शोधण्यासाठी जल, पर्यावरण व ग्रामीण विकास मंत्रालयातील सचिवांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने 48000 कोटी रुपयांचा MGNREGA निधि कसा वापरला जाऊ शकतो याविषयी आराखडा तयार केला आहे.

🔹ADB दक्षिण आशियासाठी दिल्लीत हब सुरू करणार

आशियाई विकास बँक (ADB) दक्षिण आशियासाठी नवी दिल्लीत आणि मध्य आशियासाठी कझाकिस्तानमध्ये क्षेत्रीय हब उभारत आहे. आशियाई विकास बँक (ADB) ही एक प्रादेशिक विकास बँक आहे, जिची स्थापना 19 डिसेंबर 1966 रोजी झाली. याचे फिलीपिन्स येथे मुख्यालय आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ADB दक्षिण आशियासाठी दिल्लीत हब सुरू करणार

आशियाई विकास बँक (ADB) दक्षिण आशियासाठी नवी दिल्लीत आणि मध्य आशियासाठी कझाकिस्तानमध्ये क्षेत्रीय हब उभारत आहे. आशियाई विकास बँक (ADB) ही एक प्रादेशिक विकास बँक आहे, जिची स्थापना 19 डिसेंबर 1966 रोजी झाली. याचे फिलीपिन्स येथे मुख्यालय आहे.

🔹नक्षलवादाशी लढा देण्यासाठी
' SAMADHAN ' कार्यधोरण तयार

केंद्रीय गृहमंत्रालयाने दहा नक्षलग्रस्त राज्यांमधील नक्सली घटनाचा अलीकडेच आढावा घेतला आहे. नक्षलवादाशी लढा देण्यासाठी गृहमंत्रालयाने "SAMADHAN/समाधान" कार्यधोरण तयार केले आहे.

धोरणाचे तत्व म्हणजे 'S' - स्मार्ट लीडरशिप, 'A'- अग्रेसिव्ह स्ट्रेटेजी, 'M'– मोटिवेशन अँड ट्रेनिंग, 'A'- एक्शनेबल इंटेलिजेंस, 'D'- डॅशबोर्ड-आधारित मुख्य परिणाम क्षेत्र आणि मुख्य कामगिरी सूचकांक, 'H'- हारनेसिंग टेक्नोलॉजी, 'A'- एक्शन प्लान फॉर इच थिएटर आणि 'N'- नो (वित्तपुरवठा बंद करणे).

धोरणामध्ये समाविष्ट बाबी

'SAMADHAN' धोरणामधून, नक्षली हिंसाचाराने प्रभावीत राज्यांना नक्षलवाद विरोधात मोहिमा राबवण्यास "मालकी हक्क" देण्यात येईल. शिवाय, त्यांच्या आर्थिक स्रोतांना "बंद" करण्यासाठी प्रभावी पावले उचलण्यात येणार आहे.
'A'- अग्रेसिव्ह स्ट्रेटेजी याला अनुसरून, विचारांमध्ये आक्रामकता, धोरणात आक्रमकता, सुरक्षा दलाच्या तैनातीत आक्रमकता, मोहिमांमध्ये आक्रामकता, विकास आणण्यामध्ये आक्रामकता, रस्त्याच्या बांधणीत आक्रमकता प्रदर्शित केली जाणार आहे.

राज्यांकडून चालवल्या जाणार्या नक्षलविरोधी मोहिमांमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे पूर्ण सहकार्य दिले जाईल.
याशिवाय, क्षेत्रात देखरेख ठेवण्याकरिता मानव-विरहित विमान यासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल.

▪️हे धोरण का महत्त्वाचे ठरते?

गेल्या दोन दशकांत देशात घडणार्या नक्षली हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अश्या घटनांमध्ये जवळपास 12 हजार नागरिकांनी प्राण गमावला आहे. त्यात 2,700 सुरक्षा दलांचे जवान आणि 9300 निष्पाप सर्वसामान्य लोकांचा समावेश आहे. अश्या गंभीर समस्येला तोंड देण्यासाठी देशात विविध पातळीवर अल्प, मध्यम आणि दीर्घकाल� �न धोरणाची गरज निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने हे धोरण महत्त्वाचे ठरते.

🔹पुणे येथे देशातील पहिल्या जैविक रिफायनरी प्रकल्पाचे उद्घाटन

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 8 मे 2017 रोजी महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील राहू गावात देशातील पहिल्या जैविक रिफायनरी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या प्रकल्पात कृषि जैवभारापासून इथेनॉलची निर्मिती केली जाणार आहे.

भात, गहू, कापूस, ऊस, मका यासारख्या कृषि उत्पन्नावर प्रक्रिया केल्यावर उरलेल्या कचर्यापासून मिळणारा जैवभार वापरून वर्षाला एक दशलक्ष लिटर इथेनॉलची निर्मिती करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे.

भारतात जैविक रिफायनरीचे महत्व
जैव-इंधन हा एक कमी-खर्चाचा आणि प्रदूषण-मुक्त पर्याय आहे. इथेनॉल हे सुद्धा एक जैव-इंधन आहे. वाढत्या प्रदूषणावर उपाययोजना म्हणून इथेनॉल मिश्रित पेट्रोल सरावात आणल्यामुळे उत्सर्जन पातळीवर नक्कीच प्रभाव पडतो.

या नव्या रिफायनरी प्रकल्पामुळे 20% इथेनॉल मिश्रण कार्यक्रमासाठी मार्ग तयार झाला आहे आणि त्यामुळे कच्च्या तेलाच्या आयातासंबंधी ओझे कमी होण्यास मदत होणार.

जैव-इंधनाबाबत देशातील धोरण
भारतामधील जैव-इंधनाबाबत धोरणात उचललेल्या पावलांचा अभ्यास पुढीलप्रमाणे क्रमबद्ध केला आहे. तो म्हणजे -

नोव्हेंबर 2012 मध्ये इथेनॉल मिश्रित इंधन वाटपाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली होती, ज्यामध्ये 5% इथेनॉलचे प्रमाण निश्चित करण्यात आले होते.

2 जानेवारी 2013 रोजी 'मोटर स्पिरीट कायद्यांतर्गत सूचित केले गेले की, पेट्रोकेमिकल मार्गाच्या समावेशासह सेल्युलोजिक आणि लिग्नोसेल्युलोजिक पदार्थासारखे अन्नपदार्थाचा भाग नसलेल्या पदार्थांचा वापर इथेनॉल निर्मिती करण्यासाठी त्यांची खरेदी करण्यासाठी परवानगी सरकारने तेल कंपन्यांना दिली होती.

2015 साली भारत सरकारने शक्य तितक्या राज्यांमध्ये इथेनॉलचे 10% या प्रमाणात मिश्रण वाटप करण्यास लक्ष्य करण्यासाठी तेल कंपन्यांना सूचित केले.

🔹UN-हॅबिटॅट अध्यक्षपदी भारताची एकमताने निवड

UN-हॅबिटॅट चे अध्यक्ष म्हणून भारताची एकमताने निवड करण्यात आली आहे. पदाची जबाबदारी दोन वर्ष सांभाळली जाईल. UN-हॅबिटॅट ही जगभरातील सामाजिक व पर्यावरणविषयक शाश्वत मानवी वसाहतींना प्रोत्साहन देणारी संयुक्त राष्ट्रसंघाची संघटना आहे आणि याची 1978 साली स्थापना झाली. भारत तिसर्यांदा (2007, 1988) या पदावर आले आहे.

🔹न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये कोंकणा सेनला पुरस्कार

वर्ष 2017 च्या 17 व्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल (NYIFF) येथे कोंकणा सेनशर्मा हिला "ए डेथ इन द गुंज" साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि "लिपस्टिक अन्डर माय बुरखा" साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दिला गेला आहे.
NYIFF चे आयोजन इंडो-अमेरिकन आर्ट्स कौन्सिलद्वारे दरवर्षी केले जाते.

🔹आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेचे बोधचिन्ह: "ऑलि"

भुवनेश्वर, ओडिशा मधील कलिंगा क्रिडामैदान येथे 6-9 जुलै 2017 या काळात आयोजित 2017 आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी बोधचिन्ह जाहीर झाले आहे. ऑलिव्ह रिडले या सागरी कासवाचे "ऑलि" असे या चिन्हाचे नाव ठेवण्यात आले आहे.

🔹इमॅन्युएल मॅक्रॉन यांची फ्रान्सचे
राष्ट्रा ध्यक्ष म्हणून निवड

7 मे 2017 रोजी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निर्णय जाहीर झाला. व्यावसायिक दृष्टीकोन असलेले इमॅन्युएल मॅक्रोन यांनी ही निवडणूक जिंकलेली आहे. त्यांनी मरिन ले पेन यांचा पराभव केला आहे. ते पदावर आल्यानंतर पुढील पाच वर्षांसाठी देशाचा कार्यभार सांभाळतील.

शिवाय 39 वर्षीय मॅक्रोन हे फ्रान्सचे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.

▪️ही निवडणूक का महत्त्वाची ठरते?

2017 च्या निवडणुकीत जर का मरीन ले पेन यांचा विजय झाला असता, तर कदाचित त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, फ्रान्सला युरोपियन संघातून बाहेर पडण्याबाबत त्यांच्या समर्थनाला वाचा फुटली असती.

अलीकडेच ब्रेक्जिटच्या प्रक्रियेतून ब्रिटन युरोपियन संघातून बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. जर कार फ्रान्सनेही याबाबत आपले मत दर्शवले असते तर युरोपियन संघाचे तुकडे पडण्याला नवे पर्व सुरू झाले असते.

▪️फ्रेंच सरकारची प्रणाली कश्याप्रमाणे
आहे?

फ्रेंच सरकारची प्रणालीमध्ये सरकारच्या राष्ट्राध्यक्षीय आणि संसदीय या दोन्ही प्रकारची वैशिष्ट्ये असल्यामुळे राजकीय शास्त्रज्ञ त्याला एक 'अर्धराष्ट्राध्यक्षीय प्रणाली' असे म्हणतात. फ्रेंच राष्ट्रपतींना इतर प्रगत लोकशाही असलेल्या देशांच्या नेत्यांच्या तुलनेत सर्वाधिक अधिकार दिले जातात.

फ्रेंच राष्ट्राध्यक्षांना सर्वोच्च कार्यकारी आधिकारीक आणि महत्त्वपूर्ण धोरण तयार करण्याचे अधिकार आहेत. शिवाय, फ्रेंच राष्ट्राध्यक्ष राज्य प्रमुख म्हणून देखील कार्य करतात आणि त्यांची लोकमान्यनुसार निवड केली जाते.

फ्रेंच राष्ट्राध्यक्ष पंतप्रधानांची नियुक्ती करतात, जे त्यांना त्यांच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यास आणि मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांच्या सहाय्याने नोकरशाहीचे व्यवस्थापन करण्यास मदत करतात.

फ्रेंच राष्ट्राध्यक्ष कोणत्याही वेळी संसदेचे विसर्जन करू शकतात आणि राष्ट्रीय राजनैतिकांमार्फत देखील विविध मार्गांनी कायदे तयार करू शकतात.

🔹जॉर्डन, अमेरिका यांच्याकडुन लष्करी
सराव आयोजित

जॉर्डन आणि अमेरिका यांनी त्यांच्या "इगर लायन" या वार्षिक लष्करी सरावाला 7 मे 2017 पासून (18 मेपर्यंत) सुरुवात केली आहे. यामध्ये 20 देशांनी भाग घेतला आहे. "इगर लायन" सरावाला 2011 सालापासून सुरुवात झाली आहे.

🔹'ओकिनोशिमा' बेटाला जागतिक वारसाचा दर्जा देण्याची शिफारस

UNESCO च्या सल्लागार मंडळाने जपानमधील ओकिनोशिमा बेटाला जागतिक वारसा सूचीत समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे.
हे बेट फुकुओका प्रांतातील केवळ पुरुषांसाठीचे प्राचीन धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते.

🔹साकिब मजीदला 2016 विस्डेनचा 'फोटोग्राफ ऑफ द इयर'

श्रीनगर येथील छायाचित्रकार साकिब मजीदला 2016 सालचा विस्डेन-MCC (मेलबर्न क्रिकेट काउन्सिल) क्रिकेट 'फोटोग्राफ ऑफ द इयर' सन्मान प्राप्त झाला आहे. मजीद हा प्रतिष्ठित सन्मान प्राप्त करणारा पहिला काश्मिरी आणि अतुल कांबळे नंतर दुसरा आशियाई खेळाडू ठरला आहे.

🔹IIT-M संशोधकांनी डाळिंब व हळ दीच्या अर्कापासून पांढरा प्रकाश निर्माण केला

IIT मद्रासमधील रसायनशास्त्र विभागाचे डॉ. विक्रम सिंह आणि सहयोगी प्रा. अशोक मिश्रा यांनी पांढर्या प्रकाशाच्या निर्मितीसाठी लाल डाळिंब आणि हळद या दोन नैसर्गिक उत्पादनापासून मिळालेल्या अर्काच्या मिश्रणाचा वापर केला आहे.

डॉ. सिंह यांना नैसर्गिक अर्काचा वापर करुन पांढरा प्रकाश निर्माण करण्याच्या त्यांच्या या कार्यासाठी 'BIRAC गांधीयन यंग टेक्नोलॉजिकल इनोव्हेशन (GYTI) अवॉर्ड 2017' प्राप्त झाला आहे.

ही प्रथमच अशी वेळ आहे की जेव्हा अगदी कमी किमतीत, नैसर्गिक खाद्यपदार्थाच्या अर्कापासून पांढरा प्रकाश निर्माण झाला आहे. यासंबंधी शोधनिबंध जर्नल सर्जिकल रीपोर्ट्स मध्ये प्रकाशित झाला आहे.

▪️प्रक्रियेसंबंधी

लाल डाळिंबामध्ये आढळणारी पॉलिफॅनॉल आणि एन्थॉकिसायनिन्स तत्व अनुक्रमे निळया आणि नारिंगी-लाल रंगाच्या प्रकाश तरंगी उत्सर्जित करतात तर हळदीमध्ये आढळणारे तत्व कर्क्युमिन हिरव्या रंगाच्या प्रकाश तरंगी उत्सर्जित करतात. लाल, निळा आणि हिरवा या प्रकाश किरणांच्या तरंगाचे मिश्रण पांढर्या प्रकाश तरंगांना उत्सर्जित करतो. याच ज्ञानाच्या आधारावर, डाळिंब व हळदीपासून मिळालेल्या अर्काच्या मिश्रणापासून पांढर्या प्रकाश किरणांच्या तरंगांना प्राप्त केले आहे.

🔹ग्रेट ब्रिटनने सुलतान अझलन शाह चषक जिंकले

ग्रेट ब्रिटन (UK) संघाने 6 मे 2017 रोजी मलेशियात झालेल्या सुलतान अझलन शाह चषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून विजेतेपद मिळवले आहे. तिसर्या स्थानी कांस्य पदक जिंकणारे न्यूझीलंड आहे. ही स्पर्धा 1983 सालापासून मलेशियात आयोजित केली जाणारी वार्षिक आंतरराष्ट्रीय पुरुष फिल्ड हॉकी स्पर्धा आहे. ही स्पर्धा खेळली � ��ात आहे.

🔹झारखंडने राज्यासाठी जानेवारी-डिसेंबर स्वरुपाचे वित्तीय वर्ष घोषित केले

ब्रिटिश राजवटीत 1867 साली भारतात लेखापरीक्षणासाठी एप्रिल-मार्च याप्रमाणे वित्तीय वर्ष म्हणून अंगिकारले गेले. मात्र जुलै 2016 मध्ये NITI आयोगाने स्थापन केलेल्या माजी मुख्य आर्थिक सल्लागार शंकर आचार्य यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आर्थिक वर्ष हे जानेवारी ते डिसेंबर याप्रमाणे, म्हणजेच दिनदर्शिका वर्षाला वित्तीय वर्ष � �्हणून, गृहीत धरावे, अशी शिफारस केलेली आहे.

या शिफारसीलाच अनुसरून, झारखंड सरकारने सर्व वित्तीय व्यवहारांसाठी राज्यात जानेवारी-डिसेंबर याप्रमाणे वित्तीय वर्ष अंगिकारल्याचा निर्णय जाहीर केला आहे.

झारखंड आधी, मध्यप्रदेश हे जानेवारी-डिसेंबर याप्रमाणे वित्तीय वर्ष अंगिकारणारे देशातील पहिले राज्य झाले आहे.

▪️हे पाऊल का महत्त्वाचे ठरते?

भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात कृषि क्षेत्राचा 15% हून अधिक वाटा आहे तसेच 58% हून अधिक ग्रामीण कुटुंब शेतीवर अवलंबून आहे. भारताच्या वर्षाऋतुनुसार, जर जून आणि सप्टेंबर या काळात दुष्काळ परिस्थिती उद्भवली असेल तर जानेवारी-डिसेंबर असे वित्तीय वर्ष असल्यास परिस्थितीशी सुयोग्य अर्थसंकल्प तयार करण्यास मदत होणार.

जानेवारी-डिसेंबर असे वित्तीय वर्ष असल्यास जर नोव्हेंबरमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले गेले तर, परिस्थिती आधी केल्या गेलेल्या आर्थिक तरतूदीमुळे कृषि-अर्थव्यवस्था आणि शेतकर्यांना मदत होणार.

🔹चहा मंडळाचे नवे चेअरमन: प्रभात कमल बेझबोरुह

प्रभात कमल बेझबोरुह (प्रथम गैर-IAS) यांची भारतीय चहा मंडळाच्या चेअरमन पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय चहा मंडळाची 1954 साली स्थापना करण्यात आली आणि याचे कोलकाता येथे मुख्यालय आहे.

🔹कॉफी मंडळाचे नवे चेअरमन: एम. एस. बोजे गौडा

एम. एस. बोजे गौडा यांची भारतीय कॉफी मंडळाच्या चेअरमन पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय कॉफी मंडळ 1942 साली स्थापन करण्यात आले आणि याचे मुख्यालय बंगुळुरू येथे आहे.

🔹जनुकीय बदल असलेल्या मोहरीच्या
व्यावसायिक वापरास मंजूरी

भारताच्या जनुकीय अभियांत्रिकी मूल्यांकन समितीने (GEAC) पर्यावरण मंत्रालयाच्या प्रस्तावाला मान्य करून जनुकीय बदल असलेल्या मोहरीच्या (GM मोहरी) व्यावसायिक वापरासाठी शिफारस केली आहे.

दिल्ली विद्यापीठाच्या सेंटर फॉर जेनेटिक मॅनिपुलेशन ऑफ क्रॉप प्लांट्स (CGMCP) ने GM मोहरी (ब्रॅसिका जुनसीया) हायब्रिड DMH-11 आणि पॅरेंटल इव्हेंट्स (वरुणा bn 3.6 आणि EH2 mod bs 2.99) चा वापर करण्यास पर्यावरण परवानगीसाठी अर्ज सादर केला होता.

▪️GM पीक म्हणजे काय?

जनुकीय बदल असलेले पीक म्हणजे जनुकीय अभियांत्रिकी तंतरच्या सहाय्याने पिकच्या DNA संरचनेत बदल घडवलेले पीक होय. हे वाण नैसर्गिकरित्या होत नसतात. पिकांमध्ये विशिष्ट कीटक, रोग किंवा विरोधी पर्यावरण परिस्थिती अश्या विरोधात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी किंवा पिकाच्या पोषक तत्वांचे प्रमाण सुधारण्यास हा बदल असतो.

▪️GM पीकाबाबत समज व गैरसमज

दिल्ली विद्यापीठाने तयार केलेल्या GM मोहरीची जमिनीवरील चाचणी यशस्वी झाली आहे.

वाढती लोकसंख्या बघता कृषि उत्पादनात वाढ करणे महत्त्वाचे झाले आहे. मात्र पारंपरिक संरचनेनी पीक असल्याने पिकांवर पर्यावरणातील इतर घटकांचा पडतो आणि उत्पादन कमी होते. त्यामुळे पिकांमध्ये अनैसर्गिकरित्या बदल घडवून आणून मानवाची अन्नाची समस्या दूर करणे आवश्यक असल्याचे दिसून आले आहे.

परंतु, ही प्रक्रिया अनैसर्गिक असल्यामुळे त्याचा पर्यावरणातील इतर घटकांवर परिणाम होऊ शकतो आणि त्याचे पुष्कळशे पुरावे देखील उपलब्ध आहेत. GM पीक वापरल्यास एकाच प्रकारची रसायने वापरणे भाग पडते त्यामुळे त्या शेती जवळील इतर जमीनपट्ट्यावरील पिकांवर त्यांचा विपरीत परिणाम होतो. परिणामी इतर शेतकरीही GM पीक घेऊ लागतो. जगात एकाच जाती� �े पीक असणे हे अत्यंत धोक्याचे सिद्ध होऊ शकते. शिवाय GM पिकामुळे पिकाचा 'सेंद्रिय' दर्जा संपुष्टात येईल. GM मोहरी ही आयुर्वेदामध्ये मोहरीचा अधिक वापर असल्याने नव्या वाणाचे गुणधर्म अजूनही ज्ञात नाही.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भीष्मराज बाम यांचे निधन

राज्याचे माजी पोलिस महासंचालक व जेष्ठ क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम यांचे दिनांक 12 मे 2017 शुक्रवारी दुपारी महात्मानगर येथे व्याख्यान देत असताना ह्दयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाले. उद्या, शनिवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

पोलिस महासंचालकपदी असताना त्यांना मानाचे राष्ट्रपती पदक देखील मिळाले होते. आपली कार्य क्षमता सिध्द करण्य़ासाठी योगाचा कसा वापर केला जाऊ शकतो याचे अनेक क्षेत्रातील व्यक्तींना त्यांनी धडे दिले होते. त्यांनी क्रीडा मानसोपचार या विषयात प्राविण्य मिळवले होते. ते नियमीतपणे विविध खेळाच्या खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करीत असत. मानसिक तणाव, सांघीक व्यवस्थापन, यांच्या मार्गदर्शनावर त्यांचे प्रभुत्व होते इंडीयन ऑलिम्पिक टीमचे ते मार्गदर्शक होते. त्र्यंबकेश्वर येथे असलेल्या योग विद्या गुरुकुल येथे येणाऱ्या साधकांना ते वेळोवेळी मार्गदर्शन करीत असत. त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून प्रथम श्रेणीत बीएची पदवी मिळवली होती. अॅप्लाइड मॅथेमॅटीक्स अॅन्ड स्टॅटीस्टीक हा त्यांचा विषय होता. ते १९६३ साली डे प्युटी सुप्रिटेंन्डेट ऑफ पोलिस या पदावर ते राज्याच्या पोलिस दलात दाखल झाले १८ वर्ष त्यांनी प्रत्यक्ष पोलिस दलात काम केले त्यानंतर ग्रह़मंत्रालयात त्यांनी डेप्युटेशनवर बदली झाली. पोलिस दला तर्फे प्रकाशित होणाऱ्या दक्षता मासिकाचे ते दोन वर्ष संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्याच बरोबर राष्ट्रीय स्तरावरच्या वर्तमानपत्रात सातत्याने ते लिखाण करीत होते. त्यांनी क्री� �ा मनसोपचार या विषयावर अनेक पुस्तके लिहीली मना सज्जना आणि मार्ग यशाचा , विजयाचे मानसशासत्र ही सर्वात जास्त खपलेली पुस्तके होय. त्यांचे Winning habit हे पुस्तक हिंदी मराठी, तामिळ, पंजाबी भाषांमध्ये भाषांतरीत झाले आहे. सध्या ते नॅशनल रायफल असोसिएशन या संघटनेचे प्रेसिडेन्ट म्हणून कार्यरत होते.

त्यांनी अनेकदा सार्वजनीक ठिकाणी क्रीडा मानसोपचार या विषयावर खंत व्यक्त केली होती ते म्हणायचे शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीविषयी समाजात जागृती निर्माण झालेली नाही. परदेशात शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीला प्राधान्य दिले जाते. आपल्याकडे मात्र याबाबत उदासीनता दिसून येते. बलवान खेळाडूही कधी कधी नैराश्याला सामोरा जातो. विश्वविजेत्या खेळाडूंनाही कधी कधी ऑलिम� �पिकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये अंतिम फेरीत अशा नैराश्यापोटी पराभव स्वीकारावा लागला आहे.

आपल्याकडे शारीरिक तंदुरुस्ती व खेळ यांची गल्लत केली जात आहे. शारीरिक तंदुरुस्ती म्हणजेच खेळ असा गैरसमज आहे. मात्र ही दोन्ही क्षेत्रे वेगळी आहेत. खेळातील यशाकरिता शारीरिक तंदुरुस्तीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. बारावी इयत्तेपर्यंत खेळ हा विषय सक्तीचा केला पाहिजे. सूर्यनमस्कार, योगासने आदी व्यायामप्रकार अनिवार्य केले पाहिजेत. हंगेरीत शाळा व � ��हाविद्यालयांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती न राखणाऱ्यांना कडक शिक्षा केली जाते. त्यांनी राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सुमा शिरुर, कविता राऊत, यांच्या सारख्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना प्रशिक्षण दिले होते.

🔹फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी इमॅन्यूएल मॅकराँ

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी इमॅन्युएल मॅकराँ हे निवडून आले आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार मेरी ले पेन यांचा पराभव करून मॅकराँ यांनी प्रचंड मताधिक्यांनी विजय मिळविला आहे. या निवडीबरोबरच फ्रान्सच्या इतिहासातला सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष होण्याचा मान मॅकराँ यांना मिळाला आहे.

फ्रान्समध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या होत्या. त्यात इमॅन्युएल मॅकराँ यांनी मोठा विजय मिळवला होता. त्यामुळे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मॅकराँ निवडून येतील असा कयास वर्तविला जात होता. . काल झालेल्या मतमोजणीत मॅकराँ यांनी ८० लाख ५० हजार २४५ मतं म्हणजे एकूण मतांच्या ६१.३ टक्के मतं मिळवत राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली. माझ्या विजयाने फ्रान्सच्या समृ� ��्ध इतिहासामधील एका नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे. हा विजय एक आशा आणि विश्वास बनावा, अशी अपेक्षा मॅक्रॉन यांनी विजयानंतर व्यक्त केली.

३९ वर्षीय मॅकराँ यांनी २००४ मध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून त्यांच्या कारकीर्दीची सुरूवात केली होती. त्यानंतर २००७ मध्ये अर्थमंत्रालयाच्या समित्यांचं काम त्यांनी पाहिलं होतं. २०१२ ते २०१४ या कालावधीत राष्ट्राध्यक्षांचे आर्थिक सल्लागार म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली होती. नंतर २०१४ ते २०१६ या काळात ते फ्रान्सचे अर्थमंत्री होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹स्थावर गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल

देशातील स्थावर मालमत्ता (रिअल इस्टेट) आणि गृहनिर्मिती उद्योगात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी ५० टक्के गुंतवणूक महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांत एकवटली आहे. उद्योगांची शिखर संस्था असणाऱ्या 'असोचेम'ने केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे.

'कन्स्ट्रक्शन अँड रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट : स्टेट लेव्हल अॅनालिसिस' या अहवालात नमूद केल्याप्रमाणे सध्या देशात तीन हजार ४८९ प्रकल्पांच्या माध्यमातून १४.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिअल इस्टेट आणि गृहनिर्मिती उद्योगात करण्यात आली आहे. हा अहवाल डिसेंबर २०१६पर्यंतच्या माहितीवर बेतलेला आहे,' असेही 'असोचेम'तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. एकू� �� गुंतवणुकीपैकी २५ टक्के वाटा महाराष्ट्राचा असून, त्या पाठोपाठ उत्तर प्रदेश, गुजरात (प्रत्येकी १३ टक्के), कर्नाटक (१० टक्के) आणि हरयाणा (९ टक्के) यांचा क्रमांक लागतो. 'केंद्र आणि राज्य सरकारांनी रिअल इस्टेट क्षेत्राला पूरक ठरणाऱ्या सर्व प्रकारच्या परवानग्या देण्यासाठी एक खिडकी योजना सादर केली. त्यामुळे वेळेत आणि खर्चात बचत झाली. त्याचा सकारात्मक परि� �ाम म्हणून रिअल इस्टेट क्षेत्राच्या विकासदर वाढला,' अशी माहिती 'असोचेम'चे महासंचालक डी. एस. रावत यांनी दिली.

'असोचेम'च्या 'इकॉनॉमिक रिसर्च ब्युरो'ने केलेल्या अभ्यासात देशात सध्या सुरू असणारे ९० टक्के नवे प्रकल्प दहा राज्यांमध्ये केंद्रीत झाल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. विकासदराचा विचार करता २०१०मध्ये या क्षेत्राने सर्वोच्च १३.५ टक्के दर नोंदवला. मात्र, ही वाढ टिकवण्यात अपयश आले. २०१३मध्ये क्षेत्राचा विकासदर घसरून आठ टक्क्यांवर आला. २०१४मध्ये पुन् हा त्यात तीन टक्क्यांची वाढ झाली आणि २०१५मध्ये पुन्हा घसरण नोंदवण्यात आली. २०११ ते २०१६ या कालावधीत ओदिशाने सरासरी ३७ टक्के गुंतवणूक आकर्षित करण्यात यश मिळवले. त्या पाठोपाठ उत्तर प्रदेश (९ टक्के), महाराष्ट्र (३ टक्के), केरळ (१.६ टक्के) आणि आंध्र प्रदेश (१.४ टक्के) यांचा क्रमांक लागतो. उर्वरित राज्यांमध्ये नकारात्मक वाढ नोंदवण्यात आली.

प्रकल्प विलंबात पंजाब अव्वल

गृहनिर्माण आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रकल्प वेळेत पूर्ण न होण्यामध्ये पंजाबने 'अव्वल' स्थान पटकावले आहे. पंजाबमध्ये एक प्रकल्प सरासरी ४८ महिने विलंबाने पूर्ण होत असल्याचे आढळून आले आहे. त्यापाठोपाठ तेलंगण (४५ महिने), पश्चिम बंगाल, ओदिशा आणि हरयाणा (प्रत्येकी ४४ महिने) यांचा क्रमांक लागतो.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹निवड

▪️FIFA प्रशासन समितीचे प्रमुख: न्या. मुदगल

न्यायमूर्ती (निवृत्त) मुकुल मुदगल यांची बहरिनची राजधानी मनामा मध्ये होणार्या जागतिक फुटबॉल संचालक मंडळाच्या 67 व्या परिषदेत FIFA च्या प्रशासन समितीचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. मुदगल यांची मिगेल मदुरो यांच्या जागेवर नियुक्ती झाली आहे.

▪️भारताचे संरक्षण सचिव: संजय मित्रा

रस्ते वाहतूक आणि महामार्ग सचिव संजय मित्रा यांची नियुक्ती भारताच्या संरक्षण सचिव पदावर करण्यात आली आहे. ही नियुक्ती दोन वर्षासाठी आहे. मित्रा यांची नियुक्ती 24 मे 2017 रोजी कार्यकाळ पूर्ण होणार्या जी. मोहनकुमार यांच्या जागेवर झाली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹निवडणूक आयोगाने 'राष्ट्रीय संपर्क केंद्र' सुरू केले

भारतीय निवडणूक आयोगाने टोल-फ्री क्रमांक 1800111950 यासह राष्ट्रीय संपर्क केंद्र सुरू केले आहे. या टोल-फ्री क्रमांकावर इंग्रजी किंवा हिंदीमध्ये मतदानासंबंधी कोणतीही चौकशी किंवा तक्रारीसाठी संपर्क साधू शकणार.

🔹कृषी मंत्रालयाकडून 'ई-कृषि संवाद' चा शुभारंभ

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंग यांनी 11 मे 2017 रोजी 'ई-कृषि संवाद' या इंटरनेट-आधारित यंत्रणेचा शुभारंभ केला आहे. यामधून शेतकरी आणि शेतीक्षेत्राशी संबंधित भागधारकांसमोर येणार्या समस्यांवर उपाय उपलब्ध करून देणार.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी मून

10 वर्षांपासूनचे कॉन्झर्वेटिव्ह सरकार संपुष्टात

दक्षिण कोरियात मंगळवारी झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मुख्य विरोधी पक्षाचे उमेदवार मून जाए-इन यांना विजय प्राप्त झाला आहे. निवडणुकीनंतर वाहिन्यांच्या सर्वेक्षणात त्यांना 41.4 टक्के आणि त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी उमेदवार होंग जून-प्यो यांना 23.3 टक्के मिळाल्याचे म्हटले गेले होते. निवडणुकीच्या रिंगणात एकूण 13 उमे दवार होते.

मून यांच्या विजयासोबतच दक्षिण कोरियात एक दशक जुने कॉन्झर्वेटिव्ह सरकार सत्तेवरून पायउतार झाले आहे. नवे राष्ट्राध्यक्ष पार्क ग्यून यांची जागा घेतील. ग्यून यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे महाभियोगाद्वारे संसदेने पदावरून बडतर्फ केले होते. मून बुधवारी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. यानंतर ते पंतप्रधानांची नियुक्ती करतील. पंतप्रधान आणि त्यांच्या मंत� �र्यांच्या नियुक्तीसाठी संसदेची मंजुरी घ्यावी लागणार आहे.

उत्तर कोरियन शरणार्थींचे पुत्र
अण्वस्त्रधारी उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियादरम्यानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पार पडली आहे. देशाचे मतदार ग्यून यांच्याकडून सत्तेचा दुरुपयोग आणि कथित लाच घेतल्याप्रकरणी संतप्त झाले होते. डाव्या विचारसरणीशी जवळीक साधणारे 64 वर्षीय मून जाए-इन हे मानवाधिकार विषयक प्रकरणांचे मुख्य वकील आहेत. ते उत्तर कोरियातून आलेल्या शरणार्थ� �ंचे पुत्र आहेत. 1970 च्या दशकात विद्यार्थीदशेत असताना तत्कालीन राष्ट्राध्यक्ष पार्क चुंग यांच्याविरोधात आंदोलन चालविल्याने ते काही काळ तुरुंगात देखील गेले
होते.

निवडणूक लढण्यापासून मागे हटले
संयुक्त राष्ट्र महासचिव पदावरून पायउतार झाल्यानंतर बान की मून यांनी आपण राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविणार असे जाहीर केले होते. तेव्हा तत्कालीन राष्ट्राध्यक्ष पार्क यांच्यावर चाललेला महाभियोग आणि सातत्याने घटत्या लोकप्रियतेमुळे बान की मून यांना विजय अशक्यप्राय वाटल्याने त्यांनी निवडणूक न लढण्याची घोषणा केली?

काय बदलेल ?

उत्तर कोरियासोबतचा तणाव दूर करण्यासाठी चर्चा सुरू केली जावी असे मून यांना वाटते.

मून हे उत्तर कोरियाचा दौरा करून जगाला आश्चर्याचा धक्का देऊ शकतात.

सॅमसंग आणि ह्यंgडाईसारख्या कंपन्यांनी नवे रोजगार निर्माण करण्यासाठी पुढे यावे.

उत्तर कोरियाप्रकरणी चीन, अमेरिकेच्या पुढाकाराची प्रतीक्षा होणार नाही.

उत्तर कोरियाचा सहकारी चीनसोबत नाते सुधारण्याचा प्रयत्न होईल.

उत्तर कोरियाविरोधातील वल्गना बंद करण्यास ट्रम्प यांना सांगण्याची शक्यता.

अमेरिकेने क्षेपणास्त्र रक्षण प्रणाली तैनात करावी की नाही याचा निर्णय नवे सरकार घेणार.

अमेरिकेच्या मुक्त व्यापार करार संपुष्टात आणण्याच्या इशाऱयाला तोंड द्यावे लागणार.

🔹5व्या पिढीच्या विमानासाठी भारत-रशिया एकत्र

अब्जावधी डॉलर्सचा असणार प्रकल्प संरक्षण सहकार्यातील मैलाचा दगड ठरणार करार

जवळपास वर्षभराच्या विलंबानंतर भारत आणि रशिया लवकरच 'मैलाचा दगड' ठरू शकणाऱया करारावर स्वाक्षरी करू शकतात. या करारामुळे पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानाचे (एफजीएफए) आरेखन आणि त्याच्या संयुक्त विकासाच्या अब्जावधी डॉलर्सच्या प्रकल्पाला मूर्त रुप मिळू शकते. लढाऊ विमानाच्या आरेखन विषयक कराराला अंतिम रुप देण्याचे काम झाले असून लवकरच इतर महत्त्वाचे मुद्दे सोडव� ��ले जातील असे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आले.

विस्तृत आरेखन विषयक करारावर लवकरच स्वाक्षरी होणार असून हा व्यवहार मैलाचा दगड ठरेल. चालू वर्षाच्या दुसऱया सहामाहीत यावर स्वाक्षरी होईल असे रशियासोबत या प्रकल्पासाठी बोलणी करणाऱया एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले. दोन्ही देश या प्रगत लढाऊ विमानाचे सहविकासक असतील आणि भारताला याचे तंत्रज्ञानविषयक हक्क बरोबरीचे असतील असा दावाही या अधिकाऱयाने केला.

भारत याचा सहविकासक असल्याने या प्रकल्पात तंत्रज्ञान हस्तांतरणाचा मुद्दा उद्भवत नाही. भारताला समान हक्क असून याद्वारे भविष्यात निर्मिती सुरू ठेवता येईल या अधिकाऱयाने म्हटले. या प्रकल्पाच्या वाटाघाटीदरम्यान भारताने सर्व आवश्यक कोड्स आणि महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाची उपलब्धता मिळविण्यावर भर दिला. यामुळे लढाऊ विमानाच्या आधुनिकीकरणाची गरज पूर्ण करण्यास मदत होणार आहे.

मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडून या प्रकल्पासाठी हिरवा कंदील दर्शविण्यात आल्यानंतर दोन्ही देशांनी चर्चेचा आढावा घेतला होता. यानंतरच्या काळात अनेक मुद्दे मार्गी लागले असून आयपीआर आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाचा विषय दोन्ही देशांनी सोडविला आहे. एफजीएफए प्रकल्पाकरता 2007 साली भारत आणि रशियाने एका करारा वर स्वाक्षरी केली होती.

डिसेंबर 2010 मध्ये भारताने लढाऊ विमानाच्या प्राथमिक आरेखनासाठी 295 दशलक्ष डॉलर्स देणे मान्य केले होते. यानंतरच्या वर्षांमध्ये वाटाघाटीतील अनेक अडथळे दूर करण्यात आले आहेत. तर मार्च महिन्यात दोन्ही देशांनी दोन महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी केली होती. यात सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमानांची दीर्घकाळ देखभाल तसेच तांत्रिक सहाय्य पु रविण्याचे रशियाने मान्य केले होते.

🔹औद्योगिक उत्पादन निर्देशांकात घसरण

देशातील औद्योगिक विकासात चांगली वाढ झाली आहे. सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, 2016-17 मधील औद्योगिक विकास 5 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी यात 3.4 टक्क्यांनी वाढ झाली होती. नवीन आर्थिक बेस ईअरच्या आधारे उत्पादन निर्देशांक मार्च महिन्यात 2.7 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा निर् देशांक 5.5 टक्क्यांवर होता.

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने नवीन सीरिजमुळे उत्पादनाचे आकडे अधिक सहजपणे समजण्यास मदत होईल असे म्हटले. नवीन सीरिजमध्ये खाण क्षेत्राचा हिस्सा 14.16 टक्क्यांवरून 14.37 टक्क्यांवर पोहोचला आहे. वीज उत्पादन क्षेत्राचा हिस्सा 10.32 टक्क्यांवरून घसरत 7.99 टक्क्यांवर पोहोचला. उत्पादन क्षेत्रासाठी नवीन सीरिजमध्ये वाढ करण्यात आ� �ी आहे. 75.59 टक्के असणारे हे क्षेत्र 77.63 टक्क्यांवर गेले आहे. हा निर्देशांक तयार करण्यासाठी पूर्वी 2004-05 या वर्षाचा आधार घेण्यात येई. मात्र आता हे वर्ष बदलण्यात आले असून 2011-12 वर्षाचा आधार घेण्यात येईल. नवीन सीरिजमध्ये 809 उत्पादनांचा समावेश आहे, तर पूर्वी 620 उत्पादने होती.

🔹रेल्वे स्थानकांवर उभारणार 1,000 जनऔषधी केंद्रे

नागरिकांना स्वस्त आणि गुणवत्तापूर्व औषधे उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकार रेल्वे स्थानकांवर जनऔषधी केंद्रे स्थापन करणार आहे. देशातील प्रमुख 1 हजार रेल्वे स्थानकांवर ही केंद्रे उघडण्यात येणार असून त्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल. सध्या वैद्यकीय दुकानांत उपलब्ध असणाऱया ब्रॅन्डेड औषधांच्या तुलनेत या औषधांची किंमत साधारण 200 टक्क्यांनी कमी असते.

जेनेरिक औषधे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनऔषधी केंद्रांची संख्या वाढविण्याचे काम सुरू आहे. देशात 1,320 जनऔषधी केंद्रे सुरू करण्यात आली. ही संख्या 3 हजारापर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या जनऔषधी केंद्रांवरून होणाऱया व्यवहाराचे प्रमाण वर्षअखेरीस 20 पटीने वाढण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. जनऔषधी � ��ेंद्रे सुरू करण्यासाठी 19 राज्यांबरोबर करार करण्यात आला आहे. गैरसरकारी केंद्रांना 1 हजार केंद्रे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. खासगी पातळीवरून लोकांकडून अर्ज मागविण्यात आले असून 30 हजार लोकांनी अर्ज केले आहेत. हे केंद्र सुरू करण्यासाठी फार्मसी पदवीची आवश्यकता आहे, असे रसायन आणि खते मंत्री अनंत कुमार यांनी म्हटले.

जनऔषधी केंद्र सुरू करण्यासाठी सरकारकडून मदत करण्यात येते. या विक्रेत्यांना सरकारकडून 20 टक्के कमिशन देण्यात येते. जर कोणताही विपेता प्रति महिन्याला एक लाख रुपयांच्या औषधांची विक्री करत असेल तर त्याला 20 हजार रुपये मिळतात.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹स्नॅपडील-फ्लिपकार्ट अधिग्रहण लवकरच?

भारतीय ई-व्यापार क्षेत्रातील कंपनी स्नॅपडीलची विक्री करण्यास कंपनीचे संस्थापक आणि गुंतवणूकदारांमध्ये सहमती झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्नॅपडीलची प्रतिस्पर्धी असणाऱया फ्लिपकार्टला कंपनीची विक्री करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सध्या स्नॅपडीलमध्ये सॉफ्टबँक आणि नेक्सस या गुंतवणूक कंपन्यांनी सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. नेक्सस आणि सॉफ्टबँकेने स्नॅ� �डीलची विक्री करण्यास संमती दिली आहे.

स्नॅपडील आणि फ्लिपकार्ट यांच्यात अधिग्रहणासाठी सहमती झाल्यास भारतीय ई-व्यापार क्षेत्रातील सर्वात मोठा व्यवहार ठरण्याची शक्यता आहे. येत्या काही आठवडय़ांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असे यासंबंधित सूत्राने सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, स्नॅपडीलच्या संस्थापकांना प्रत्येकी 25 दशलक्ष डॉलर्स मिळतील. याचप्रमाणे सेक्सस ला 100 दशलक्ष आणि काही प्रमाणात नवीन हिस्सा, कलारीला 70 ते 80 दशलक्ष डॉलर्स मिळतील असा अंदाज आहे. मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करण्यात आल्याने फेब्रुवारी 2016 मध्ये कंपनीचे बाजारमूल्य 6.5 अब्ज डॉलर्सवर पोहोचले होते. मात्र त्यानंतर कंपनीच्या मूल्यात घसरण होत गेली. आता कंपनीचे बाजारमूल्य 1 अब्ज डॉलर्स असल्याचे या क्षेत्रातील तज्ञ ांचे मत आहे.

2016-17 मध्ये स्नॅपडीलमध्ये गुंतवणूक केल्याने 6,500 कोटी रुपयांचा फटका बसल्याचे सॉफ्टबँकेने यापूर्वीच म्हटले आहे. सध्या स्नॅपडीलमध्ये सॉफ्टबँकेची 30 टक्के, नेक्सस 10 टक्के आणि कलारीची 8 टक्के हिस्सेदारी आहे. ऍमेझॉनकडून स्पर्धा होत असल्याने फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलला गुंतवणूकदारांना आकर्षित करणे कठीण होत आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आयटी शहरांत बेंगळूर सर्वात स्वस्त

परवडणाऱया शहरांत सर्वोच्च स्थानी

जगभरातील माहिती तंत्रज्ञान शहरांत सर्वात स्वस्त शहरांचा मान बेंगळूरने पटकावला आहे. जगातील 22 आयटी शहरांत राहणीमानाच्या बाबतीत परवडणाऱया जीवनमानात बेंगळूर अव्वल स्थानी असून अन्य बाबतीत मागे पडले आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील परवडणाऱया आयटी शहरांत केवळ बेंगळूरचा समावेश आहे. बेंगळूरमध्ये घराच्या भाडय़ासाठी सरासरी 15,250 रुपये खर्च येतो. त्यामानाने अमेरिकेतील सॅन प्रॅकिस्को शहरात 50 हजार रुपये खर्च येतो. सॅव्हिलिस टेक सिटीज इन्डेक्समध्ये बेंगळूर सर्वोच्च स्थानी असून केप टाऊन, सन्तियागो, बेनोस एरेस आणि बर्लिनच्या मा� ��ाने स्वस्त आहे. ही यादी तयार करण्यासाठी पाच मानांकनाचा वापर करण्यात आला होता. वाहतुकीच्या बाबतीत बेंगळूरने समाधानकारक कामगिरी केली नाही. निवासस्थानापासून कार्यालयात पोहोचण्यासाठी कर्मचाऱयांना अन्य शहरांच्या तुलनेत जास्त वेळ खर्च करावा लागतो. बेंगळूरच्या तुलनेत न्यूयॉर्क आणि कोपनहेगन या ठिकाणी वाहतुकीसाठी कमी वेळ लागतो. अन्य शहरांत कार्यालय ते घरादरम्यानच्या प्रवासा साठी सरासरी 32 मिनिटांचा वेळ लागतो, तर बेंगळूरमध्ये 47 मिनिटांचा वेळ लागतो.

शहरातील जीवनमान आणि करमणुकीच्या बाबतीत बेंगळूरची असमाधानकारक कामगिरी आहे. नागरी जीवन, प्रदूषणाची पातळी, हरित संरक्षण, गुन्हे, आरोग्य सेवांचा लाभ, समान वेतन आणि वाहतूक वेळेचा जीवनमान श्रेणीत समावेश आहे. याचप्रमाणे मनोरंजन, शॉपिंग, नाईटलाईफ, कला, सांस्कृतिक कार्यक्रमाने शह र अन्य आयटी शहरांच्या तुलनेत मागे आहे. या बाबतीत बर्लिननंतर, लंडन आणि टोकियोचा क्रमांक लागतो. व्यवसायपूरक वातावरणात शहराचा 19 वा, तर कौशल्याच्या बाबतीत 17 वा क्रमांक आहे.

🔹दुचाकी विक्रीत भारत सर्वोच्च स्थानी

दुचाकी वाहनांच्या विक्रीच्या बाबतीत भारत जगातील सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे. भारताने चीनला मागे टाकत गेल्या वर्षात प्रतिदिनी 48 हजार वाहनांच्या सरासरीने 1 कोटी 77 लाख दुचाकी वाहनांची विक्री केली. भारताचा शेजारी असणाऱया चीनने गेल्या वर्षात 1.68 कोटी दुचाकींची विक्री केल्याचे सियाम आणि चायना असोसिएशन ऑफ ऑटोमोबाईल मॅ� ��्युफॅक्चर्सच्या आकडेवारीतून दिसत आहे.

देशातील ग्रामीण भागातील नागरिकांचे उत्पन्न वाढल्याने आणि पायाभूत सूविधांसह महिला दुचाकी वापरणाऱयांच्या संख्येत वाढ झाल्याने वाहनांच्या विक्रीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली. महिला ग्राहकांची होंडा कंपनीच्या गाडय़ांकडे ओढ असून त्यांचा हिस्सा 35 टक्के आहे. गेल्या काही वर्षात चीनमधील दुचाकी बाजारपेठेत घट होत आहे. चीनमधील मोठय़ा शहरांत पेट्रोलच् या दुचाकी वाहनांवर बंदी घालण्यात आली आणि कारच्या विक्रीमध्ये तेजीने वाढ होत आहे.

चीनमध्ये दरवर्षी साधारण 2.5 कोटी वाहनांची विक्री झाल्यानंतर बाजारपेठेतील विक्रीत घसरण होण्यास प्रारंभ झाला. चीमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. वाहन घेण्यासाठी देशात सुलभ कर्जाची सुविधा, कमी इंधनाचा वापर करणारी माडेल्स, नागरिकांचे वाढते उत्पन्न, नवीन बिझनेस मॉडेल्समुळे दुचाकी वाहनांची � ��िक्री वाढत आहे.

🔹हरप्रीत सिंगला कांस्यपदक

येथे सुरू असलेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये पहिल्या दिवशी हरप्रीत सिंगने कांस्यपदक मिळविल्यानंतर गुरुवारी दीपक, अनिल कुमार व रितू यांनीही कांस्यपदकाच्या फेरीत प्रवेश मिळविला आहे.

या स्पर्धेच्या पहिल्या ग्रीको रोमन प्रकारातील 80 किलो वजन गटात हरप्रीतने एकमेव कांस्यपदक मिळविले. अन्य भारतीयांना मात्र पहिल्या दिवशी पदक मिळविण्यात अपयशच आले. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सलग दुसऱयांदा कांस्य मिळविणाऱया हरप्रीतने चीनच्या जुन्जे ना याच्यावर 3-2 अशा गुणांनी मात केली. पहिल्या फेरीत दोघांनी एकेक गुण मिळविला तर दुसऱया फे� �ीत हरप्रीतने दोन गुण घेत 3-1 अशी आघाडी घेतली. हरप्रीतच्या चुकीमुळे जुन्जेला एक गुण मिळाला असला तरी अंतिम क्षणात हरप्रीतने 'बगाल्डो' तंत्राचा अवलंब करीत विजय साकार केला. 75 किलो गटात गुरप्रीत सिंगला कांस्यपदकाच्या लढतीत चीनच्या बिन यांगकडून 0-8 अशा गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. रवींदर (66), हरदीप (98), नवीन (130) यांना मात्र प्राथमिक फ ेरीतच पराभूत व्हावे लागले.

पुरुषांच्या 71 किलो वजन गटात दीपकला इराणच्या अफशिन ब्याबानगार्डकडून उपांत्यपूर्व फेरीत 1-3 असा पराभव पत्करावा लागला. मात्र अफशिनने अंतिम फेरी गाठल्यामुळे दीपकला कांस्यपदकासाठी प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी मिळाली. अनिल कुमारलाही अशीच संधी मिळाली असून 85 किलो गटातील उपांत्यपूर्व फेरीत तो जपानच्या अत्सुशी मात्सुमोटोकडून 0-7 अशा गुणांनी पराभूत झाला होता. पण मात्सुमोटोने अंतिम फेरी गाठल्याने अनिल कुमारला प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.

महिलांच्या 63 किलो गटात रितूने तैपेईच्या मिन वेन हौ हिच्यावर 5-4 अशा गुणांनी मात करीत उपांत्य फेरी गाठली. मात्र मंगोलियाच्या बॅटसेटसेग सोरोन्झोनबोल्डकडून तिला 2-12 गुणांनी पराभूत व्हावे लागले. सोरोन्झोनबोल्ड सुवर्णपदकासाठी लढणार असल्याने रितूला कांस्यपदकासाठी कोरियाच्या जिनयुंग हांगविरुद्ध खेळावे लागणार आहे. ग्यानेंदर (59) व ज्योती (75) यांना मात्र प्राथमिक फेरीतच पराभव स्वीकारावे लागले. ग्यानेंदर पात्रता फेरीतच कझाकच्या मल्लाकडून 1-5 असा पराभूत झाला तर ज्योती उपांत्य फेरीत जपानच्या मासाको फुरुइचीकडून 0-10 अशी पराभूत झाली. त्याआधी पात्रता फेरीत तिने कोरियाच्या जेआँगवर 5-1 अशा गुणांनी विजय मिळविला होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹झुलन गोस्वामीची विक्रमी कामगिरी

महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी नोंदवणारी गोलंदाज

भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार व वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी महिला वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक बळी मिळविणारी गोलंदाज बनली आहे. तिने मंगळवारी ऑस्ट्रेलियाच्या कॅथरीन फिट्झपॅट्रिकने नोंदवलेला 180 बळींचा विक्रम मागे टाकत नवा विक्रम नोंदवला.

सध्या दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिलांच्या चौरंगी क्रिकेट मालिकेतील सामन्यात 34 वर्षीय गोस्वामीने तीन बळी मिळवित आपल्या एकूण बळींची संख्या 181 वर नेली. तिने 21.76 धावांच्या सरासरीने हे बळी मिळविले असून 153 व्या सामन्यात तिने हा विक्रम नोंदवला. 2007 मध्ये तिला आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा बहु� ��ान मिळाला होता. याशिवाय अर्जुन व पद्मश्री पुरस्कारही तिला मिळालेले आहेत. महिला क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाज असा लौकीक मिळविणारी झुलन 2002 मध्ये पदार्पण केल्यानंतर भारतीय संघाची गोलंदाजीतील प्रमुख आधारस्तंभ बनली होती.

कसोटी, वनडे व टी-20 तिन्ही प्रकारात मिळून तिने एकूण 271 आंतरराष्ट्रीय बळी घेत महिला क्रिकेटमधील सर्वाधिक बळी मिळविणारी ती सर्वकालीन अव्वल गोलंदाज आहे. 2007 मध्ये आयसीसीचा सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा बहुमान मिळाल्यानंतर ती भारतीय संघाची कर्णधार बनली होती. 2010 मध्ये तिला अर्जुन पुरस्कार व दोन वर्षांनंतर पद्मश्र� �� पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

पश्चिम बंगालमधील नादिया जिल्हय़ातील एका खेडय़ात जन्मलेली झुलन बालपणी फुटबॉलशौकीन होती. 1992 मधील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामने टीव्हीवर पाहिल्यानंतर तिच्यात क्रिकेटबद्दल आवड निर्माण झाली. पाच वर्षांनंतर 1997 मध्ये महिलांच्या विश्वचषक अंतिम फेरीत न्यूझीलंडला हरवून ऑस्ट्रेलियाने जेतेपद मिळविले होते. त्यावेळी बेलिंडा क्लार्कने � �ैदानावर जी विजयी फेरी मारली ती पाहून ती खूपच रोमांचित झाली होती. त्यामुळे ती क्रिकेटमध्येच अधिक रमली आणि नंतर तिने देशाचे प्रतिनिधित्वही केले आणि विक्रमवीर होण्यापर्यंत मजल मारली. गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीतही तिने चमकदार प्रदर्शन केले असून कसोटीत 25.72 अशी तिची सरासरी आहे. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. 153 वनडेमध्ये तिच्या नावावर 919 धावा नोंद झाल्या अस ून ती अद्याप खेळत आहे.

🔹यंदा विक्रमी धान्योत्पादन

२७ कोटी ३३ लाख टन उत्पादन; गहू, तांदूळ व डाळींचा उच्चांक

गेल्या वर्षी म्हणजे २०१६ मध्ये झालेल्या दमदार मान्सूनने चालू वर्षांमध्ये (जुलै-जून २०१६-१७) अन्नधान्य उत्पादनाचा नवा विक्रम केल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केली. तिसऱ्या आणि अंतिम आढाव्यानुसार, देशामध्ये यंदा २७ कोटी ३३ लाख टन धान्योत्पादन अपेक्षित आहे. एकटय़ा उसाचा अपवाद वगळल्यास तांदूळ, गहू, डा� �ी, तेलबिया आदींच्या उत्पादनाने यंदा नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.

राज्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर केंद्रीय कृषी खाते दरवर्षी तीन अंदाज व्यक्त करते. फेब्रुवारीमधील दुसऱ्या आढाव्यानुसार, २७ कोटी १९ लाख टन उत्पादनाचा अंदाज धरला होता. पण त्यात आणखी वाढ होऊन अंतिम अंदाज २७ कोटी ३३ लाख टनांवर पोचला. हे उत्पादन आतापर्यंतचे सर्वाधिक विक्रमी आहे. यापूर्वीचा विक्रम २०१३-१४ मध्ये होता. त्या वेळी २६ कोटी ५ ० लाख टन उत्पादन झाले होते. त्याच्या तुलनेत यंदाचे उत्पादन सुमारे ८० लाख टनांहून (३.१५ टक्के) अधिक आहे. मागील वर्षीच्या (१५-१६) तुलनेत तर तब्बल २ कोटी १८ लाख टन (८.६७ टक्के) अधिक आहे.

मागील वर्षांच्या तुलनेत तांदळाच्या उत्पादनात २५ लाख टनांची, गव्हामध्ये ४८ लाख टनांची, भरड धान्यांमध्ये ५८ लाख टनांची, डाळींमध्ये ६० लाख टनांची आणि तेलबियांमध्ये तब्बल ७२ लाख टनांची भर पडल्याची आकडेवारी आहे.

उसात घट

तामिळनाडूतील साखरपट्टय़ात पावसाने चांगलीच ओढ दिल्याचा फटका ऊस उत्पादनाला बसल्याचे दिसते आहे. मागील वर्षी उसाचे उत्पादन ३४ कोटी ८४ लाख टन होते, पण यंदा ते ४.२४ कोटी टनाने घसरून (-१२.१७ टक्के) ३० कोटी ६० लाख टनांवर आले आहे. याउलट लागवडीचे क्षेत्र घटूनही कपाशीच्या उत्पादनात जवळपास ९ टक्क्यांची (३ कोटींवरून ३.२५ कोटी गाठींपर्यंत) घसघशीत वाढ झाली आह� �.

पुढील वर्षांचाही दमदार अंदाज
यंदाही दमदार मान्सून पडण्याच्या अंदाजाने कृषी मंत्रालयाने पुढील वर्षीसुद्धा (२०१७-१८) २७ कोटी ३० लाख टन धान्योत्पादनाचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. यामुळे कृषिक्षेत्राचा विकासदर सरासरी चार टक्क्यांहून अधिक राहण्याचा आणि पर्यायाने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होण्याची खात्री सरकारला वाटते आहे.

🔹मनरेगा : समान मजुरीसाठी समितीची स्थापना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) मजुरीची पुनर्रचना करण्याचा विचार सरकार करत आहे. या योजनेंतर्गत ज्या निकषांवर मजुरांना मजुरी दिली जाते त्या निकषांवर आता पुनर्विचार करण्यात येणार आहे.

ग्रामीण विकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मनरेगाच्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या मजुरीत आसाम, बिहार, झारखंड, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेशात १ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ओडिशात २ रुपये तर पश्चिम बंगालमध्ये ४ रुपये वाढ करण्यात आली आहे. केरळ आणि हरियाणा या राज्याने मनरेगा अंतर्गत सर्वाधिक १८ रुपयांची मजुरी वाढविली आ� �े. यावर्षी मनरेगाच्या मजुरीत २.७ टक्के वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात यात ५.७ टक्के वाढ झाली होती. १ एप्रिलपासून मजुरीचे नवे दर लागू झालेले आहेत.

केंद्राने निश्चित केलेली मनरेगाची मजुरी आणि अनेक राज्यांकडून देण्यात येत असलेली मजुरी यात अंतर असल्याचे दिसून येते. राज्यांच्या किमान मजुरी दरापेक्षाही मनरेगाचे मजुरी दर कमी आहेत. मजुरीतील हे अंतर दूर करण्यासाठी सरकारने ग्रामीण विकास मंत्रलयाचे अतिरिक्त सचिव नागेश सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची मजुरी ही ग्राहक मूल्य निर्देशांकानुसार दिली जाते. प्रामुख्याने कृषी क्षेत्रातील मजुरांना या माध्यमातून काम दिले जाते. १९८३ च्या पद्धतीवर हे आधारित आहे. केंद्र सरकारच्या एका समितीने मनरेगाच्या किमान मजुरीची शिफारस केली होती.

काय आहे मनरेगा?

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील अकुशल कामगारांना वर्षाला किमान १०० दिवस रोजगार देण्याची ही योजना आहे. दहा कोटी कुटुंब या योजनेचे लाभार्थी आहेत. ग्रामीण भागातील कामगारांच्या हाताला या माध्यमातून काम दिले जाते. हरियाणात मनरेगाची सर्वाधिक मजुरी २७७ रुपये प्रति दिवस एवढी आहे. तर< /span>, बिहार आणि झारखंडमध्ये सर्वात कमी १६८ रुपये प्रति दिवस एवढी मजुरी आहे.