Skip to content Skip to sidebar Skip to footer

Current Affairs Jan 2017 Part - 3

🔰 Current Affairs Marathi 🔰

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹'खांदेरी'ने वाढणार नौदलाची ताकद...

फ्रान्सच्या सहकार्याने येथील माझगाव गोदीत सुरू असलेल्या "स्कॉर्पिन' पाणबुड्या बांधणीच्या प्रकल्पातील "खांदेरी' या दुसऱ्या स्वदेशी पाणबुडीचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत आज जलावतरण करण्यात आले. या अत्याधुनिक पाणबुडीमुळे स्वदेशी बनावटीच्या संरक्षण साहित्यात भारताने मोठा ट प्पा गाठल्याचे मानते जाते. या पाणबुडीच्या आता चाचण्या होणार असून, या वर्षअखेर ती नौदलात दाखल होण्याची शक्यता आहे. नौदलप्रमुख ऍडमिरल सुनील लांबा या वेळी उपस्थित होते.

'खांदेरी'ची वैशिष्ट्ये:

- छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीचे उदाहरण असलेल्या प्रख्यात खांदेरी बेटावरून पाणबुडीचे नामकरण. "टायगर' शार्क माशालाही "खांदेरी' म्हणतात.
- बहुपयोगी पाणबुडी. सागराच्या पृष्ठभागावरून होणारा, पाणबुडीतून होणारा मारा परतवण्याची क्षमता. तसेच सुरुंग पेरणे, टेहळणी करणे, गुप्त माहिती गोळा करण्यासाठीही उपयुक्त.
- शत्रूपासून लपण्याची उच्च क्षमता, अधिक अचूक दिशादर्शक प्रणाली.
- संवाद, दळणवळणसाठी पाणबुडीवर अत्याधुनिक यंत्रणा
- सागराच्या पृष्ठभागावरून किंवा पाण्याखालून पाणतीरांचा मारा करणे, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता.
- उष्णकटिबंधीयसह कोणत्याही वातावरणात कार्य करण्यास सक्षम.
- नौदलात पहिली पाणबुडी आठ डिसेंबर 1967 रोजी दाखल झाली होती.
- "स्कॉर्पिन' श्रेणीची पहिली पाणबुडी नौदलात सहा डिसेंबर 1986 रोजी दाखल झाली होती. वीस वर्षांच्या सेवेनंतर तिला निरोप देण्यात आला.
- "खांदेरी' या वर्षअखेर नौदलात दाखल होण्याची शक्यता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹हवाई दलप्रमुखांचे "मिग'मधून उड्डाण

हवाई दलप्रमुख एअरचीफ मार्शल बी. एस. धानोआ यांनी आज "मिग-21' या लढाऊ विमानातून उड्डाण केले.

राजस्थान सीमेवरील बारमेरजवळच्या हवाई दलाच्या उतरलाई तळावरून त्यांनी एकट्याने हे उड्डाण केले. हवाई दलाच्या प्रमुखपदाची सूत्रे एअरचीफ मार्शल धानोआ यांनी
नुकतीच स्वीकारली आहे त. ते "कॅट ए' श्रेणीचे अर्हताधारक असून, तीन हजार तासांपेक्षा जास्त काळ विमानोड्डाणांचा त्यांना अनुभव आहे.

1999मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल संघर्षाच्या काळात लढाऊ विमानांच्या तुकडीचे नेतृत्वही त्यांनी केले होते. हवाई दलाचे यापूर्वीचे प्रमुख एअरचीफ मार्शल अरूप राहा यांनी त्यांच्या कारकिर्दीत स्वदेशी बनावटीच्या "तेजस' या विमानातून उड्डाण करूया विमानाच्या कार्यक्षमत� �ची प्रशंसा केली होती.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹फुटबॉल संघाचे स्थान दहा वर्षांतील सर्वोत्तम

भारतीय फुटबॉल संघाने लक्षणीय प्रगती करत जागतिक क्रमवारीत दहा वर्षांतील सर्वोत्तम स्थान पटकावले. भारतीय संघ आता 129 व्या स्थानी आहे. भारताची ही 2006 पासूनची सर्वोत्तम कामगिरी आहे.

भारताने दोन वर्षांत 42 क्रमांकाने प्रगती केली आहे. भारताने गेल्या वर्षी 16 पैकी 11 आंतरराष्ट्रीय लढती जिंकल्या. त्यात आपल्यापेक्षा खूपच सरस असलेल्या प्युएर्तो रिकोविरुद्धच्या विजयाचाही समावेश आहे. सरस मानांकनामुळे आशिया कप स्पर्धेच्या ड्रॉच्यावेळी भारतास पॉट दोनमध्ये ठेवण्यात येईल. यामुळे भारतास आशिया कप स्पर्धेस पात्र ठरण्याची आशा आहे.

स्टीफन कॉन्स्टंटाईन यांच्याकडे 2015 च्या फेब्रुवारीत पुन्हा मार्गदर्शकपद सोपवण्यात आले. त्या वेळी भारत 171 व्या स्थानी होता. कॉन्स्टंटाईन यांच्या मार ्गदर्शनाखालील पहिली लढत होण्यापूर्वीच म्हणजेच मार्चमध्ये भारत 173 व्या क्रमांकावर गेला होता. सरत्या वर्षात भारताने वेगाने प्रगती केली. 20 ऑक्टोबर 2016च्या मानांकनात 11 क्रमांकाने प्रगती केली होती, तर वर्षाअखेरच्या क्रमवारीत सहा वर्षांतील सर्वोत्तम स्थान मिळवले होते.

दोन वर्षांत भारतीय फुटबॉलने चांगले यश मिळवले आहे. आम्ही जे लक्ष्य ठरवले होते, ते साधले आहे. अर्थात अजूनही खूप दू रचा टप्पा बाकी आहे. प्रवास योग्य दिशेने सुरू झाला आहे, हे नक्कीच म्हणता येईल, असे कॉन्स्टंटाईन यांनी सांगितले. फुटबॉल संघाबाबत महासंघाने मला अधिकार दिले. हे सांघिक यशच आहे, असेही त्यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹१४ वर्षाच्या विद्यार्थ्याबरोबर पाच कोटीचा करार

ड्रोनचे डिझाइन तयार करण्यासाठी एका १४ वर्षीय विद्यार्थ्याबरोबर पाच कोटीचा करार करण्यात आला आहे. हर्षवर्धन झाला अ� ��े या विद्यार्थ्याचं नाव आहे. अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या व्हायब्रंट गुजरातमध्ये हा करार करण्यात आला.

युद्धाच्या वेळी भूसुरूंगाचा शोध घेऊन हे स्फोटके निष्क्रीय करता येईल अशा प्रकारचा ड्रोन तयार करण्यासाठी हर्षवर्धन बरोबर करार करण्यात आलाय. गुजरात सरकारच्या विज्ञान आणि औद्योगिक विभागानं हा करार केला आहे. हर्षवर्धन इयत्ता दहावीत आहे. त्यानं आतापर्यंत ड्रोनचे तीन नमूने � ��यार केले आहेत.

 भूसुरूंगांचा शोध घेणाऱ्या ड्रोन तयार करण्याचं काम २०१६ पासून सुरू केलं होतं. त्याचे नियोजनही करण्यात आलं होतं, असं हर्षवर्धन यांनी सांगितलं. चॅनल पाहताना ही कल्पना सुचल्याचं त्यानं सांगितलं. युद्धात भूसुरूंगाच्या स्फोटात अनेक सैनिक जखमी होतात. त्यामुळे हे ड्रोन बनविण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनं स्पष्ट केलं.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹राष्ट्राध्यक्षांच्या हस्त े उपराष्ट्राध्यक्षांना बहुमान

अमेरिेकेचे मावळते उपराष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा 'फ्रीडम मेडल' देऊन सत्कार करण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते बायडेन यांना अमेरिकेचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला गेला. हा पुरस्कार स्वीकारताना बायडेन यांना अश्रू अनावर झाले.

गेली आठ वर्ष बराक ओबामा यांच्यासोबत सावलीसारख्या वावरणाऱ्या जो बायडेन यांना ओ बामांसारखी प्रसिध्दी कधीच मिळाली नाही. अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष बराक ओबामा यांच्यावरच प्रसिध्दीचा सगळा झोत होता. त्यांच्यासोबत काहीसे पडद्याआड राहत उपराष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेचा कारभार सांभाळला. गेल्या आठ वर्षांमध्ये त्यांना प्रसिध्दी मिळाली ती रिपब्लिकन पक्षाच्या डाॅनल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर.
.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹'टाॅप ५०' मधून टाटा समूह बाहेर

कालच नव्या अध्यक्षांची निवड केलेला टाटा समूह आजही हेडलाईन्समध्ये झळकतोय. याचं कारण म्हणजे जगातल्या ५० सर्वात प्रयोगशील कंपन्यांच्या यादीतून टाटा समूहातल्या कंपन्या बाद झाल्या आहेत. ही यादी बोस्टन कन्सलिंग ग्रुप या समूहाने प्रकाशित केली आहे. ही यादी दरवर्षी नव्याने प्रकाशित करण्यात येते. २०१५ च्या यादीत टाटा मोटर्सने २६वं स्थान पटकावलं होतं. याआधी २०१४मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने ४३वा नंबर मिळवला होता.

पण यावर्षीच्या टाॅप ५० यादीत टाटा समूहातली एकही कंपनी नाहीये. यावर्षी झालेल्या रतन टाटा विरूध्द सायरस मिस्त्री वादामुळेही टाटा समूहाच्या प्रतिमेला धक्का बसला असावा. पण प्रयोगशीलतेचा निकष लावूनही टाटा कंपन्यांना स्थान मिळू नये हे आश्चर्य आहे.

भारतीय उद्योगजगतात टाटा समूहाला अति� ��य मानाचं स्थान आहे. एक शतकापासूनही जास्त काळ उद्योगक्षेत्रात असलेल्या टाटा समूहाचा भारतीय अर्थव्यवस्थेची अनेक क्षेत्रं विकसित करायला मोठा हातभार लागला आहे. मग ती एअर इंडियाची मुहूर्तमेढ असेल किंवा साॅफ्टवेअर उद्योग असेल. टाटा समूहाचं अस्तित्व सगळीकडे जाणवतं. अगदी मिठापासून स्टील उद्योगापर्यंत टाटांनी आपल्या समूहाचं जाळं पसरवलं. तसंच 'कोरस', 'लँडरोव्हर', आणि 'जॅग्वार'� �ारखे जागतिक ब्रँड्स ताब्यात घेत जगभर टाटा समूहाचं तसंच भारतीय उद्योगक्षेत्रांचं नाव मोठं केलं.

असं असूनही टाटा समूह जगातल्या ५० सर्वात प्रयोगशील कंपन्या यादीतून बाद झाला आहे.
टाटा समूहाचं जाळं पसरवताना त्यांनी सचोटीच्या व्यवसायाची मूल्यं कटाक्षाने पाळली. रतन टाटांनंतर त्यांनीच निवडलेले सायरस मिस्त्री 'टाटा सन्स'चे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी टाटा समूहाअंतर्गत काही बदल करायचं ठरवलं. सायरस मिस्त्री नव्या पिढीतले असल्याने एखादा व्यवसाय भावनाशीलतेने न करता त्यात व्यावहारिक दृष्टिकोन असावा असं त्यांचं मत होतं. त्यामुळे टाटा समूहातले तोट्यातले उ� ��्योग विकण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. आणि यातच होती टाटांनी खूप प्रयत्न करत विकत घेतलेली 'कोरस स्टील कंपनी'
ही कंपनी युरोपियन होती आणि युरोपच्या बाजारात या कंपनीचा एकेकाळी दबदबा होता. ही कंपनी ताब्यात घेण्यासाठी जगभरच्या उद्योगसमूहांनी प्रचंड प्रयत्न केले. पण या भयानक स्पर्धेत रतन टाटांनी उडी घेत आपण कौशल्य पणाला लावत या कंपनीवर ताबा मिळवत युरोपच्या स्टील उद्योगात महत्त्वाचं स्थान पटकावलं.

ही कंपनी विकायचा सायरस मिस्त्रींचा विचार होता आणि बाकी अनेक गोष्टीसोबत या कारणामुळे र तन टाटा मिस्त्रींवर नाराज झाले. त्यातही टाटा सन्सअंतर्गत असलेल्या निर्णयप्रक्रियेवर सायरस मिस्त्रींनी जम बसवायला सुरूवात केली होती आणि जुन्या पध्दती बदलत त्यांना अनुकूल ठरणाऱ्या नव्या पध्दतींची आणायला सुरूवात केली होती. शेवटी रतन टाटांनी उघडपणे मिस्त्रींच्या विरोधात भूमिका घेतली आणि त्यांना अध्यपदावरून हटवण्यात आलं. रतन टाटांनीच आपलं वजन मिस्त्रींच्या विरोधात टाकल् याने शेवटी त्यांना माघार घ्यावी लागणार हे जवळपास निश्चित होतं. पण मिस्त्रींनाही टाटा समूहामधल्या अनेकांचा पाठिंबा होता.

नेमक्या याच वर्षी टाटा समूह जगातल्या टाॅप ५० प्रयोगशील कंपन्यांच्या यादीतून बाद व्हावा यामागे हे मोठं कारण असेल का? सायरस मिस्त्रींसारख्या नव्या पिढीच्या उद्योजकाला हटवल्याने टाटा समूहाला फक्त पांरपारिक पध्दतीनेच व्यवसाय करायचा आहे का असाही सूर उम� �त होता. टाॅप ५० मधून टाटा समूह बाद झाल्यामागे हे कारण असेल का? हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलाय.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹रशियाची व्यसनमुक्तीकडे वाटचाल; २०१५ नंतर जन्मलेल्यांना सिगारेट न विकण्याचा निर्णय

रशियाने धूम्रपानावर नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वपूर्ण नियंत्रण घेतला आहे. २०१५ नंतर जन्मलेल्या व्यक्तींना सिगारेटची विक्री करण्यात येणार नसल्याचा निर्णय रशियाच्या आरोग्य मंत्� �ालयाने घेतला आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या प्रस्तावाला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे तंबाखूवर पूर्णपणे बंदी आणणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरला आहे.

रशियाने धूम्रपान आणि तंबाखू मुक्तीसाठी आणलेला नवा कायदा २०३३ मध्ये लागू होईल. कारण २०१५ साली आणि त्यानंतर जन्मलेली मुले १८ वर्षांची झाल्यावर त्यांना हा कायदा लागू होईल. 'या कायद्याचा उद्देश चांगला आहे,' असे रशियन संसदेच्या आरोग्य समितीचे सदस्य निकोलाई गेरासीमेन्को यांनी म्हटले आहे. मात्र तंबाखूच्या विळख्यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी घेतलेला निर्णय लोकांवर लादणे, योग्य आहे का, याबद्दल निकोलाई गेरासीमेन्को यांनी साशंकता व्यक्त केली आहे.

'अशा प्रकारचा बंदीचा निर्णय घेण्याआधी सर्वांना विचारात घेणे आणि सर्वांशी सल्लामसलत करणे आवश्यक होत े. हा निर्णय घेताना मंत्रालयातील इतर विभागांशी चर्चा गरजेची होती,' असे क्रेमलिनच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. रशियन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या नव्या कायद्याबद्दलची माहिती सरकारच्या सर्व विभागांना आणि यंत्रणांना दिली आहे. अर्थ मंत्रालय, आर्थिक विकास मंत्रालय यांच्यासह सर्वच मंत्रालयांना या नव्या कायद्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे.

२०१६ च्या आकडेव� �रीनुसार रशियातील धूम्रपान करणाऱ्यांची संख्या १० टक्क्यांनी कमी झाली आहे. मात्र रशियातील धूम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि कालांतराने ते शून्यावर आणण्यासाठी रशियाने २०१५ नंतर जन्मलेल्या व्यक्तींना सिगारेटची विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारती एअरटेलकडून 3 हजार कोटी गुंतवणूक

संपूर्ण भारतात एअरटेल पेमेन्ट्स बँकेसाठी भारती एअरटेलकड ून 3 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. भारतात पेमेन्ट्स बँकेची सुरुवात करणारी एअरटेल ही पहिली कंपनी ठरली आहे. या बँकेमध्ये काही प्रमाणात कोटक महिंद्रा बँकेचा हिस्सा राहणार आहे. सध्या देशात असणाऱया भारती एअरटेलच्या 2.5 लाख रिटेल मोबाईल सेवा केंद्रांचा एअरटेल पेमेन्ट्स बँकेकडून वापर करण्यात येणार आहे. प्रायोगिक पातळीवर सुरू करण्यात आल्यानंतर 10 लाख खातेधारक बँकेच� ��या सेवेचा लाभ सध्या घेत आहेत असे सांगण्यात आले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹विजेंदरला सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार

स्टार बॉक्सर विजेंदर सिंह याला गुरूवारी दिल्ली क्रीडा पत्रकार संघातर्फे वार्षिक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्याला वर्षातील सर्वोत्तम खेळाडू, तर ज्युनियर हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंह यांना सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून गौरवण्यात आले आहे. त्यासोबत भारताचे आॅलि� �्पियन आणि विश्व चॅम्पियन पदकविजेते महान पैलवान आणि प्रशिक्षक महाबली सत्पाल यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

यावेळी प्रशिक्षक हरेंद्र सिंह म्हणाले की, ''मी हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांना सांगितले होते की, आम्ही सुवर्ण पदक जिंकू किंवा मी राजीनामा देईन आणि मी पदक जिंकले.'' महाबली सत्पाल म्हणाले की,'' फक्त स्टार खेळाडूंकडे लक्ष देण्यापेक्षा यु वकांकडेही लक्ष द्यावे.त्यामुळे त्यांना प्रेरणा मिळेल. १९६८मध्ये मी शाळेत असताना मला देखील अशीच प्रेरणा मिळाली होती. ''

त्यासोबत भारताच्या क्रिकेटचा उगवता तारा ऋषभ पंत याला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. मात्र तो या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला नाही.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प:-
-----------------------------------------
* राज्यातील 15 दुष्काळप्रभावित आणि खारपाण पट्टा असलेल्या जिल्ह्यांत ही योजना जागतिक बँकेच्या मदतीने राबविली जाणार आहे.
या योजनेत त जळगाव, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळ, नांदेड आणि लातूरचा समावेश आहे.
* राज्यातील 15 जिल्ह्यांतील 5000 गावे या योजनेत समाविष्ट असून, 4000 कोटी रूपये या योजनेत खर्च केले जाणार आहेत.
* या गावांतील नागरिकांना अधिक चांगले जीवनमान देण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे.
* जलसंवर्धन, जलव्यवस्थापन, पीक व्यवस्थापन आणि त्यासाठीचा निधी यातून शेतीचा हा शाश्वत विकास साधला जाणार आहे,
*  महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर अशाप्रकारची ही योजना प्रथमच राबविली जात आहे

चालू घडामोडी:-
--------------------------------------

१) देशातील अथवा राज्यातील कँशलेस व्यवहार करणारी पहिली नगरपंचायत कोणती ;- मलकापूर

२) ------------ या दूरसंचार कंपनीने पेमेंट बँक सेवा सुरु केली:- एअरटेल

३) ------------- या राज्याने ग्रामीण भागात डीजीटल व्यवहाराना चालना देण्यासाठी " ग्रामीण वाय-फाय सेवा सुरु केली:- कर्नाटक

४) गोवा येथील ४७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दिला जाणारा गोल्ड� �� पिकाँक पुरस्कार -------------- या चित्रपटाला देण्यात आला:- डॉटर

५) भारत व चीन मध्ये ६ वा Hand & Hand २०१६ हा लष्करी सराव -------------- या शहरात आयोजित केला होता:- पुणे

६) ------------- या समितीने सरस्वती नदी च्या अस्तीत्वाचा आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला :- के. एस. वालिया .समिती

७) --------------- या शहरात अनुसूचित जाती व जमातीच्या नवउद्योगांना मदत करण्यासाठी  राष्ट्रीय sc.st हब स्थापन करण्यात आले:- लुधियाना

८) भ� �रतातील --------------- या शहरात २०१७ मध्ये फिफा अंडर १७ विश्वचषक स्पर्धा होणार आहे :- कोची(केरळ)

९) जगातील पहिला बॉलीहुड थीम पार्क -------------- या ठिकाणी विकसित करण्यात येत आहे:- दुबई

१०)  ---------- हा देश आंतर्राष्ट्रीय गुन्हे न्यायालयातून बाहेर पडला:- रशिया

चर्चित व्यक्ती:-
नटराजन चंद्रशेखरन
-------------------------------------------------------

* टीसीएस'चे मुख्य कार्यकारी आणि विद्यमान संचालक नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा समूहाचे नवे अध्यक्ष म्हणून  घोषणा करण्यात आली.
*  एन. चंद्रशेखर  21 फेब्रुवारीला टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील.
* नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी टाटासमूहाने रतन टाटा, वेणू श्रीनिवासन यांच्यासह पाच जणांची समिती स्थापन केली होती.
* चंद्रशेखरन टाटा समूहात 1987 मध्ये दाखल झाले होते 54
* 2002 मध्ये त्यांनी "टीसीएस'च्या जागतिक विक्री विभागाची जबाबदारी सांभाळली होती. 2007 मध्ये ते टीसीएसच्या कार्यकारी संचालक झाले. 2009 पासून ते "टीसीएस'चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
*  शेतकरी कुटुंबात जून 1963 मध्ये जन्म
* कोईमतूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमधून विज्ञान शाखेची पदवी
* त्रिचीमधील अभियांत्रिकी महाविद्यालयातून कॉम्प्युटर ऍप्लिकेशनमधून पदव्युत्तर पदवी
* माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची शिखर संघटना असलेल्या नॅसकॉमचे अध्यक्षपद
* 5 मार्च 2016 पासून ते रिझर्व्ह बॅंकेचे संचालक (नॉन ऑफिशिअल)

चालू घडामोडी:-
---------------------------------------------

१) राज्यात छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण, मानव विकास संस्था (सारथी) स्थापन करण्यासाठी --------यांच्या अध्यक्षतेत एक समिती स्थापन करण्यात आली राज्यातील मराठा, कुणबी आणि शेतकरी यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रश्नांबाबत अभ्यास करण्याच्या आणि त्यावर उपाय सूचविण्याच्या हेतूने ही संस्था स्थापन करण्यात येणार आहे.  :-डॉ. सदानंद मोरे

२) संक्रमण शिबिरात र� ��हणाऱ्या मूळ भाडेकरूना आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन सदनिका देण्यासह अशा शिबिरातील अनधिकृत रहीवाशाना पंतप्रधान आवास योजनेतून सदनिका देण्यासंदर्भ‍‍‌त धोरण ठरविण्यासाठी ------------------ यांच्या अध्यक्षतेखाली ही उपसमिती ची स्थापना करण्यात आली:-प्रकाश मेहता

३) भारतात मादाम तुसाद संग्रालयाची पहिली शाखा ----------------- येथे सुरु होत आहे :- नवी दिल्ली

४) ---------या राज्यात मानवनिर्मित जंगल तयार करण् यात आले:- रायपूर (छत्तीसगड)

५) भारतातील ----------------- ही मेट्रो रेल्वे कॅशलेस बनली:- मुबंई

६) पंतप्रधान यांचे दिल्लीतील निवास स्थानाचे नाव ७ रेसकोर्स बदलून ------------ हे ठेवले गेले:- ७ लोक कल्याण मार्ग

७) भारतीय तंत्रज्ञान संस्था ( IIT) गुवाहाटीने ------------ हा सुपर कॉम्पुटर तयार केला:- परम ईशान

८) केंद्र सरकाने उघड्यावर शौच मुक्त भारत करण्याचे ------------ या वर्षापर्यंत लक्ष ठरविण्यात आले:- २०१९

९) र� �ष्ट्रीय रेल्वे संग्रालय ----------------येथे आहे :- दिल्ली

१०) आक्टोंबर २०१६ मध्ये कोणत्या राज्याने सिनीअर सिटीजन पॅालीसी सुरु केली :-ओडीशी

खांदेरी पाणबुडी:-
-------------------------
* फ्रान्सच्या सहकार्याने माझगाव गोदीत सुरु असलेल्या स्कॉर्पिन पाणबुडया बांधणीच्या प्रकल्पातील 'खांदेरी' या दुसऱ्या पाणबुडीचे जलावतरण १२ जानेवारी रोजी करण्यात आले
* टॉर्पिडो, जहाजभेदी क्षेपणास्त्रे आदींनी सज्ज असलेली ही पाणबुडी या वर्षअखेरीस भारतीय नौदलात समाविष्ट केली जाणार आहे.
* खांदेरी या जलदुर्गावरून या पाणबुडीचे नाव खांदेरी ठेवण्यात आले टायगर शार्क माशालाही खांदेरी म्हणतात
फ्रान्सच्या डीसीएनएस कंपनीसोबत स्कॉर्पिन वर्गातील सहा पाणबुडय़ांच्या निर्मितीचे काम माझगाव गोदी येथे सुरू आहे.

* खांदेरीची वैशिष्ट्ये:-
* खांदेरी पाणबुडी ही डिझेल आणि वीजेवर चालणारी आहे. अचूक लक्ष्यभेद करण्यासाठी खांदेरी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. अचूक मिसाईल डागूनण्याची क्षमता खांदेरीमध्ये आहे.
* खांदेरीमध्ये ट्यूबद्वारे लाँच होणाऱ्या अँटीशिप मिसाईल्सचाही समावेश आहे. या मिसाईल्स पाण्यात किंवा बाहेर डागता येऊ शकतात.
* बहुपयोगी पाणबुडी. सागराच्या पृष्ठभागावरून होणारा, पाणबुडीतून होणारा मारा परतवण्याची क्षमता. तसेच सुरुंग पेरणे, टेहळणी करणे, गुप्त माहिती गोळा करण्यासाठीही उपयुक्त.
* शत्रूपासून लपण्याची उच्च क्षमता, अधिक अचूक दिशादर्शक प्रणाली.
- संवाद, दळणवळणसाठी पाणबुडीवर अत्याधुनिक यंत्रणा
* सागराच्या पृष्ठभागावरून किंवा पाण्याखालून पाणतीरांचा मारा करणे, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता.\
* उष्णकटिबंधीयसह कोणत्याही वातावरणात कार्य करण्यास सक्षम.
*  नौदलात पहिली पाणबुडी आठ डिसेंबर 1967 रोजी दाखल झाली होती.
* "स्कॉर्पिन' श्रेणीची पहिली पाणबुडी नौदलात सहा डिसेंबर 1986 रोजी दाखल झाली होती. वीस वर्षांच्या सेवेनंतर तिला निरोप देण्यात आला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पंजाबचे माजी मुख्यमंत्री बर्नाला यांचे निधन

पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुरजितसिंग बर्नाला यांचे आज (शनिवार) निधन झाले. ते 91 वर्षांचे होते.

बर्नाला यांच्यावर काही दिवसांपासून चंदीगड येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान � �्यांचे निधन झाले.

बर्नाला हे 1985 ते 1987 दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री होते. तमिळनाडू, आंध्र प्रदेश व उत्तरखंडचे ते 2001 ते 2011 दरम्यान राज्यपाल होते.

जॉईन करा @ChaluGhadamodi

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹यंदाचा 'सारथी' आठ मान्यवरांना

लघु उद्योजक, कालावंत व उदयोन्मुख उद्योजक यांच्या यशाचा रथ तयार करणारी 'सारथी' ही संस्था अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेतर्फे दरवर्षी दिल्या � �ाणाऱ्या 'सारथी' पुरस्कारांमध्ये यंदा शहरातील प्रसिद्ध मान्यवरांचा समावेश आहे. त्याचे वितरण शनिवार, आज, जानेवारीला सायंकाळी होत आहे.

स्मॉल इंडस्ट्रीज, आर्टीस्ट, रुरल आर्टीझन्स, टॅलेंट्स अॅण्ड हॅन्डीक्राफ्ट इन्स्टिट्यूशन या नावांच्या आद्याक्षरावरुन 'सारथी' हे नाव निश्चित करण्यात आले होते. या नावांनुसारच ही संघटना संबंधित क्षेत्रात २४ वर्षांपासून कार्यरत आहे.

 उपराज धानीतील अनेक नवोदीत उद्योजकांना मार्गदर्शन करणे, कर्ज उपलब्ध करुन देण्यासोबतच ही संघटना कलावंतांनादेखील वेळोवेळी सहकार्य करते. अशा या संस्थेकडून दरवर्षी पुरस्कार दिले जातात. यंदा त्याचे २५ वे वर्ष आहे. त्यामध्ये यंदा कला, क्रीडा, उद्योजक, साहित्य, राजकारण अशा सर्वच क्षेत्रातील कलावंतांचा समावेश आहे.

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुरेश द्वादशीवार यांचा कला व संस्कृतीतील योगदा नाबद्दल सत्कार होत आहे. तर होमिओपेथी क्षेत्रातील कार्यासोबतच सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी डॉ. विलास डांगरे यांची निवड करण्यात आली आहे.

 राजकारणात आगळा ठसा उमटविणारे आमदार गिरीश व्यास यांनाही हा पुरस्कार प्रदना होत आहे. यासोबतच उद्योग क्षेत्रात विदर्भाचे नेतृत्त्व करणारे विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे व तांत्रिक उत्पादन क्षेत्रातील हकीमुद्दीन अली यांचाही या पुरस्कारांत समावेश आहे. नागपुरातून छोट्या पडदा गाजविणारी युवा नटी प्रसिद्धी आयलवार हिलादेखील हा पुरस्कार दिला जाणार आहे. तर क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू फैझ फझल आणि बुद्धीबळात यशस्वी कामगिरी करणारी मृदुल हेडनकर यांचा या पुरस्कारांत समावेश करण्यात आला आहे.

उत्तर अंबाझरी मार्गावरील कुसुमताई वानखेडे सभागृहात सायंकाळी ५.४५ वाजता हा कार्यक्रम हो� � आहे. हवाईदलाच्या मेंटेनन्स कमानचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी एअरमार्शल सुर्यकांत चाफेकर हे प्रमुख अतिथी असतील. 'सारथी' चे अध्यक्ष डॉ. मधूकर आपटे, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश चांडक, सारथीचे सचिव डॉ. अनिरुद्ध वझलवार, संस्थापक अमर वझलवार, सदस्य रंजन दंडिगे, प्रशांत काळे, हेमंत अंबादे, अमित हेडा व एस.एस. देशपांडे हे या कार्यक्रमासाठी प्रयत्नरत आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मुंबई-गोवा सागर� ��फारी फेब्रुवारीपासून

मुंबई : अल्पावधीत रेल्वेचे हाऊसफुल्ल होणारे आरक्षण आणि एसटीचा रस्त्यामार्गे खडतर प्रवास या कटकटीतून कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांची लवकरच मुक्तता होणार आहे. पुढील महिन्यापासून महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या मान्यतेने मुंबई-गोवा मार्गावर बोट सेवा सुरू होत आहे.

मुंबई, रत्नागिरी, जयगड, सर्जेकोट, वेंगुर्ला व गोवा असा या वाहतुकीचा मार्ग असेल. या प्रवास� ��साठी दीड ते दोन हजार रुपये शुल्क आकारले जाईल, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र नेमके शुल्क किती असावे याबाबत अजून अंतिम निर्णय झाला नसून, यासंदर्भातील बोलणी सुरू आहेत. ही सेवा बाराही महिने सुरू राहणार का, याचाही अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र पावसाळ्यातील चार महिने वगळता इतर आठ महिन्यांत सेवा सुरू असेल, असे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईत ते कोकण मार्गावर जलवा हतुकीसाठी आतापर्यंत बोर्डाने दोनवेळा निविदा मागवल्या होत्या. परंतु त्यास प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे बोर्डाने जलवाहतूक करणाऱ्या विविध ऑपरेटर्सची बैठक घेतली. त्यावेळी मेसर्स सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरिन्स सर्व्हिसेस आणि राज लॉजिस्टिक शिपिंग या कंपन्यांनी जलवाहतुकीत स्वारस्य दाखवले. राज लॉजिस्टीकने भाऊचा धक्का ते श्रीवर्धन, हर्णे, दाभोळ, बोऱ्या, जयगड, रत्नागिरी, जैत� ��पूर, विजयदुर्ग, मालवण आणि वेंगुर्ला या बंदरात सेवा देण्यास उत्सुकता दाखवली होती. त्यांच्या प्रस्तावाला बोर्डाने तसेच मुंबई पोर्ट ट्रस्टने मान्यता दिली आहे. गुरुवारी यासंदर्भात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत जलवाहतुकीला हिरवा कंदील दाखवण्यात आला.

आठ तासांत गोव्यात

जलवाहतुकीच्या माध्यमातून मुंबईतून आठ तासांत गोव्यापर्यंत जात येईल. यासाठी ४१० प्रवासी क्षमतेची कॅटेमर ान उपलब्ध आहे. ती ३० नॉटिकल मैल वेगाने हे अंतर कापेल. सध्या एकच बोट या सेवेसाठी वापरली जाणार असून सकाळी मुंबईहून एक बोट निघेल, तर दुसरी बोट दुसऱ्या दिवशी सकाळी गोव्याहून मुंबईच्या दिशेने निघेल. प्रवासी वाढल्यास बोटींची संख्या वाढवण्याचा निर्णय होईल.

गाळाची अडचण

मालवण आणि वेंगुर्ला ही बंदरे गाळाने भरली आहेत. खडकांमुळे मच्छिमारी नौका फुटण्याच्या घटना घडल्या आहेत. या बंदरा� �� कॅटेमरान बोट आणण्यासाठी गाळ काढणे व खडक फोडणे आवश्यक आहे. मालवणऐवजी सर्जेकोट बंदरात तात्पुरती सोय केली जाणार आहे. वेंगुर्ले बंदर गाळाने भरू नये म्हणून मांडवी खाडीवर बंधारा घालण्याची सूचना करण्यात आली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹हवाई क्षेत्रात भारत तिसऱ्या स्थानी पोचेल

भारतात विमानतळांच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पुढील पाच वर्षांमध्ये 10 अब्ज डॉलर खर्च करण्यात येण� �र आहेत, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक सचिव आर. एन. चौबे यांनी गुरुवारी दिली. भारत पुढील सात वर्षांत हवाई क्षेत्रातील जगातील तिसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भारतीय हवाई परिषदेत बोलताना चौबे म्हणाले, ""देशात सुमारे चारशे धावपट्ट्या रिकाम्या पडून असून, त्या गुरे चारण्याच्या जागा बनल्या आहेत. त्या पुन्हा वापरात आणण्यात येणार आहेत. द� ��शातील हवाई क्षेत्राच्या वाढीचा दर 23 टक्क्यांवर नेण्याचा सरकारचा विचार आहे. यासाठी पुढील पाच वर्षांत विमानतळांच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी 10 अब्ज डॉलर खर्च करण्यात येणार आहेत. पुढील सात वर्षांत भारतीय हवाई क्षेत्र जगात तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. भारताचा प्रतिस्पर्धी चीनमधील हवाई क्षेत्रातील वाढ 14 टक्के आहे.''

"जास्तीत जास्त नागरिकांना हवाई मार् गाने प्रवास करता यावा, हे सरकारचे धोरण आहे. यामुळेच सरकारने प्रादेशिक हवाई मार्ग जोडणी योजना सुरू केली आहे. रेल्वेची उलाढाल 1.6 लाख कोटी रुपये असून, हवाई वाहतूक क्षेत्राची उलाढाल 1.4 लाख कोटींपर्यंत पोचली आहे. रेल्वे आणि हवाई प्रवासीसंख्याही समान पातळीवर आली आहे,'' असे चौबे यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹'वेट फूट, ड्राय फूट' धोरण बंद

क्यूबामधून अमेरिकेमध्ये स्थलांतर करून आलेल्य ा नागरिकांना एका वर्षानंतरच नागरिकत्व देण्याचे मागील वीस वर्षांपासून सुरू असलेले अमेरिकेचे धोरण अध्यक्ष बराक ओबामा यांनी थांबविले आहे.

अमेरिकेमध्ये "वेट फूट, ड्राय फूट' या नावाने हे धोरण राबविले जात होते. हे धोरण संपुष्टात आणून क्यूबाबरोबरील संबंध अधिक सुरळीत करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे बराक ओबामा यांनी याबाबत प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. "वीस वर्षांप ूर्वी एका वेगळ्या परिस्थितीमध्ये हे धोरण सुरू केले होते.

क्यूबाबरोबरील संबंध सुरळीत करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असून स्थलांतरितांच्या धोरणामध्येही सातत्य आणले जाणार आहे. आधीच्या धोरणानुसार, क्यूबामधून अमेरिकेमध्ये बेकायदा प्रवेश करणाऱ्या स्थलांतरितांना एक वर्ष अमेरिकेमध्ये थांबण्याची परवानगी देण्यात आली होती. आता मात्र इतर स्थलांतरितांप्रमाणेच बेकायदा प्रवेश अस� ��्यास त्यांना तातडीने माघारी पाठविले जाणार आहे. क्यूबानेही परत पाठविलेल्या नागरिकांना परत घेण्याचे मान्य केले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹गुजरात पहिल्यांदाच बनला रणजी चॅम्पियन

तब्बल ४१ वेळा रणजी करंडक जिंकलेल्या मुंबईला अंतिम सामन्यात पराभूत करून गुजरातनं रणजी करंडक पटकावला आहे. गुजरात संघाचा कर्णधार पार्थिव पटेलच्या शतकी खेळीच्या बळावर हा विजय साकारण्यात आला असून गुजरातन� �� पहिल्यांदाच रणजी करंडक जिंकला आहे.

पहिल्या डावात गुजरातनं मुंबईला अवघ्या २२८ धावात गुंडाळलं होतं. दुसऱ्या डावात मुंबईनं गुजरातसमोर ३२८ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. गुजरातच्या संघानं ३२८ धावांचा पाठलाग करत मुंबईवर १०० धावांची आघाडी घेतली होती. अशा वेळी सामना अनिर्णित राहिला असात तरीही गुजरातच्याच गळ्यात विजयाची माळ पडली असती.

आज सकाळी सामना सुरू झाला तेव्हा गुजरातची स� ��रुवात फार चांगली झाली नव्हती. संघानं खातं खोललेलं नसताना पांचाळ झेल बाद झाला. गुजरातच्या ५१ धावा असताना दुसरा बळी गेला आणि ८९ धावा असताना तिसरा बळी गेला. परंतू पार्थिव पटेलनं संयमी आणि आक्रमक फलंदाजीचं दर्शन घडवत संघाला रणजी करंडक जिंकून दिला. पार्थिवनं २४ चौकारांच्या सहाय्यानं १९६ चेंडूत १४३ धावा कुटल्या.

पार्थिव मॅन ऑफ दि मॅच

गुजरातच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या पार� ��थिव पटेलला यावेळी 'मॅन ऑफ दि मॅच' पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. यापूर्वी १९५०-५१ मध्ये गुजरात रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात पोहचला होता. पण होळकर टीमने गुजरातला पराभूत केले होते. त्यामुळं रणजी करंडक जिंकण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं होतं. योगायोग म्हणजे आज होळकर स्टेडियममध्येच झालेल्या या अंतिम सामन्यात गुजरातनं रणजी करंडक पटकावला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारताच्या आयात-निर्य ातीत वाढ

भारताच्या निर्यातीत डिसेंबरमध्ये सलग चौथ्या महिन्यात वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये निर्यात 5.72 टक्क्यांनी वाढून 23.9 अब्ज डॉलरवर पोचली आहे. त्याआधीच्या वर्षात याच कालावधीत ती 22.6 अब्ज डॉलर होती.

वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारताच्या आयातीतही डिसेंबरमध्ये 0.46 टक्के वाढ होऊन ती 34.25 अब्ज डॉलरवर गेली आहे. यामुळे व्यापारी तूट 10.36 अब्ज डॉलरवर पोचली आहे. ते लाची आयात डिसेंबरमध्ये 14.61 टक्क्यांनी वाढून 7.465 अब्ज डॉलरवर गेली आहे. डिसेंबर 2015 मध्ये ही आयात 6.670 अब्ज डॉलर होती.

बिगरतेल वस्तूंच्या आयातीत डिसेंबरमध्ये 2.98 टक्क्यांची घसरण होऊन ती 26.608 अब्ज डॉलरवर आली आहे. डिसेंबर 2015 मध्ये ही आयात 27.425 अब्ज डॉलर होती. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत निर्यात 0.75 टक्के वाढून 198.8 अब्ज डॉलरवर पोचली आहे. याच कालावधीत आयात 7.42 टक्क्यांनी कमी होऊन 275.3 अब्ज डॉलरवर आल� �� आहे. या नऊ महिन्यांच्या कालावधीत व्यापारी तूट 76.54 अब्ज डॉलर झाली असून, त्याआधीच्या वर्षात याच काळात ती 100 अब्ज डॉलर होती.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सिडनी टेनिस स्पर्धेत सानियाला उपविजेतेपद

https://t.me/chalughadamodi/3644

सानिया मिर्झाला चेक प्रजासत्ताकाची जोडीदार बार्बरा स्ट्रीकोवा हिच्या साथीत सिडनी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागले. टिमीया बॅबोस (हंगेरी)-अनास्� ��ाशिया पावल्यूचेन्कोवा (रशिया) या जोडीने त्यांना ६-४, ६-४ असे हरविले. या पराभवामुळे मोसमाच्या प्रारंभी सलग दुसऱ्या स्पर्धेत विजेतेपद मिळविण्यात सानियाला अपयश आले. गेल्या आठवड्यात तिने ब्रिस्बेनमधील स्पर्धेत अमेरिकेच्या बेथानी मॅट्टेक सॅंड्स हिच्या साथीत विजेतेपद मिळविले होते. सानिया-बार्बरा यांना अग्रमानांकन होते. त्या मोसमात प्रथमच एकत्र खेळत होत्या. अंतिम सामना एक तास � ��२ मिनिटे चालला. दुसऱ्या सेटमध्ये सानिया-बार्बराची सर्व्हिस तीन वेळा खंडित झाली. या तुलनेत त्यांना एकच ब्रेक मिळविता आला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹चीनकडून अमेरिकेला युद्धाची धमकी

https://t.me/chalughadamodi/3646
जर अमेरिका दक्षिण चीन सागरामध्ये बीजिंगपासून बनवलेल्या कृत्रिम द्वीपांपर्यंत पोहोचण्यासाठी रोखणार असले, तर आगामी काळात मोठे युद्ध होणार असल्याची धमकी चीनने अमेरिकेला दिली.

चीनच्या माध्यमांमधून ही धमकी देण्यात आली आहे. याबाबत परराष्ट्रमंत्री रॅक्स टिलरसन यांनी सांगितले, वॉशिंग्टनला बीजिंग द्वीप समूहापर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकेल. तसेच याबाबत जर अमेरिका दक्षिण चीन सागरामध्ये बीजिंगपासून बनवलेल्या कृत्रिम द्वीपांपर्यंत पोहोचण्यासाठी रोखणार असले. तर हे सर्व चीन कदापि सहन करणार नाही. त्यामुळे अमेरिकेने हे जर असे केले. तर आगामी काळात मोठे युद्ध केले जाईल, अशी धमकीच चीनकडून अमेरिकेला देण्यात आली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹'व्हायब्रन्ट गुजरात'दरम्यान 25 हजार समझोते करार

10 जानेवारी ते 13 जानेवारी दरम्यान गांधीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या व� ��हायब्रन्ट गुजरात ग्लोबल समिटदरम्यान 25,578 समझोते करारांवर स्वाक्षरी करण्यात आली, अशी माहिती गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्याकडून शुक्रवारी देण्यात आली. मात्र या करारांतून किती प्रमाणात विदेशातून आणि देशी उद्योजकांकडून राज्यात गुंतवणूक करण्यात येणार आहे याची माहिती राज्य सरकारकडून सार्वजनिक करण्यात आलेली नाही. यावर्षी या संमेलनाचा हा आठवा भाग होता. गेल्या सात भ� ��गात राज्यात किती गुंतवणूक करण्यात येईल याची माहिती देण्यात आली होती. 2015 मध्ये एकूण 22,602 समझोते करार करण्यात आले होते आणि या माध्यमातूत 25 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात करण्यात आली होती. यंदा संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते करण्यात आले होते.

https://t.me/chalughadamodi/3650

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारतीय भाज्यांवरील बंदी युरोपीय समुदायाने उठवली

मुंबई: भारतातून आयात होणाऱ्या काही � ��ाज्यांवर तीन वर्षांसाठी युरोपीय समुदायाने घातलेली बंदी उठविली असल्याची माहिती कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

युरोपीय समुदायाने आंबा, कारले, पडवळ, वांगे आणि अळूच्या आयातीवर काही अपायकारक घटकांमुळे बंदी घातली होती. यामुळे भारतीय भाज्यांसाठी युरोपची कवाडे पुन्हा खुली झाली आहेत. तब्बल ३ वर्षांपासून शेतकरी आणि निर्यातदारांना या बंदीमुळे मोठ्या आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागले होते. पण आता पुन्हा एकदा व्यापाराचे दार खुले झाले आहे.

कृषी मंत्रालयातील अधिकारी कोची आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मालवाहतूक विभागाच्या वतीने आयोजित परिसंवादाला उपस्थित होते. अरोरा यांनी या परिसंवादात युरोपीय समुदायाने भारतातून आयात होणाऱ्या भाज्यांवरील बंदी उठविली असून, याबबतचे पत्र कृषी मंत्रालयाला मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतातून आयात होणाऱ्या काही भाज्यांवर युरोपीय समुदायाने मे २०१४मध्ये तीन वर्षांसाठी बंदी घातली होती. यात आंबा, कारले, पडवळ, वांगे आणि अळूचा समावेश होता. या भाज्यांमधील काही हानीकारक घटक संपूर्ण युरोपच्या जैवसुरक्षेला धोका निर्माण करणारे असल्याचे युरोपीय समुदायाने म्हटले होते. या निर्णयामुळे भारतातील शेतकरी आणि निर्यातदारांना मोठा फटका बसला होता.

https://t.me/chalughadamodi/3651

फिल्मफेअर पुरस्कार २� ��१७ :-
------------------------------------------
सर्वोत्कृष्ट चित्रपट- दंगल
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- नितेश तिवारी (दंगल)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- आमिर खान (दंगल)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट (उडता पंजाब)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता- दिलजीत दोसांज (उडता पंजाब)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री- रितीका सिंग (साला खडूस)
सर्वोत्कृष्ट चित्रपट (प्रेक्षकांची निवड)- खामखा
सर्वोत्कृष्ट लघुपट (फिक्शन)- चटणी
सर्वोत्कृष्ट लघुपट (नॉन फिक्शन)- मातीतली कुस्ती
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (लघुटप)- तिस्का चोप्रा (चटणी)
सर्वोत्कृष्ट संवाद- रितेश शाह (पिंक)
सर्वोत्कृष्ट पटकथा- शकुण बत्रा, आएशा देवित्रे ढिल्लोन (कपूर अॅण्ड सन्स)
सर्वोत्कृष्ट सहकलाकार (अभिनेता)- ऋषी कपूर (कपूर अॅण्ड सन्स)
फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार- शत्रुघ्न सिन्हा
सर्वोत्कृष्ट संगीत- प्रितम (ऐ दिल है मुश्किल)
सर्वोत्कृष्ट गीतकार- अमिताभ भट्टाचार्य (ऐ दिल है मुश्किल 'चन्ना मेरेया')
सर्वोत्कृष्ट गायक- अरिजीत सिंग (ऐ दिल है मुश्किल शीर्षक गीत)
सर्वोत्कृष्ट गायिका- नेहा भसिन (सुलतान 'जग घुमिया')
सर्वोत्कृष्ट वीएफएक्स- फॅन
सर्वोत्कृष्ट एडिटिंग- मोनिष बालदवा (नीरजा)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा- पायल सलुजा (उडता पंजाब)
सर्वोत्कृष्ट साहसदृश्य- श्याम कौशल (दंगल)
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन- आदिल शेख (कपूर अॅण्ड सन्स 'कर गयी चुल')
समीक्षक पुरस्कार
सर्वोत्कृष्ट चित्रपट- नीरजा
सर्वोत्कृष्ट अभिनेता- मनोज वाजपेयी (अलिगढ), शाहिद कपूर (उडता पंजाब)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- सोनम कपूर (नीरजा)

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹'सायकल'वर अखिलेश स्वार; मुलायमसिंह पेचात

सायकल या निवडणूक चिन्हावरील अखिलेश यादव यांचा दावा निवडणूक आयोगाने मान्य केला असून, त्यांना हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये सायकल या पक्षाच्या अधिकृत चिन्हाचा फायदा अखिलेश यांच्या नेतृत्वाखालील गटाला होणार आहे. दरम्यान, म� �लायमसिंह कोणत्या चिन्हावर निवडणूक लढविणार याबाबत उत्सुकता आहे.

समाजवादी पक्षात उभी पडल्यानंतर मुलायमसिंह आणि शिवपाल यांचा एक गट, तर मुख्यमंत्री अखिलेश आणि रामगोपाल यादव यांचा दुसरा असे गट निर्माण झाले. या दोन्ही यादव गटांनी विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पक्षातील दोन्ही गटांनी 'सायकल' या पक्षाच्या अधिकृत चिन्हावर दावा केला होता.

याब� ��बतचा निर्णय निवडणूक आयोगाने राखून ठेवला होता. या वादामुळे जर निवडणूक आयोगाने सपाचे चिन्ह गोठविण्याचा निर्णय घेतला, तर सपाने आपल्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असा पर्याय लोकदालाचे नेते सुनील सिंग यांनी मुलायमसिंह यादव यांच्यापुढे ठेवला आहे.

'बियाणे लावताना शेतकरी' हे लोकदलाचे निवडणूक चिन्ह आहे. या चिन्हावर मुलायमसिंह आता निवडणूक लढविणार का याबाबत उत्सुकता आहे.

#eMPSCkatta_Current_Affai rs

🔹भारतात 58% संपत्ती 1 टक्क्याच्या हाती!

https://t.me/chalughadamodi/3663

जागतिक आर्थिक परिषदेच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफॅम या जगप्रसिद्ध संस्थेने मांडलेल्या अहवालामध्ये भारतामधील एकूण संपत्तीच्या 58% संपत्ती देशातील केवळ 1 टक्का लोकसंख्येच्या हाती एकवटली असल्याची माहिती देण्यात आली आहे. भारतामधील एकूण संपत्ती ही 3.1 लाख कोटी डॉलर्स इतकी आहे.

याचबरोबर देशातील केवळ 57 अब्जाधीशांकडे देशातील 7 0% लोकसंख्येइतकीच संपत्ती असल्याचेही या अभ्यासाद्वारे निष्पन्न झाले आहे. भारतामध्ये सध्या 84 अब्जाधीश असून त्यांची एकत्रित संपत्ती 248 अब्ज डॉलर्स इतकी असल्याचे ऑक्सफॅमने म्हटले आहे. रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे यांमध्ये आघाडीवर आहेत. अंबानी यांची एकूण संपत्ती 9.3 अब्ज डॉलर्स इतकी आहे.

जगातील अतिश्रीमंत व गरीब यांच्यामधील आर्थिक दरी ही गेल्या वर्षीच्या तु लनेत अधिक रुंदावली असल्याचे निरीक्षण ऑक्सफॅमने नोंदविले आहे. याचबरोबर, या समस्येवर केवळ भाषणे ठोकण्यापेक्षा खरी उपाययोजना करण्यात यावी, असे आवाहनही संस्थेकडून करण्यात आले आहे. या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यात न आल्यास अशा स्वरुपाच्या असमानतेच्या विरोधातील जनतेमध्ये असलेला संताप वाढून त्यामुळे मोठे राजकीय बदल घडण्याचा इशाराही संस्थेकडून देण्यात आला आहे.

#eMPSCkatta_Current_Af fairs

🔹चीनने पाकला दिल्या सागरी टेहळणी नौका

"चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर'नजीक असलेल्या संवेदनशील सागरी मार्गांच्या सुरक्षेसाठी चीनने पाकिस्तानला दोन सागरी टेहळणी नौका दिल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे.

पाकिस्तानी नौदलाचे कमांडर व्हाईस ऍडमिरल अरिफुल्लाह हुसैनी यांनी या नौका औपचारिकरित्या चीनकडून स्वीकारल्या. पीएमएसएस हिंगोल आणि पीएमएसएस बसोल असे या नौकांचे नामकर ण करण्यात आले आहे. हिंगोल व बसोल या बलुचिस्तानमधील दोन प्रमुख नद्या आहेत. पाकिस्तानमधील एक प्रमुख वृत्तपत्र असलेल्या "डॉन'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

"या नौका या पाकिस्तानी नौदलाचा एक भाग बनल्या आहेत. या नौकांच्या समावेशामुळे पाकिस्तानी नौदल अधिक सामर्थ्यशाली बनले आहे,'' अशी प्रतिक्रिया हुसैनी यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना व्यक्त केली. चीन व पाकिस्तानमधील मैत्री ही द� ��वसेंदिवस महासागरापेक्षाही सखोल होऊ लागल्याची भावनाही त्यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना व्यक्त केली.

चीनकडून पाकिस्तानला "दश्त'व "झोब' या अन्य दोन नौकाही देण्यात येणार आहेत. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानकडून याआधीच सैन्यातील एक नवी "डिव्हिजन' तैनात करण्यात आली आहे. या कॉरिडॉरच्या निर्मितीसाठी एकूण 54 अब्ज डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे. जागतिक राजका� ��णाचे केंद्रस्थान दक्षिण-पूर्व आशियाकडे झपाट्याने झुकत असल्याच्या पार्श्वभूमीवर उदयास आलेली ही योजना अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.

https://t.me/chalughadamodi/3665

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सानेगुरुजी युवा पुरस्कार प्रदान

https://t.me/chalughadamodi/3667
विलेपार्ले येथील हुंडाविरोधी चळवळ या सामाजिक संस्थेतर्फे स्वातंत्र्यसैनिक, चळवळीचे प्रणेते आणि सानेगुरुजींचे मानसपुत्र दा. ब. तथा मामासाहेब कुलकर्णी यांच्या स्मृत्यर्थ नुकताच साने गुरुजी युवा पुरस्कार आणि युवा वैज्ञानिक पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला.

पर्यावरणरक्षण, इंधनबचत यांसारख्या अनेक लोकोपयोगी संशोधनात भरीव योगदान असलेला नाशिकच्या विनायक रानडे यांना य� ��वर्षी 'सानेगुरुजी युवा वैज्ञानिक पुरस्कारा'ने गौरवण्यात आले. तर राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चेंबूरमधील जान्हवी विलास लोकेगावकर हिला 'साने गुरुजी युवा पुरस्कार' प्रदान करण्यात आला. साठ्ये कॉलेजच्या सभागृहात हॉटेल व्यावसायिक डॉ. विठ्ठल कामत आणि हुंडाविरोधी चळवळीच्या विश्वस्त डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

य� ��वा दिनानिमित्त राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय कोल्हापूरच्या जयंतकुमार काटकर या विद्यार्थ्याने विद्यापीठासाठी 'राजेंद्र शील्ड' आणि कॉलेजसाठी 'लक्ष्मीदेवी भीष्म आर्य चषक' जिंकला. वैयक्तिक प्रथम क्रमांकासाठी त्याला चषक, एक हजार रु. रोख, प्रशस्तीपत्र व पुस्तके देऊन � �ौरवण्यात आले. मुंबई विद्यापीठाचा नीतेश रायकर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची रेणुका भापकर यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. पुणे येथील प्रा. शैलजा सांगळे व डॉ. सुजाता फडके यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले, तर चळवळीच्या महासचिव आशा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन केले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹देशातील 44 विमानतळे 'उडान'साठी अनुकूल

https:/ /t.me/chalughadamodi/3669

'फिक्की'च्या अहवालातील माहिती ; मेट्रो शहरे, पर्यटन केंद्रांचाही अभ्यास

अमरावती (आंध्र प्रदेश): देशातील 44 विमानतळांचा "उडान' या प्रादेशिक हवाई संपर्क यंत्रणेसाठी (आरसीएस) अधिक प्रभावीपणे वापर करता येऊ शकतो, असे उद्योग क्षेत्रातील अग्रणी संघटना "फिक्की'ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. भौगोलिक परिसर, प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि व्यावसायिक परिमाणांचा विचार क ेला, तर देशातील 414 पैकी 44 विमानतळांचा प्रादेशिक हवाई संपर्क यंत्रणेच्या उभारणीसाठी वापर करता येईल. यामध्ये ज्या विमानतळांचा अजिबातच वापर केला जात नाही आणि ज्यांचा फार कमी वापर होतो, अशा दोन्ही गटांतील विमानतळांचा समावेश आहे.

मेट्रो शहरे, विविध राज्यांच्या राजधान्या, महत्त्वाच्या औद्योगिक, व्यावसायिक आणि पर्यटन केंद्रांवर असणाऱ्या 370 विमानतळांची यादी आम्ही तयार केली असल्� �ाचे "फिक्की'
च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेवा कंपनी "केपीएमजी'च्या सहकार्याने हा अहवाल तयार करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील चार, महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, आसाम या राज्यांतील प्रत्येकी तीन, अरुणाचल प्रदेश, मेघालय, बिहार, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, गुजरात, छत्तीसगडमधील प्रत्येकी दोन, आंध्र प्रदेश, तेलंगण, तमिळनाडू, ओडिशा, जम्मू आणि काश्मीर, पुदुच्चेरी, लक्षद� �वीप, दमण आणि दिवू, हरियाना, मध्य प्रदेश, झारखंड आणि उत्तराखंडमधील प्रत्येकी एका विमानतळाचा यासाठी वापर केला जाऊ शकतो.

सामान्यांचा प्रवास

"आरसीएस' यंत्रणेच्या उभारणीसाठी 22 राज्यांनी पुढाकार घेतला असून, 30 विमानतळांना या यंत्रणेमध्ये तातडीने सामावून घेणे शक्य असल्याचे केंद्रीय हवाई वाहतूक सचिव राजीव नयन चौबे यांनी सांगितले. राष्ट्रीय हवाई वाहतूक धोरण-2016 अन्वये आरसीएस / उडा ण (उडे देश का आम नागरिक) ही योजना सुरू करण्यात आली. यामुळे हवाई प्रवास हा सामान्य नागरिकाच्या आवाक्यात येणार आहे.

"आरसीएस'समोरील आव्हाने
निधी आणि पायाभूत सुविधांची चणचण
समान आकारांची विमाने हवीत
अनेक विमानतळांवर मोठे रन वे नाहीत
वेगवान वाहतुकीसाठी छोटी विमाने हवीत
सध्या भारतीय हवाई क्षेत्रात वैमानिकांचा तुटवडा
लहान विमानांसाठी वेगळे वैमानिक आणि कर्मचारी लागतात. वैमानिक आणि अभियंते एका रात्रीत तयार करणे शक्य नसते. त्यांना आधी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

अरुण मिश्रा, प्रादेशिक संचालक, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना
विमानांचे अर्थकारण
सध्या भारतात दरवर्षी दोनशे ते तीनशे वैमानिक तयार होतात. चीनचा विचार केला तर तेथील नागरी विमान वाहतूक विद्यापीठामध्ये दोन हजार केवळ प्रशिक्षक आहेत. तेथे प्रशिक्षणासाठी 265 विमानांचा वापर केला जातो, असे आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विमान वाहतुकीचे अर्थव्यवस्थेवरदेखील दूरगामी परिणाम होतात. देशात येणारे एक विमान प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्� ��रीत्या सहाशे नोकऱ्यांची निर्मिती करते, असे मिश्रा यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹टांझानियाच्या अल्फोन्स सिम्बूने मुंबई मॅरेथॉन जिंकली

https://t.me/chalughadamodi/3671

पाच महिन्यांपूर्वी रिओत झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत पाचवे स्थान मिळवणाऱ्या टांझानियाच्या अल्फोन्स सिम्बूने मुंबई जिंकली आणि आजवरच्या 13 स्पर्धांमध्ये राहिलेले केनिया, इथिओपियाच्या धावपटूंचे वर्चस्व मोडून काढले. महिल� �ंमध्ये मात्र केनियाच्या बोर्नेस किटूरने बाजी मारली.

रिओ ऑलिंपिकमध्ये जगभरातील नावाजलेल्या धावपटूंसह धावण्याच्या अनुभवाचा फायदा सिम्बूला मिळाला. मॅरेथॉनमधले हे त्याचे पहिलेच विजेतेपद आहे. त्याने विजेतेपदाच्या 42 हजार डॉलरचीही कमाई केली. केनियाच्या जोशूआ किपकोरिरबरोबर त्याची चांगली स्पर्धा झाली. अखेरच्या एक किलोमीटरपर्यंत तो एक पाऊल मागे होता; परंतु अंतिम टप्प्यात त्� ��ाने अनुभव पणास लावत 13 सेकंदांनी बाजी मारली.

यंदाच्या मुंबई मॅरेथॉनवर केनियाच्या लेवी मेताबो व इथिओपियाच्या सेबोका दिबाबा यांना विजेतेपदासाठी पसंती देण्यात आली होती; परंतु हे दोघेही पहिल्या पाच स्पर्धकांतही आले नाहीत. वातावरणात फरक पडल्यामुळे यंदा स्पर्धा विक्रम होण्याची शक्यता कमी होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 7.20 मिनिटांनी ही एलिट शर्यत सुरू झाल्याव� �� प्रथम पेसमेकर आघाडीवर होते. त्यानंतर आघाडीवर असलेल्या जथ्यामध्ये सिम्बू दोन पावले मागेच होता. पेडर रोड येथील पूल आणि चढ हा स्पर्धकांची परीक्षा घेणारा असतो. सिम्बू मुंबईत प्रथम धावत असला तरी त्याचा अंदाज होता यापेक्षा त्याने तसा सराव केला होता. टांझानियामध्येही असे चढ आहेत. मी तसे चढ असलेल्या ठिकाणी सराव केला होता. त्यामुळे मला मुंबईत कठीण गेले नाही, असे त्याने सांगितले.
परतीच्या मार्गावर अखेरच्या टप्प्यात 10 किलोमीटरची शर्यत सुरू झाली तरी सिम्बू पाठीमागे होता; मात्र अखेरच्या आठ किलोमीटरमरध्ये गिअर बदलल्यावरही तो किपकोरिरपेक्षा एक पाऊल मागे होता. त्याने या वेळी आघाडी घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्याला गाफील ठेवले आणि अखेरच्या एका किलोमीटरमध्ये वेग वाढवत विजय मिळवला.

अनुभव केवळ दोन वर्षांचा
अल्फोन्स सिम्बू याच्याकडे मॅरेथॉनचा अनुभव केवळ दोनच वर्षांचा आहे. 2015 मध्ये झालेल्या जागतिक चॅंपियन्स स्पर्धेत तो पहिल्यांदा सहभागी झाला. त्यानंतर रिओ ऑलिंपिकमध्ये त्याने पाचवे स्थान मिळवले होते. त्याचे वडील फेलिक्स हे फुटबॉलपटू आहेत. ऍथलिटचा पाया असल्यामुळे अल्फोन्सने मॅरेथॉन धावपटू व्हायचे ठरवले.

महिलांमध्ये इथिओपियाच्या दिक्नेश मेकाशला मुंबई मॅरेथॉन तिसऱ्यांदा ज� �ंकण्याची संधी होती; परंतु तिला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. केनियाच्या बोर्नेस किटूरने सहजच विजय मिळवला. किटूर आणि दुसऱ्या स्थानी आलेल्या चाल्तू ताफा यांच्यात तब्बल चार मिनिटांचा फरक राहिला. एलिट महिला धावपटूंमध्ये ज्योती गवते नववी आली.

निकाल ः

एलिट पुरुष ः- 1) अल्फोन्स सिम्बू (टांझानिया, 2.09.32 मि.) 2) जोशुआ किपकोरिर (केनिया, 2.09.50), 3) इल्यूड बॅरेंग्यटूनी (केनिया, 2.10.39), 4) जेकब चेसारी (केनिया, 2.11.36) 5) बोन्सा दिदा (इथिओपिया, 2.11.55).

एलिट महिला ः- 1) बोर्नेस किटूर (केनिया, 2.29.02), 2) चाल्तू ताफा (इथिओपिया, 2.33.03), 3) तिगिस्ट गिर्मा (इथिओपिया, 2.33.19), 4) मंग्लादेना शारूई (टांझानिया, 2.34.51), 5) दिक्नेश मेकाश (इथिओपिया, 2.36.44).

पूर्ण मॅरेथॉन (भारत, पुरुष) ः- 1) खेता राम (2.19.51), 2) बहाद्दूरसिंग धोनी (2.19.57), 3) टी. एच. संजित (2.21.19), 4) इलाम सिंग (2.21.27), 5) राहुल कुमाल पाल (2.21.43).

पूर्ण मॅरेथॉन (भारत महिला) ः- 1) ज्योती गवते (2. 50.53), 2) शाल्मली सिंग (3.07.41), जिग्मत दोलमा (3.14.38).

भारत अर्धमॅरेथॉन पुरुष ः- 1) जी. लक्ष्मण (1.05.05), 2) सचिन पाटील (1.06.22), 3) दीपक कुंभार (1.06.28).

भारत अर्धमॅरेथॉन महिला ः- 1) मोलिका आथरे (1.19.13), 2) मीनाक्षी पाटील (1.20. 53), 3) अनुराग सिंग (1:25:20).

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹१ जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होणार

https://t.me/chalughadamodi/3673
केंद्र सरकारचा प्रस्तावित वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) एक एप्रिल ऐवजी एक जुलै २०१७ पासून लागू होणार असल्याची महत्वपूर्ण माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज दिली. एक एप्रिल रोजी जीएसटी लागू करण्यात येणार होती परंतु यावर एकमत न झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे जेटली म्हणाले.

जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय झाला असून आधी १ एप्रिल २०१७ पासून जीएसट� � लागू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु केंद्र आणि राज्यांच्या विविध मागण्यांमुळे १ जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली आल्याचे जेटली यांनी सांगितले.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्त माहिती दिली. दीड कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांच्या कराच्या मुल्यांकनाचा अधिकार राज्याला द्यावा, अशी अनेक राज्यांची मागणी होती. यावर आजच्या बैठकीत तोडगा काढण्यात आला. ९० टक्के कराचा अधिकार राज्याला असेल तर उर्वरित १० टक्के कराचा अधिकार केंद्राला असेल, असे आजच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आल्याचे जेटली यांनी सांगितले.

केंद्र आणि राज्यांचे अर्थमंत्री आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात व्यस्त असल्याने जीएसटी संदर्भात पुढील बैठक १८ फेब्रवारी रोजी ठेवण्यात येणार असल्याची माहितीही जेटल� �� यांनी यावेळी दिली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नोटाबंदीमुळे भारताचा विकासदर ६.६ टक्क्यांपर्यंत खाली घसरण्याची शक्यता- आयएमएफ

https://t.me/chalughadamodi/3675

केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर घसरण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) वर्तवली आहे. उपभोक्त्यांच्या साखळीला बसलेल्या तात्पुरत्या नकारात्मक धक्क्यामुळे आयएमएफने भार� �ाच्या विकासदराबाबत यापूर्वी वर्तविलेल्या अंदाजात बदल केल्याचे म्हटले आहे. यापूर्वी आयएमएफने २०१६-१७ या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर ७.६ टक्के इतका राहील, असे सांगितले होते. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयानंतरच्या परिस्थितीचा विचार करता आयएमएफने यामध्ये विकासदरात तब्बल एका टक्क्याची घट होऊन तो ६.६ टक्क्यांपर्यंत खाली घसरेल, असे म्हटले आहे.

 नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या अभूतपूर्व चलनटंचाईमुळे आणि व्यवहारांतील अडचणींमुळे उपभोक्त्यांवर तात्पुरता नकारात्मक परिणाम झाल्याचे आयएमएफने सांगितले. उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसित देशांमध्ये २०१६ साली थंडावलेली उत्पादन पक्रिया २०१७ आणि २०१८ मध्ये वेग पकडण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाचा विकास होईल, असा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांच्या दा� �्याला छेद देणारी औद्योगिक क्षेत्राची आकडेवारी प्रसिद्ध झाली होती. यामध्ये देशातील मुख्य औद्योगिक क्षेत्रांचा विकास दर मंदावल्याचे समोर आले होते.

 देशातील आठ मुख्य औद्योगिक क्षेत्रांचा यामध्ये समावेश आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये या औद्योगिक क्षेत्रांचा विकासदर ६.६ टक्के इतका होता. जानेवारी महिन्यात हा दर तब्बल दीड टक्क्यांनी खालावला असून ४.९ टक्क्यांवर आला होता. मोदी सरकारच� ��या पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णयावर विरोधक गेल्या काही दिवसांपासून सडकून टीका करत आहेत. या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि उद्योगक्षेत्रावर विपरीत परिणाम होण्याची भीती यापूर्वीही अनेकजणांनी बोलून दाखविली होती. मात्र, भाजप नेत्यांकडून नोटाबंदीचे समर्थन केले जात असून हा निर्णय कशाप्रकारे योग्य आहे, हे वारंवार पटवून देण्याचा प्रयत� �न होत आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाटचालीबाबत समाधान व्यक्त केले होते. आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहामाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ७.२ टक्के राहिला असून, जगातील सर्वात वेगाने विकास करीत असलेली अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान अबाधित असल्याचा दावा जेटली यांनी केला होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सर्वसमावेशक विकास ात भारत हा चीन आणि पाकिस्तानपेक्षाही मागे

https://t.me/chalughadamodi/3677
सर्वसमावेशक विकासाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या जगातील ७९ विकसित राष्ट्रांच्या यादीत भारताला ६० वे स्थान मिळाले आहे. जागतिक आर्थिक मंचाद्वारे (डब्ल्यूईएफ) सोमवारी 'समावेशक वाढ आणि विकास अहवाल २०१७' प्रकाशित करण्यात आला. या अहवालानुसार , समावेशक विकास निर्देशंकात भारताला शेजारच्या पाकिस्तान आणि चीन यांच्यापेक्षाही खालचे म्हणजे ६० वे स्थान मिळाले आहे. या अहवालात म्� ��टल्याप्रमाणे बहुतांश विकसित राष्ट्रांमध्ये आर्थिक विकासाच्या संधी आणि विषमता कमी करण्याच्या संधींना मुकावे लागत आहे. यासाठी धोरणकर्त्यांकडून तयार करण्यात येणारे विकासाचे प्रारूप आणि विकास मोजण्याच्या निकषांमधील त्रुटी कारणीभूत आहेत. त्यामुळे या सगळ्यांमध्ये आमुलाग्र बदल होण्याची गरज असल्याचे 'डब्ल्यूएफ'च्या अहवालात म्हटले आहे.

१२ निर्देशक घटकांच्या आधारे हा अह� ��ाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये देशाच्या सकल राष्ट्रीय उत्त्पनाशिवाय (जीडीपी) वाढ आणि विकास, समावेशकता आणि शाश्वतपणा या अन्य तीन निकषांचाही विचार करण्यात आला होता. या सर्व निकषांच्याआधारे तयार करण्यात आलेल्या ७९ देशांच्या यादीत लिथुआनिया या देशाने पहिला क्रमांक पटकावला असून अझेरबैजान व हंगेरी या दोन राष्ट्रांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले आहे. मात्र, या यादीत भ� ��रत जवळपास तळाला म्हणजे ६० व्या स्थानावर फेकला गेला आहे. विशेष गोष्ट म्हणजे भारताची शेजारी राष्ट्रे भारतापेक्षा वरच्या स्थानावर आहेत. यामध्ये चीन १५ व्या, नेपाळ २७ व्या , बांगलादेश ३६ व्या आणि पाकिस्तान ५२ व्या स्थानावर आहे. याशिवाय, ब्रिक्स राष्ट्रांपैकी एक असणारे रशिया आणि ब्राझील अनुक्रमे १३व्या आणि ३०व्या स्थानावर आहेत. प्रचंड मनुष्यबळ आणि प्रति माणसी जीडीपीच्याबाबतीत � ��गातील पहिल्या दहा देशांमध्ये असूनही भारताला यादीत ६० वे स्थान मिळाले आहे, ही बाब निश्चितच लक्ष वेधून घेणारी आहे. दरम्यान, विकसित राष्ट्रांसाठी अशाचप्रकारे तयार करण्यात आलेल्या अहवालात नॉर्वेने पहिला क्रमांक मिळवला आहे. तर लक्झेम्बर्ग , स्वित्झर्लंड, आईसलँड आणि डेन्मार्क या राष्ट्रांनी अनुक्रमे पहिल्या पाचांमध्ये स्थान पटकावले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹खराब हवामानामुळे 2016 मध� �ये 1600 हून अधिक बळी

उष्णतेच्या लाटेमुळे सर्वाधिक बळी गेल्याची नोंद : थंडीमुळेही 53 जणांनी प्राण गमावले

मागील वर्षी खराब हवामानामुळे देशभरात 1600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. एकूण बळींपैकी 40 टक्के मृत्यू वाढत्या उष्म्यामुळे झाले आहेत. त्याचबरोबर महापूर आणि वीज कोसळून ठार झालेल्यांची संख्याही मोठी असल्याचे उघड झाले आहे. देशाचा विचार करताना बिहारमध� �ये सर्वाधिक बळी गेल्याचे दिसून आले आहे. बिहार, गुजरात आणि महाराष्ट्र या तीन राज्यांत मिळून 552 लोकांचे बळी गेले होते.

भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 2016 हे वर्ष भारताबरोबरच संपूर्ण देशात सर्वाधिक उष्णतेचे वर्ष ठरलेले आहे. देशात राजस्थानमध्ये सर्वाधिक 51 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती. राजस्थानबरोबरच बिहार, गुजरात, महाराष्ट्र या राज्यांना ही वाढत्या उष्म्याचा फटका बसला होता.

मागील वर्षी हिवाळय़ाचे दिवस असूनही जानेवारी आणि फेबुवारी या दोन महिन्यात उष्णतेचे प्रमाण वाढले होते. त्यानंतर उन्हाळय़ाच्या हंगामात तर तापमानाने परमोच्च बिंदू गाठत 1901 पासूनचे सर्व विक्रम मोडीत काढत 50 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला होता. भारतीय हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार देशभरात जवळपास 700 हून अधिक बळी केवळ उष्माघ� �तामुळे गेलेले आहेत. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील उष्माघाताच्या बळींचा आकडा 400 हून अधिक आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात अनुक्रमे 87 आणि 43 बळींची नोंद झालेली आहे.

उष्माघाताबरोबरच काही भागात पसरलेल्या थंडीच्या लाटेमुळेही काही जणांना प्राण गमवावे लागले. थंडीच्या लाटेमुळे देशात 53 जणांचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. पावसाळय़ाच्या दिवसात कोसळणाऱया वीजांमुळे देशात 415 जणांचा मृत्यू झाला. या बळींची संख्या बिहार, ओडिशा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सर्वाधिक आहे. वीज पडल्यामुळे ओडिशामध्ये 132 जण दगावले असून महाराष्ट्रात 43 जण मृत्युमुखी पडले होते.

पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती आणि नैसर्गिक दुर्घटनांमुळे ठार झालेल्यांचा आकडा जवळपा 475 इतका आहे. केवळ बिहारमध्ये महापुरामुळे 146 जण दगावले होते. पावसाळय़ानंतर वर्षअखेरीस बंगाल च्या उपसागरात धडकलेल्या वरदा चक्रीवादळाचा तामिळनाडूला फटका बसला होता. यात 18 जण ठार झाले होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹श्रीमंत अरबांवर चित्ता, वाघ, सिंह पाळण्यात सौदी सरकारने घातली बंदी

सौदी अरेबिया जगातील श्रीमंत देशांपैकी एक आहे. तेल व्यवसायामुळे या देशाने अक्षरश: सोन्याचे दिवस पाहिलेत. तेल व्यवसायाने येथील अरब कोट्यधीश झाले. या गर्भश्रीमंत अरबांच्या घरात जगातील अनेक महागड्या � �स्तू पाहायला मिळतील. या अरबांच्या सवयीही फार विचित्र आहेत. आता हेच बघा ना सौदी अरेबियातील अनेक श्रीमंत अरबांच्या घरात चक्क पाळीव प्राणी म्हणून कुत्रा, मांजर नाही तर चित्ता, बिबटे, वाघ, सिंह असे हिंस्त्र प्राणी पाहायला मिळतात. पण आता अनेक प्राणीप्रेमी संघटनांच्या दबावानंतर या देशाने चित्ता, बिबटे, वाघ, सिंह असे हिंस्त्र प्राणी पाळणे यापुढे कायद्याने गुन्हा ठरवला आहे. तसेच एखाद ्याच्या घरात यापुढे असे प्राणी दिसले तर त्याला तुरुंगवासाची शिक्षाही केली जाणार असल्याचे जाहिर केले आहे.

सौदी अरेबियातील अनेक श्रीमंतांकडे आणि राजघराण्यातील लोकांकडे चित्ता, बिबटे, वाघ, सिंह असे हिंस्त्र प्राणी आहेत. याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी सिंहाच्या पाठीवर बसून मजा मस्ती करणा-या एका राजपुत्राचा फोटो जगभरातील सोशल मीडियावर व्हाय� ��ल झाला होता. त्याचप्रमाणे गाडीला बांधून ठेवलेल्या चित्त्याचा फोटोही व्हायरल झाला होता. येथील अनेक श्रीमंत लोक घरात असे हिंस्त्र प्राणी पाळणे प्रतिष्ठेचे मानतात. इतकेच नाही तर असे प्राणी पाळण्याची या राजपुत्रांमध्ये आणि श्रीमंत सौदी पुरूषांमध्ये स्पर्धाच लागते. या श्रीमंत पुरूष मंडळीचे सौदीच्या किना-यावर वाघ, सिंह सारख्या प्राण्यांच्या गळ्यात पट्टे घालून फिरवतानाचे फो� �ोही सोशल मीडियाच्या माध्यामातून व्हायरल झाले होते. जगभरात चित्ता, बिबटे, वाघ, सिंह अशा हिंस्त्र प्राण्यांच्या प्रजाती अत्यंत धोक्यात आहेत. या प्रजाती जवळ जवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. असे असताना या श्रीमंताकडे दिसणा-या प्राण्यांवरून जगातील अनेक प्राणीप्रेमी संघटनांनी आक्षेप घेतला होता.

अनेक आंतरराष्ट्रीय प्राणीप्रेमी संघटनांनी सौदी अरेबियावर या प्राण्यांना पाळ� ��्यास बंदी घालावी यासाठी दबाव आणला होता. अखेर सौदी सरकारने हे प्राणी पाळण्यास बंदी घातली आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार आता सौदी अरेबियात चित्ता, बिबटे, वाघ, सिंह असे प्राणी पाळणे कायद्याने गुन्हा असणार आहे. यासाठी या श्रीमंतांना नऊ लाखांपर्यंत दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹लान्स नायक हनुमंतप्पा कोप्पद यांना मरणोत्तर शौर्य पुर स्कार

https://t.me/chalughadamodi/3681
जगातील अती उंचीवरील युद्धभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱया सियाचीन येथे वीरमरण आलेले धारवाडमधील लान्स नायक हनुमंतप्पा कोप्पद यांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

सियाचीन येथे सेवेत असताना भूस्खलनानंतर बर्फाखाली सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर हनुमंतप्पा कोप्पद यांनी अखेरचा श्वास घेतला होता.

 दिल्लीतील आर. आर. इस्पितळात त्यांची प्राणज्योत मालवली होत� ��. त्यांच्या देशकार्याची दखल घेत सैन्यदलातर्फे मरणोत्तर शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे सेना दिवसानिमित्त पार पडलेल्या कार्यक्रमात सैन्यदल प्रमुख बिपीन रावत यांच्याकडून हनुमंतप्पा यांच्या पत्नी महादेवी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमप्रसंगी विविध घटनांमध्ये वीरमरण पत्करलेल्या 15 जणांना मरणोत्तर शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले.

#eMPSCkatta_Current_Affair s

🔹लंडनच्या रस्त्यांवरील कोंडी संपविणार फ्लाईंग वॉटर टॅक्सी

 लंडनच्या थेम्स नदीच्या प्रवाहात चालविल्या जाणाऱया फ्लाईंग वॉटर टॅक्सीची या वर्षाच्या अखेरपर्यंत चाचणी घेतली जाऊ शकते. या नौकांना सीबबल म्हटले जाते आणि त्यांना हायड्रोफॉईल्सद्वारे पाण्याच्या वर उचलले जाते. यामुळे यांचा वेग 25 नॉट्सपर्यंत पोहोचतो. यामुळे याच्यातून केला जाणारा प्रवास 'जादूच्या चटई'वरून उडत असल्यासारखा आरामदायी वाटतो.

या नौका विशेष प्रकारे बनविण्यात आलेल्या जेटीसोबत येतात, ज्याच्या खाली पाण्याची अनेक टर्बाइन्स कार्यरत असतात. या टर्बाइन आणि सोलर पॅनलांद्वारे नौकांना ऊर्जा पोहोचविण्याचा यामागे विचार असतो. याप्रकारे या नौकांना इतर कोणत्याही बर्हिगत ऊर्जा स्रोत किंवा इंधनाची गरज भासणार नाही.

येत्या उन्हाळ्यात पॅरिसमध्ये सीन नदीत अशा 5 सीबबल नौकांची चाचणी सुरू होऊ शकते. या नौकांना बनविणाऱया कंपनीला अमेरिका आणि लंडन महापौराच्या कार्यालयाकडून देखील चर्चेसाठी बोलाविण्यात आले आहे.

हायड्रोफॉईल्समुळे सीबबलला पारंपरिक नौकांच्या तुलनेत कमी ऊर्जेची गरज भासते. हे पाण्याला ढकलण्याऐवजी कापत पुढे जाते, यामुळे कोणतीही लाट बनत नाही तसेच यामुळे पाण्याचा 40 टक्क्यांपर्यंत कमी दबाव लागतो. याचबरोबर डॉकमध्ये लावलेले टर्बाईन आणि सोलर पॅन� �द्वारेच नौकेच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण केल्या जातात.

जगातील कित्येक मोठी शहरे नदी आणि समुद्राच्या शेजारी वसलेली आहेत. या शहरांमध्ये प्रदूषणात घट करण्याचे प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नांमध्ये स्वयंचलित इलेक्ट्रिक व्हेईकल ग्रीन ट्रान्सपोर्ट व्यवस्था सामील आहे.
https://t.me/chalughadamodi/3683

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹राज्यातील 22 जीआयमध्ये जळगावातील केळी, वांग्यांचा समावेश

देशातील केळी उत्पादनात जळगावचा वाटा १६ टक्के आहे, पण भौगोलिक उपदर्शन (जीआय अर्थात जीआॅग्रॉफीकल इंडिकेशन) नसल्याने या केळीची वाताहत झाली. ही बाब लक्षात घेता जळगावच्या केळीला युरोप, आखाती राष्ट्रांची द्वारे खुली व्हावीत यासाठी तब्बल साडेतीन वर्षे अथक परिश्रमानंतर जळगावच्या केळीला जीआय म� ��नांकन मिळाले आहे. केळीप्रमाणेच भरीताच्या वांग्यांनाही जीआय मानांकन मिळाले आहे.

राज्यात आज फक्त २२ कृषी उत्पादनांना जीआय मानांकन मिळाले. त्यात फक्त जळगाव व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन उत्पादनांचा समावेश आहे. जिल्ह्यात मागील पाच वर्षे ५० हजार हेक्टरपर्यंत केळीची सरासरी लागवड झाली. देशाच्या केळी उत्पादनात जळगावचा वाटा १६ टक्के आहे. पण निर्यातीबाबत फारसी प ्रगती झाली नाही. पंजाब, दिल्ली, मुंबईपर्यंतच केळी पाठविण्यात येत होती. देशात उत्तर प्रदेश, छत्तीसगढ नव्हे तर सेव्हन सिस्टर राज्यांतही केळीची लागवड होऊ लागल्याने जळगावच्या केळीची मागणी कमी झाली. जळगावच्या केळीत फायबर अधिक आहे. तापी व गिरणा खोऱ्यातील गाळाच्या जमिनीत रसायनांच्या कमी वापरात केळी उत्पादन घेण्याचे वैशिष्ट्य शेतकऱ्यांनी जपले. पण निर्यातीची संधी मिळाली नाही.

क� �य आहे जीआय कायदा

९५ टक्के आंतराष्ट्रीय व्यापार हा जागतिक व्यापार संघटनेच्या देखरेखीत होतो. या संघटनेने उत्पादनांच्या निर्यातीसाठी जीआय कायदा आणला. देशात २००१ मध्ये तो स्वीकारण्यात आला. या कायद्यांतर्गत चार करारांनुसार जीआय मानांकन असलेल्या संस्थांना निर्यातीसाठी महत्त्व देण्यात येते. ही बाब जिल्ह्याचा कृषी विभाग व शेतकरी यांनी समजून घेतली.

तांदलवाडीच्या शेतकऱ्या� �चा पुढाकार

केळीला जीआय मानांकन मिळावे यासाठी तांदलवाडी (ता. रावेर) येथील शशांक पाटील व त्यांच्या सहकारी शेतकऱ्यांनी आपल्या निसर्गराजा कृषी विज्ञान मंडळाला जीआय मानांकन मिळावे यासाठी पुढाकार घेतला. मागील साडेतीन वर्षे त्यासाठी दिल्ली येथील वाणिज्य मंत्रालयांतर्गत आयोजित जीआय मानांकनच्या सुनावण्यांना हजेरी लावली. त्यासाठी रावेरातून ५० ते ५३ किलोचे केळीचे घड दिल्ली ये� ��े न्यावे लागायचे. दाक्षिणात्य जिल्ह्यातूनही केळीला मानांकन मिळण्यासाठी अर्ज आले होते. एवढी स्पर्धा असताना जळगावच्या शेतकऱ्यांनी बाजी मारली व जीआय मिळविले. ३० डिसेंबर २०१६ रोजी त्यासंबंधीचे पत्र वाणिज्य मंत्रालयाकडून मिळाले.

१६० देशांमध्ये निर्यात

जळगावची केळी व भरीताची वांगी यांची निर्यात होण्यास जीआय मानांकनामुळे चालना मिळेल. अलीकडेच आखाती राष्ट्रांमध्ये केळीच ी निर्यात झाली आहे. पाकिस्तानकडूनही केळीची मागणी आहे. ज्या संस्थांना जीआय मानांकन आहे त्यांच्या उत्पादनांच्या निर्यातीला जागतिक व्यापार संघटना प्राधान्य देते. जीआय मानांकन प्राप्त उत्पादन दर्जेदार, खात्रीलायक असल्याचा संकेत जागतिक व्यापार संघटनेने आपल्या व्यापारात सहभागी १६० देशांना दिला आहे. यामुळे आखाती, युरोप, आशियाई आदी १६० देशांमध्ये केळी व वांग्यांची निर्यात करत� �� येईल.

भरीताच्या वांग्यांनाही जीआय मानांकन
खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे माहेर असलेल्या आसोदा ता.जळगाव येथील किशोर चौधरी व त्यांच्या सहकारी शेतकऱ्यांनी नवनिर्मिती शेतकरी मंडळाच्या माध्यमातून भरीताच्या वांग्यांना जीआय मानांकन मिळण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाकडे नोंदणी केली. या मंडळानेही साडेतीन वर्षे सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून हे मानांकन मिळविले आहे. आसोदासह बामणोद, पाडळसा, भालोद भागातील भरीताची वांगी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात दीड हजार हेक्टरवर भरीताच्या वांग्यांची लागवड जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर या महिन्यांमध्ये केली जाते. त्याचे बियाणे कृषी केंद्रांवर मिळत नाही. हे बियाणे परंपरेनुसार खादीच्या स्वच्छ कापडात जतन केले जाते. वाफ्यात त्याची पावसाळ््याच्या सुरुवातीलाच रोपे तयार करतात. कांदे, भात प्रमाणे त्याच्या रोपांची लागवड केली जाते. साधारणत: ७५ ते ८० दिवसात त ्याचे उत्पादन सुरू होते. जळगावचे भरीत पुणे, मुंबईतील हॉटेलमध्येही पाठविले जाते. या वांग्यांच्या निर्यातीला चालना मिळावी यासाठी त्यांनीही जीआय मानांकन मिळविले. वांग्यांनाही ३० डिसेंबर २०१६ रोजी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयातर्फे मानांकन मिळाले. जिल्हा कृषी विभागाने पुणे येथील ग्रेट मिशन ग्रूप कन्सल्टन्सीचे डॉ.गणेश हिंगमिरे यांची यासाठी मदत झाली.

आमच्या कृषी विज्ञान मंड� �ाने साडेतीन वर्षांपूर्वी केळीला जीआय मानांकन मिळण्यासाठी वाणिज्य मंत्रालय (भारत सरकार) यांच्याकडे अर्ज केला. त्यासाठी आम्हाला तीनदा दिल्ली, मुंबई येथे केळी शास्त्रज्ञ, तज्ज्ञांसमोर सादरीकरण करावे लागले. स्पर्धा मोठी होती. पण जळगावच्या केळीचा गोडवा, त्याचे उपपदार्थ, त्यातील जीवनसत्व, फायबर ही वैशिष्ट्ये महत्त्वाची ठरली. अखेर आम्हाला यश मिळाले. -शशा

ंक पाटील, अध्यक्ष, निसर� ��गराजा कृषी विज्ञान मंडळ, तांदलवाडी ता.रावेर (जळगाव)

जळगावची भरीताची वांगी राज्यभर प्रसिद्ध आहेत. त्यांचा मोठा आकार, अत्यल्प बिया, पाणीदारपणा, विशिष्ट चव हे देशात कुठेच आढळत नाही. या सर्व वैशिष्ट्यांची नोंद केंद्रीय वाणिज्य विभागाने घेतली. याचा आम्हाला आनंद आहे. -किशोर चौधरी, अध्यक्ष, नवनिर्मिती शेतकरी मंडळ, आसोदे ता.जळगाव

जीआय मानांकनासाठी भाजीपाला, पपई व इतर पिके घेणारे श ेतकरीही अर्ज सादर करू शकतात. प्रक्रिया उद्योगांबाबतच्या अडचणी असल्याने उत्पादन जादा आले तर दर पडतात. पण जीआय मानांकनामुळे आपल्याला निर्यातीची द्वारे खुली होतील. कृषी विभाग त्यासाठी सतत मदतीसाठी पुढे येईल. -अनिल भोकरे, कृषी उपसंचालक, जळगाव

https://t.me/chalughadamodi/3685

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ओबामा यांचे नाव माशाला

https://t.me/chalughadamodi/3688
प्रशांत महासागरातील कुरे अटोल समुद्रात ३00 फूट खोलीवर सापडलेल्या छोट्या लालसर तपकिरी आणि सोनेरी रंगाच्या नव्याने सापडलेल्या माशाला शास्त्रज्ञांनी बराक ओबामा यांचे नाव दिले आहे. तोसानोईडेस प्रजातीतील हा मासा आहे. तो ओबामा यांच्या नावाने ओळखला जाईल. पपाहनॉमोकुआकिया सागरी राष्ट्रीय स्मारकाचा विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ओबामा यांनी आपल्या कारकीर्दीत घेतला. त्याम� ��ळे निसर्गाच्या संरक्षणास मोठी मदत झाली आहे. त्यामुळे ओबामा यांना हा बहुमान देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा मासा या स्मारकाच्या परिसरात आढळतो. हे स्मारक आता प्रशांत महासागरात १,५१0,000 वर्ग किमी परिसरात विस्तारले आहे. हा परिसर आता जगातील सर्वांत मोठा संरक्षित जमीन अथवा पाण्याचा भाग ठरला आहे. हा मासा जूनमध्ये सापडला होता. प्रशांत महासागरात असलेल्या अटोल रिफ्टच्या सर्वात उत्तरे� ��डील कुरे येथील शोध मोहिमेत हा मासा सापडला होता. हवाई येथील बिशप मुझियमचे सागरी जीवशास्त्रज्ञ रिचर्ड पायले यांनी या जातीच्या नर माशाचा शोध लावला. त्यानंतर काहीच दिवसात बिशप म्युझियमच्याच ब्रियान ग्रिने यांनी मादी माशाचा शोध लावला. या आधी अमेरिकेतील डक आणि
बफेलो या नद्यांत सापडणाऱ्या माशाला ओबामा यांचे नाव देण्यात आले होते. एथिओस्टोमा ओबामा असे त्याचे नामकरण करण्यात आले होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹बांगलादेशने मोडला ऑस्ट्रेलियाचा 121 वर्षे जुना विक्रम

क्रिकेटमध्ये दररोज नवनवे विक्रम होत असतात. प्रत्येक खेळाडू आणि संघाला असे विक्रम कायम प्रेरणा देत राहतात. मात्र खेळाच्या मैदानात असेही काही विक्रम घडतात, ज्याची आठवणसुद्धा संबंधित संघ आणि त्याच्या पाठीराख्यांना काढाविशी वाटत नाही. बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही असाच एक नकोसा विक्रम बांगलादेशच्या नावावर नोंदवला गेला आहे. विशेष बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या नावे असलेला 121 वर्षे जुना विक्रम मोडीत काढत बांगलादेशने हा नवा नकोस विक्रम नोंदवला आहे.

या कसोटीच्या पाचव्या दिवशी कर्णधार केन विल्यम्सनने केल ेल्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला. आता तुम्ही म्हणाल, त्यात विक्रम कसला, पण या कसोटीत पहिल्या डावात बांगलादेशने तब्बल 8 बाद 595 धावा कुटून आपला डाव घोषित केला होता. त्यामुळे बांगलादेशने पहिल्या डावात नोंदवलेली धावसंख्या ही एखाद्या पराभूत संघाने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या नोंदवलेली सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. त्याबरोबरच पराभूत ल ढतीतील पहिल्या डावात सर्वाधित धावा फटकावण्याचा ऑस्ट्रेलियाच्या नावे असलेला 121 वर्षे जुना नकोसा विक्रमही बांगलादेशने मोडीत काढला. ऑस्ट्रेलियन संघ 1894-95 इंग्लंडविरुद्धच्या एका कसोटी सामन्यात पहिल्या डावात 586 धावा फटकावल्यानंतरही पराभूत झाला होता. तसेच भारताविरुद्ध 2003 साली झालेल्या अॅडलेड कसोटीतही ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्या डावात 556 धावांचा डोंगर उभारल्यानंतरही पराभवाचे तो ंड पाहावे लागले होते. तर 2006-07 साली याच मैदानावर झालेल्या सामन्यात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 551 धावा फटकावल्यानंतरही पराभूत झाला होता.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या डावात साडे पाचशेहून अधिक धावा फटकावल्यानंतरही पराभूत होण्याची नामुष्की एखाद्या संघावर ओढवण्याची ही केवळ चौथीच वेळ आहे. याआधी केवळ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे संघच पहिल्या डावात 550 हून अधिक धावा फटकावल्या नंतरही पराभूत झाले होते. आता त्यात बांगलादेशची भर पडली आहे.

https://t.me/chalughadamodi/3690

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पडून डायनॉसॉर्सचा मृत्यू

डायनॉसॉर्सच्या मृत्यूनंतर सस्तन प्राण्यांचा उदय झाला

https://t.me/mpscscience/519
लघुग्रहाच्या आघातानंतर पृथ्वी थंड होत गेली व त्यामुळे ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी डायनॉसॉर्स नष्ट झाले असे एका नवीन अभ्यासात म्हटले आहे.

डायनॉसॉर्सच्या मृत्यूनंतर सस्तन प्राण्यांचा उदय झाला व नंतर पृथ्वीवर माणसांचे साम्राज्य आले. जर्मनीतील पोस्टडॅम इन्स्टिटय़ूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रीसर्च या संस्थेच्या वैज्ञानिकांनी लघुग्रह आघाताच्या वेळी सल्फ्युरिक आम्लाचे जे थेंब प� �ले होते तशा थेंबांची पुन्हा निर्मिती केली. त्या वेळी सूर्यप्रकाश झाकोळला होता व त्याचा पृथ्वीवर विपरीत परिणाम झाला. वनस्पती मेल्या. अन्नाच्या जाळय़ातून मृत्यूचे तांडव झाले व मोठय़ा प्रमाणात आघातात धूळ निर्माण झाली. संगणकीय सादृश्यीकरणात असे दिसून आले, की सल्फ्युरिक आम्लाचे थेंब पडल्यानंतर पृथ्वी कमालीची थंड पडली त्यामुळे डायनॉसॉर्सचा मृत्यू झाला.

 महासागरांचे मिश्रण झा ल्यानेही पृथ्वी थंड झाली असण्याची शक्यता आहे, त्यामुळे सागरी जीव नष्ट झाले. लघुग्रहाच्या आघातानंतर मेक्सिकोत चिक्सलब हे विवर बनले होते, त्यामुळे पृथ्वीचा इतिहास बदलला असे ज्युलिया ब्रगर यांनी म्हटले आहे. क्रॅटॅशियस काळाच्या अखेरीस मोठय़ा प्रमाणावर बदल झाले होते.

 वैज्ञानिकांनी प्रथमच संगणकीय सादृश्यीकरणाचा वापर करून हवामान प्रारूप वातावरण, महासागर व सागरी बर्फास लावल� � आहे. त्या वेळी सल्फर असलेले वायू आघातानंतर तयार झाले होते व त्यामुळे पृथ्वीवरचा सूर्यप्रकाश बंद झाला. परिणामी, तापमान २७ अंशावरून पाच अंशापर्यंत खाली आले व थंडीमुळे खूप बदल झाले. जागतिक वार्षिक पृष्ठीय हवा तापमान २६ अंशांनी घसरले होते व त्यामुळे तीन वर्षे तापमान गोठणबिंदूच्या खाली होते. सल्फेट एरोसेलमुळे थंड वातावरण बनले होते, असे जॉर्ज फेलनर यांनी म्हटले आहे. जिओफिजिकल री� �र्च लेटर्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भाग उपग्रह सोडून पृथ्वीवर परत

स्पेस एक्स कंपनीकडू यशस्वी प्रक्षेपण
https://t.me/mpscscience/521
स्पेस एक्स कंपनीने त्यांचा फाल्कन ९ अग्निबाण उडवला. नंतर त्याचा पहिल्या टप्प्याचा भाग पृथ्वीवर परतला, त्याचा फेरवापर करता येतो. त्यामुळे अग्निबाणाच्या मदतीने उपग्रह सोडण्याचा खर्च कमी होत असतो. सप्टेंबरमध्ये या कंपनीच्या अग्निबाणाचा स्फोट झाला होता त्यानंतरचे हे पहिलेच यशस्वी उड्डाण आहे. स्पेसएक्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, पांढऱ्या रंगाचा लांबलचक अग्निबाण स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.५४ वाजता अवकाशात झेपावला व त्याने इरिडियम या मोबाईल व डाटा कम्युनिकेशन कंपनीचे दहा उपग्रह एकाचवेळी अवकाशात सोडले. फाल्कन ९ अग्निबाण अवकाशात झेपावल्यानंतर त्याचे दोन भाग वेगळे झाले. उपग्रह अवकाशातील कक्षेत प्रस्थापित केल्यानंतर त्याचा लांबलचक भाग पृथ्वीवर परत आला. त्यानंतर स्पेस एक्सच्या कॅलिफोर्नियातील प्रक्षेपण नियंत्रण कक्षात एकच जल्लोष झाल� ��. त्याचे व्हिडिओ चित्रणही असून त्यात या अग्निबाणाचा लांबलचक भाग प्रशांत महासागरातील एका सागरी मंचावर सरळ उतरताना दिसत आहे. स्पेस एक्स कंपनीने आतापर्यंत उपग्रह सोडून झाल्यानंतर अग्निबाण जमीन व पाण्यात यशस्वीपणे उतरवले आहेत. त्यांचा फेरवापर करता येत असल्याने खर्च वाचतो. येत्या काही महिन्यांत स्पेसएक्स कंपनी इरिडियमचे ८१ उपग्रह अवकाशात पृथ्वी निकटच्या कक्षेत सोडणार आहे. स प्टेंबरमध्ये स्पेसएक्सच्या अग्निबाणाचा स्फोट होऊन २० कोटी डॉलर्सचा उपग्रह नष्ट झाला होता. हा उपग्रह फेसबुकची सेवा आफ्रिकेत इंटरनेट मार्फत पुरवण्यासाठी सोडला जात होता. ड्रॅगन कार्गो शिप अवकाश स्थानकात मालसामान घेऊन जात असताना जून २०१५ मध्येही एक स्फोट झाला होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹प्रलंबित खटल्यांत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

देशभरातील सर्व जिल्हा न्यायालयांतील परि� �्थिती

तीन कोटी खटले न्यायाच्या प्रतीक्षेत; देशभरातील सर्व जिल्हा न्यायालयांतील परिस्थिती

देशभरात न्यायप्रविष्ट खटल्यांची परिस्थिती बिकट असून तब्बल तीन कोटी खटले न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचा धक्कादायक अहवाल सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्ध केला आहे. सर्वाधिक खटले प्रलंबित असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.

'भारतीय न्यायिक वार्षिक � ��हवाल २०१५-२०१६' आणि 'अ‍ॅक्सेस टू जस्टीस अहवाल २०१६' हे दोन अहवाल सर्वोच्च न्यायालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यात न्यायपालिकेची सद्यस्थिती विशद करण्यात आली आहे. देशभरातील सर्व जिल्हा न्यायालयांमध्ये १ जुलै २०१५ ते ३० जून २०१६ या कालावधीदरम्यान तब्बल दोन कोटी ८१ लाख २५ हजार ६६ नागरी आणि गुन्हेगारी स्वरूपाचे खटले प्रलंबित असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मा त्र, याच कालावधीत एक कोटी ८९ लाख चार हजार २२२ खटल्यांचा निपटारा झाल्याचेही हा अहवाल सांगतो. एकूणच परिस्थिती बिकट असून न्यायदानाची प्रक्रिया जलद करायची असेल तर न्यायाधीशांच्या  रिक्त जागा ताबडतोबीने भरल्या जाणे आवश्यक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. न्यायाधीशांची अपुरी संख्या हेच प्रलंबित खटल्यांमागील मुख्य कारण असून जिल्हा न्यायालयांमध्ये सुमारे पाच हजार न्याया धीशांची पदे रिक्त आहेत. येत्या काही वर्षांत किमान १५ हजार न्यायाधीशांची आवश्यकता भासणार असल्याने त्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे अहवाल म्हणतो. कनिष्ठ न्यायालयांमधील भरती प्रक्रियाच मंदावली असल्याने प्रलंबित खटल्यांची संख्या वाढत असल्याचे अहवालात नमूद आहे. अहवालातील नोंदीनुसार सर्वाधिक प्रलंबित खटले उत्तर प्रदेशात आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आह े..

अहवालातील इतर मुद्दे

विद्यमान न्यायाधीशांची संख्या फक्त नव्या खटल्यांची हाताळणी करण्यापुरतीच

 मर्यादित आहेत्यामुळे प्रलंबित खटल्यांची संख्या वाढत आहे; कनिष्ठ न्यायालयांमध्ये ही प्रक्रिया तातडीने होण्याची गरज आहे

रिक्त पदांची भरती तातडीने न केल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे

अतिरिक्त न्यायिक मनुष्यबळ, त्यांना सहाय्य करणारे कर्मचारी आणि न्� �ायालयीन कामकाजांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सोयीसुविधा यांची तातडीने पूर्तता करणे गरजेचे आहे. – अहवालातील नोंद

https://t.me/chalughadamodi/3696

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मुद्रित माध्यमातील परकीय गुंतवणूक ४९ टक्क्यांपर्यंत वाढणार

केंद्र सरकारकडून सल्लामसलत सुरू

केंद्र सरकारकडून सल्लामसलत सुरू

मुद्रित माध्यमांमध्ये थेट परकीय गुंतवणूक मर्यादा (एफडीआय) ४९ टक्के करण्याबाबत केंद्र सरकार वि� ��ार करत आहे. सध्या ही गुंतवणूक मर्यादा २६ टक्के आहे.

वृत्तपत्रे आणि नियतकालिके या मुद्रित माध्यमांमध्ये थेट परकीय गुंतवणूक मर्यादा ही सध्या २६ टक्के आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने या क्षेत्रामध्ये थेट परकीय गुंतवणूक वाढण्यासाठी सल्लामसलत सुरू केली आहे.

मागील वर्षी केंद्र सरकारने अनेक क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणूक वाढण्यासाठी अनेक नियमांमध्ये शि थिलता आणली आहे. यामध्ये नागरी विमान वाहतूक, संरक्षण, खासगी सुरक्षा संस्था, औषधे आणि अन्न प्रक्रिया उद्योग या क्षेत्रांचा समावेश आहे.

आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये थेट परकीय गुंतवणुकीमध्ये (एफडीआय) २९ टक्क्यांनी वाढ होत ती ४० अब्ज डॉलर अमेरिकन डॉलरवर पोहोचली आहे. मागील वर्षांच्या आर्थिक वर्षांत ही गुंतवणूक ३०.९३ अब्ज अमेरिकन डॉलर होती.

विकासासाठी १ हजार अब्ज डॉलरची गरज

थेट प� ��कीय गुंतवणूक भारतासाठी अतिशय आवश्यक बाब असून, देशाच्या बंदर, विमान आणि महामार्ग यांचा विकास करण्यासाठी १ हजार अब्ज डॉलरची गरज आहे. परकीय गुंतवणुकीच्या वाढीमुळे देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. तसेच गुंतवणूक वाढल्यामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत होण्यास मदत होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ग्वादार बंदराच्या सुरक्षेसाठी चीनकडून पाकिस्तानला २ जहाजे सुपूर् द

कार्यक्रमाला दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील ग्वादार बंदर

https://t.me/chalughadamodi/3698
चीनने ग्वादार बंदराच्या संरक्षणासाठी पाकिस्तानला २ जहाजे दिली आहेत. बलुचिस्तानमधील महत्त्वपूर्ण ग्वादार बंदर आणि चीन-पाकिस्तानमधील इकॉनॉर्मिक कॉरिडॉरच्या अंतर्गत येणाऱ्या व्यापारी मार्गांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानच्या नौदलाला चीनकडून दोन जहाजे देण्यात आली आहेत.

चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये चीनकडून कोट्यवधींची गुंतवणूक करण्यात आली आहे. चीन आणि पाकिस्तान� ��्या दृष्टीने हा इकॉनॉमिक कॉरिडॉर अतिशय महत्त्वाचा आहे. याच इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या संरक्षणसाठी चीनने पाकिस्तानच्या नौदलाला दोन जहाजे दिली आहेत. शनिवारी चीनकडून दोन जहाजे पाकिस्तानला सोपवण्यात आली आहेत. पाकिस्तानमधील अशांत भाग असणाऱ्या बलुचिस्तान प्रांतात ग्वादार बंदर विकसित करण्यात आले आहे. इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत या बंदराचा विकसित करण्यात आला आहे. या बंदरातून निघणारा मार्ग पाकिस्तान, पश्चिम आशिया, आफ्रिकेतून जात पश्चिम चीनला युरोपशी जोडतो.

चीनने हिंगोल आणि बासोल ही दोन जहाजे पाकिस्तानच्या नौदलाला सोपवली आहेत. पाकिस्तानचे वरिष्ठ अधिकारी वाईस एडमिरल आरिफुल्ला हुसैनी यांच्याकडे चीनकडून सुपूर्द करण्यात आली. नुकतीच चीनकडून उभारण्यात आलेली ही जहाजे आता पाकिस्तानच्या नौसेनेचा भाग असणार आहेत. या जहाजांचा वापर अरबी समुद्राच्या संरक्षणास� �ठी केला जाणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ब्रिटिश स्टॅंडर्डनुसारच हेल्मेट वापरण्याची आयसीसीची खेळाडूंना सूचना

https://t.me/chalughadamodi/3700

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) हेल्मेट संबंधी नवीन नियम जाहीर केला आहे. पाठीमागच्या बाजूने जास्त संरक्षण असणारे हेल्मेट वापरण्यात यावेत अशी सूचना आयसीसीने जारी केली आहे. हा नवा नियम १ फेब्रुवारी २०१७ पासून लागू करण्यात येणार आहे. ब्रिटिश स्टॅ� ��डर्ड बीएस ७९२८:२०१३ हे मानांकन असणाऱ्या हेल्मेटच वापरावेत अशी मार्गदर्शक सूचना आयसीसीने जाहीर केली आहे. या हेल्मेटला ग्रिल आणि पीकच्या मध्ये कमी अगदी कमी अंतर असते त्यामुळे बॉल पासून जास्त संरक्षण मिळते.

१ फेब्रुवारीपासून या नियमाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असे आयसीसीने म्हटले आहे.

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात सुरक्षित हेल्मेटचा वापर व्हावा अशी आमची इच् छा आहे असे आयसीसीचे संस्थापक जेफ अलार्डिस यांनी म्हटले. जुन्या हेल्मेटपेक्षा नवे हेल्मेट्स हे अधिक सुरक्षित असल्याचे त्यांनी म्हटले. हेच हेल्मेट वापरण्यात यावे याला आमचे प्राधान्य आहे असे जेफ यांनी म्हटले. बऱ्याच संघांनी हे नवे हेल्मेट वापरण्यास १ जानेवारीपासून सुरुवात केली आहे. परंतु काही संघ आणि खेळाडू अद्यापही हे वापरत नसल्याचे आढळून आले आहे तेव्हा त्यांनी याकडे लवकर � �क्ष देणे आवश्यक आहे असे जेफ म्हणाले.

काही संघांनी आमच्याकडे वेळ देखील मागितला आहे. त्यामुळे १ फेब्रुवारीपासून हे हेल्मेट वापरावेत अशी सूचना आम्ही जारी केली असल्याचे जेफ म्हणाले. १ फेब्रुवारीनंतर आम्ही या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करणार आहोत असे जेफ यांनी म्हटले. मागील वर्षी जूनमध्ये ब्रिटिश सेफ्टी स्टॅंडर्डचे हेल्मेट वापरावे असा निर्णय घेण्यात आला होता. इंग्लंडमध्य� �� या हेल्मेटची सक्ती नोव्हेंबर २०१५ पासूनच आहे.

नोव्हेंबर २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियन कसोटीपटू फील ह्युजेसला मैदानावर खेळताना बॉल लागल्यामुळे मृत्यू झाला होता. त्याचे हेल्मेट हे जुन्या मॉडलचे होते. त्या कंपनीने नवीन मॉडल तयार केले होते ते अधिक सुरक्षित होते परंतु ह्युजेस आपले जुनेच हेल्मेट वापरत होता. एक उसळता चेंडू येऊन त्याच्या हेल्मेटवर आदळला. त्यानंतर ह्युजेस कोसळला. त्य ाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची झुंज अयशस्वी ठरली आणि त्याचे रुग्णालयात निधन झाले. या घटनेनंतर जगभरातील क्रिकेट संघटनांनी हेल्मेट हे अधिकाधिक सुरक्षित व्हावेत आणि वेळेनुसार ते अद्ययावत व्हावे अशी इच्छा जाहीर केली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹महिलांची घरीच होणार कर्करोग तपासणी

तीन महिन्यांत राज्यातील 12 हजारांहून अधिक महिलांची तपासणी
मुंबई - ग्रामीण भागातील महिलांची थेट त्यांच्या घरीच यापुढे स्तनाच्या कर्करोगाची तपासणी करण्याची सुविधा राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने उपलब्ध करून दिली आहे. "ऍल्ट्रा पोर्टेबल स्कॅनर' हे उपकरण व एका फिरत्या व्हॅनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांची स्तनाच्या कर्करोगाची तपासणी करण्यात येत असून, मागील तीन महिन्यांत सुमारे 12 हजारांहून अधिक महिलांची तपासणी करण्यात � ��ली आहे. यामध्ये छातीचा कर्करोग आढळून आलेल्या 31 महिलांवर सध्या उपचार सुरू आहेत.

महिलांमध्ये कर्करोगाविषयी जागरूकता नसताना राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. महिला तपासणीसाठी रुग्णालयात येण्याची वाट न पाहता आदिवासी पाडे, अंगणवाड्या, बचत गट, तसेच सरकारी कार्यालयातील सर्वसामान्य महिलांकडेच थेट जाऊन अत्याधुनिक आयब्रेस्ट पोर्टेबल मशिनद्वा� ��े त्यांची तपासणी सुरू केली आहे. गेल्या तीन महिन्यांत राज्यातील 12 हजारांहून अधिक महिलांची तपासणी करण्यात आली असून, त्यात स्तनाचा कर्करोग आढळून आलेल्या 31 महिलांवर उपचार सुरू आहेत.

महिलांमधील स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण ही दिवसेंदिवस गंभीर समस्या बनली आहे. जागरूकता नसणे, वेळेवर तपासणी होत नसल्याने कर्करोगाने धोकादायक पातळी गाठल्यानंतर महिलांच्या ध्यानात येते. त्यानंतर त पासण्या सुरू होतात. शहरी भागात थोडीफार तपासणी होते. मात्र, ग्रामीण भागातील महिलांना तर अशाप्रकारचा काही आजार असतो याचीही बऱ्याचदा माहिती नसते. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी एम्पथी फाउंडेशनच्या मदतीने स्तनाच्या कर्करोगासंदर्भातील ही वेगळी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला.

यासाठी कामा ऑलब्लेसच्या डीन आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजश्री कटके यांची राज्यस� ��तरावर समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एम्पथी फाउंडेशनने आयब्रेस्ट एक्झामिनेशन हे "अल्ट्रा पोर्टेबल स्कॅनर' यंत्र उपलब्ध करून दिले आहे. याआधीचे यंत्र हे मोठ्या स्वरूपाचे आणि तपासणीदरम्यान वेदनादायक ठरत असले, तरी हे यंत्र मात्र अत्यंत कमी रेडिएशन आणि वेदना देणारे आहे. शिवाय, हे यंत्र कुठेही नेणे सहजसोपे आहे. आदिवासी पाडे, अंगण वाड्या, बचत गट, विविध सरकारी, निमसरकारी कार्यालयांत एक दिवस आधी जाऊन महिला डॉक्टरकडून याविषयीची सविस्तर माहिती दिली जाते आणि नंतर तपासणीसाठी महिलांची नावे नोंदवून तेथेच त्यांची अवघ्या काही मिनिटांमध्ये तपासणी केली जाते.

येथे झाली तपासणी

मुंबई, नागपूर, चंद्रपूर, नांदेड, अकोला, कोल्हापूर, धुळे, नंदूरबार, पुणे, सोलापूर येथील ग्रामीण भागांत गेल्या तीन महिन्यांत 12 हजारांहून � �धिक महिलांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 738 महिलांमध्ये कर्करोगसदृश गाठी आढळून आल्या. त्यांची सखोल तपासणी केली असता त्यातील 31 महिलांना स्तनांचा कर्करोग असल्याचे आढळले. या महिलांवर उपचार सुरू आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मदरशांत माध्यान्ह भोजन देण्याचा सरकारचा विचार

मदरशांमधील जे विद्यार्थी मुख्य प्रवाहातील शिक्षण घेत आहेत त्यांना शाळेत आता माध्यान्ह भोजन मिळू शकते. याबा बतचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.

केंद्रीय अल्पसंख्यांक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, "ज्या मदरशांमधून धार्मिक शिक्षणाशिवाय मुख्य प्रवाहातील विषय शिकवले जातात अशा मदरशांना आर्थिक मदत आणि माध्यान्ह भोजनाची सुविधा पुरविण्याचा विचार सरकार करीत आहे."

अल्पसंख्यांकांसाठी लाभदायक असणाऱ्या विविध योजनांबद्दल बोलताना नक्वी म्हणाले, "पंतप्रधानांचा नवीन 15 � ��लमी कार्यक्रम, नई मंजिल, नई रोशनी, सीखो और कमाओ, उस्ताद, मॅट्रिकपूर्व आणि मॅट्रिकनंतरच्या शिष्यवृत्ती यांचा सर्व अल्पसंख्यांकांना लाभ झाला आहे. याशिवाय मेक इन इंडिया, स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया यांसारख्या केंद्र सरकारच्या योजनांचाही लाभ झाला आहे."

मुलींसाठी देशभरात बेगम हजरत महल शिष्यवृत्ती आणि गरीब नवाझ कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत, असेही नक्वी यांनी सांगितले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ब्रेक्झिट : 'EU'मधून पूर्णपणे बाहेर पडण्याचा पुनरुच्चार

युरोपीय महासंघाच्या एकमेव बाजारपेठेत ब्रिटन राहण्याची शक्यता नाही, असे सांगत ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आगामी काळातील ब्रिटन आणि महासंघामधील व्यापारी संबंधांची दिशा स्पष्ट केली. तसेच, महासंघातून बाहेर पडणार असलो तरी संबंध संपलेले नाहीत, असेही त्यांनी ब्रिटिश अधिकारी आणि इतर देश� ��ंच्या राजनैतिक अधिकाऱ्यांसमोर केलेल्या भाषणात सांगितले.

युरोपीय महासंघाचे चार दशके सदस्य राहिल्यानंतर या संघातून पूर्णपणे बाहेर पडण्याचा निर्णय ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी मंगळवारी जाहीर केला. महासंघाबरोबर समान पातळीवर संबंध निर्माण करण्याची ब्रिटनची इच्छा असून, महासंघाचे तात्पुरते सदस्यत्व अथवा इतर मार्गांनी निर्माण होणारे अर्धवट संबंध नकोत, असे मे यां� ��ी स्पष्ट केले. 'ब्रेक्झिट'मुळे ब्रिटन कमजोर होण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र, ब्रिटनला अधिक शक्तिशाली, अधिक एकसंध आणि उर्वरित जगाकडे अधिक मोकळेपणाने पाहणारा देश म्हणून पुढे आणण्याचे आपले प्रयत्न असल्याचे मे यांनी आजच्या भाषणात सांगितले.

स्थलांतरितांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी युरोपीय महासंघाची एकमेव बाजारपेठ सोडण्याचे प्रमुख कारण असल्याचे मे यांच्या भाषणातू न सूचित करण्यात आले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹लास्ट मॅन टू वॉक द मून

चंद्रावर जाणारे शेवटचे अंतराळवीर जीन सर्नन(82) यांचे काल (सोमवार) निधन झाले. 'नासा'ने (नॅशनल एरोनॉटिक्स ऍण्ड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन) देखील सर्नन यांच्या मृत्युबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

1972च्या मोहिमे दरम्यान चंद्रावर जाणाऱ्या अंतराळवीरांपैकी सर्नन हे एक होते. त्यांच्या जीवनावर 'द लास्ट मॅन ऑन द मून' हा माहितीपट देखील क रण्यात आला आहे.

वयाच्या 82व्या वर्षी देखील सर्नन हे अतिशय उत्साही होते. अंतराळातील मानवी अस्तित्वाविषयी त्यांना नेहमी उत्सुकता असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी 'नासा'शी बोलताना म्हटले आहे.

https://t.me/chalughadamodi/3712

अपोलो 17 चंद्रअभियान

- हे नासाच्या अपोलो अभियान मालिकेतील शेवटचे अभियान होते.
- 7 डिसेंबर 1972 रोजी अपोलो 17 या अभियानादरम्याने मानवाने दुसऱ्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले.
- जीन सर्नन अपोलो 17 अभियानाचे कमांडर होते.
- भारतीय प्रमाण वेळेनुसार अपोलो 17 हे यान 11 वाजून 3 मिनिटांनी अवकाशात झेपावणार होते. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे याला दोन तास उशीर झाला होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹'टीमलीज'कडून 'कीस्टोन बिझनेस'चे अधिग्रहण; शेअर तेजीत

https://t.me/chalughadamodi/3714
टीमलीज सर्व्हिसेसने आपल्याच क्षेत्रातील कीस्टोन बिझनेस सोल्युशन्सचे अधिग्रहणाची घोषणा केल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये 6 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. कीस्टोनचे मुख्यालय बंगळुरु येथे आहे.

टीमलजीने आपली उपकंपनी टीमलीज स्टाफिंग सर्व्हिसेसमार्फत कीस्टोनमधील 100 टक्के हिस्सेदारीची 8.2 कोटी रुपयांना रोख खरेदी केली आहे. 31 जानेवारी, 2017 पुर्वी अधिग्रहण प्रक्रिया पुर्ण करण� ��याची इच्छा असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या अधिग्रहणामुळे कंपनीच्या मार्जिन्समध्ये वाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

मुंबई शेअर बाजारात टीमलीज सर्व्हिसेसचा शेअर 882 रुपयांवर उघडला. त्यानंतर शेअरने 882 रुपयांवर दिवसभराची नीचांकी तर 935.80 रुपयांवर दिवसभराची उच्चांकी पातळी गाठली. सध्या(12 वाजून 38 मिनिटे) 914 रुपयांवर व्यवहार करत असून 2.93 टक्क्यांनी वधारला आहे.

#eMPSCkatta_Current_Af fairs

🔹पाचवी पास आजोबा सगळ्यात श्रीमंत भारतीय CEO

https://t.me/chalughadamodi/3716
आपल्या स्वयंपाकघरात अनेक वर्षांपासून हक्काचं स्थान मिळवलेल्या एमडीएच मसाल्याच्या पॅकेटवर तुम्ही फेटावाल्या आजोबांचं चित्र पाहिलंच असेल ना?... किंवा मग टीव्हीवरच्या एमडीएचच्या जाहिरातीतील पीळदार मिशीवाले 'दादाजी' नक्कीच बघितले असतील?... ९४ वर्षांच्या या आजोबांनी बड्या बड्या उद्योगपतींना मागे टाकत देशातील सर्वात श्रीमंत सीईओ होण्याचा मान पटकावला आहे.

एमडीएच कंपनीचे सर्� ��ेसर्वा असलेल्या या आजोबांचं नाव आहे, धरमपाल गुलाटी. फक्त पाचवीपर्यंत शिकलेल्या गुलाटी यांच्याकडे एमडीएच कंपनीच्या एकूण समभागांपैकी ८० टक्के हिस्सा आहे. या कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात २१३ कोटी रुपयांचा नफा कमावला असून २१ कोटी रुपये कंपनीचे सीईओ असलेल्या 'दादाजीं'च्या खात्यात जमा झालेत. त्यामुळेच त्यांच्या फेट्यात 'सर्वात श्रीमंत सीईओ' असा तुरा खोवला गेला आहे. गोदरेज कन्झ� �युमरचे सीईओ आदि गोदरेज आणि विवेक गंभीर, हिंदुस्थान युनिलिव्हरचे संजीव मेहता आणि आयटीसीचे वाय सी देवेश्वर यांची कमाईही गुलाटी यांच्यापेक्षा कमी आहे.

'महाशियां दी हट्टी' ही कंपनी 'एमडीएच' या नावाने प्रसिद्ध आहे. त्या कंपनीतील सगळ्यात उत्साही आणि मेहनती व्यक्ती म्हणजे धरमपाल गुलाटी. वयाच्या ९४व्या वर्षीही ते अगदी न चुकता कारखान्यात, बाजारात जातात आणि डीलर्सनाही भेटतात; अगदी रविवारीही. दादाजी किंवा महाशयजी सगळ्यांसाठी आदरणीय आहेत. त्यांच्या वडिलांनी - चुन्नी लाल यांनी १९१९ मध्ये पाकिस्तानातील सियालकोटमध्ये एक छोटंसं दुकान सुरू केलं होतं. त्या रोपाचा वटवृक्ष होईल, दुकानाचं १५०० कोटींच्या साम्राज्यात रूपांतर होईल, असा विचारही त्यांनी केला नव्हता. परंतु, धरमपाल गुलाटी यांच्या सहा दशकांच्या अथक प्रयत्नांमुळे आज एमडीएचनं मसाल्याच्या बाजारात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यासोबतच २० शाळा आणि एक हॉस्पिटल उभारून त्यांनी सामाजिक जाणिवेचंही दर्शन घडवलं आहे. विशेष म्हणजे, धरमपाल गुलाटी हे आपल्या पगारातील ९० टक्के रक्कम दान करतात.

फाळणीनंतर धरमपाल गुलाटी दिल्लीतील करोल बाग भागात स्थायिक झाले. त्यानंतर त्यांनी भारतात १५ कारखाने सुरू केले. १००० डीलर्सना ते मसाल्यांचा पुरवठा करतात. त्याशिवाय, दुबई आणि लंडनमध्येही एमडीएचच ं ऑफिस आहे. जवळपास १०० देशांमध्ये एमडीएच मसाल्यांची निर्यात होते. आज गुलाटी यांचं संपूर्ण कुटुंब - एक मुलगा आणि सहा मुली कंपनीचा सर्व कारभार व्यवस्थित सांभाळत आहेत आणि अर्थातच 'दादाजी' त्यांचे मार्गदर्शक आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भीम अॅपच्या मदतीने व्यवहारांसाठी आधार कार्ड ठरणार युनिव्हर्सल आयडी

तुमचे आधार कार्ड आता सर्व व्यवहारांसाठी युनिव्हर्सल आयडी ठरणार आहे. भीम अॅपमध्� �े १२ अंकी आधार कार्ड क्रमांक टाकून व्यवहार करण्याची सुविधा आधार कार्ड धारकांना मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात ऑनलाइन व्यवहारांसाठी एटीएम कार्डांची गरज भासणार नाही.

केंद्र सरकारने भीम अॅपमध्ये आधार कार्डचा पेमेंट आयडी म्हणून समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये भीम अॅपमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे. आधार कार्ड पेमेंट आयडी झाल्यास अॅपमध्ये बायो� �ेट्रीक नोंदणी आणि बँकेच्या यूपीआय रजिस्ट्रेशनही करावे लागणार नाही. आधार कार्ड क्रमांक टाकून व्यवहार करता यावे यासाठी यूआयडीएआय बँक आणि अन्य यंत्रणांशी चर्चा करत असून येत्या काही आठवड्यात ही सुविधा कार्यान्वित होईल असा दावा केला जात आहे.

युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयभूषण पांडे यांनी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार देशाती ल ३८ कोटी जनतेचे आधार कार्ड क्रमांक त्यांच्या बँकेशी जोडलेले आहेत. त्यामुळे या द्वारे व्यवहार करणे सहज शक्य होऊ शकते. भीम अॅपवरून व्यवहार करण्यासाठी पैसे पाठविणारा आणि स्वीकारणारा या दोघांचेही 'यूपीआय'सक्षम बँकेत खाते हवे असते. यूपीआय पिन मिळवण्यासाठी डेबिट कार्डाचा तपशील द्यावा लागतो आणि त्यामुळे गोरगरीब आणि अशिक्षित मंडळी वेळखाऊ प्रक्रियेमुळे या अॅपकडे पाठ फिरवतील अश ी शक्यता वर्तवली जात होती.

 'आधार'मुळे कामगारापासून कोणाच्याही बँक खात्यात पैसे जमा करणे शक्य होणार आहे. यासाठी त्या व्यक्तीकडे भीम अॅप नसले तरी चालेल, फक्त त्याचे बँक खाते आधार कार्डाशी संलग्न असणे गरजेचे असल्याचे पांडे यांनी म्हटले आहे. दर महिन्याला सुमारे २ कोटी लोकांचे आधार कार्ड क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी जोडत आहे. आगामी तीन महिन्यांमध्ये देशातील निम्या लोकांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

यापूर्वी नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी देखील आधार कार्डचे महत्त्व अधोरेखित केले होते. नोटाबंदीनंतर रोकडरहित व्यवहाराला चालना देण्यासाठी नीती आयोगाने अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. या योजनांमुळे २०२० पर्यंत क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम आणि पीओएस मशीन्सची गरज उरणार नसल्याचे अ� ��िताभ कांत यांनी म्हटले होते. येत्या काळात केवळ आधार अॅप किंवा भीम अॅपचा वापर करुन सर्व व्यवहार केले जातील असे संकेत त्यांनी दिले होते.
https://t.me/chalughadamodi/3718

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹चेन्नई ते बेंगळूर, अवघ्या 30 मिनिटात !

दक्षिण भारतात अवतरणार अतिवेगवान 'हायपरलूप'चे युग
https://t.me/chalughadamodi/3720
चेन्नई ते बेंगळूर हे सुमारे 600 किलोमीटरचे अंतर अवघ्या 30 मिनिटात, अर्थात विमानापेक्षाही अधिक वेगाने कापले जाणार आहे. ही केवळ कल्पना नाही. तर तशी प्रत्यक्ष योजना आकाराला येत आहे. अमेरिकेचे उद्योगपती संशोधक एलन मस्क यांनी असे तंत्रज्ञान विकसीत केले असून ते दक्षिण भारतात आणण्याचा त्यांचा विचार आहे.

हायपरलूप या नावाने ते ओळखले जाते. या सिमेंट काँक्रिटच्या खांबांवरून अतिवेगाने � �ावणाऱया टय़ूबरेल्वेमधून असा प्रवास शक्य आहे. ही योजना प्रत्यक्षात उतरल्यास एका शहरातून दुसऱया शहरात प्रवास ताशी 1 हजार 200 किलोमीटर वेगाने करता येणे शक्य आहे.
भारतातील अनेक शहरांमध्ये या तंत्रज्ञानामुळे प्रवास क्रांती घडणार आहे. मस्क यांच्या कंपनीने अनेक प्रस्ताव ठेवले आहेत. त्यात चेन्नई-बेंगळूर प्रमाणेच, बेंगळूर-मुंबई, चेन्नई-मुंबई, बेंगळूर-त्रिवेंद्रम, मुंबई-दिल्ली अशी अनेक अंतरे सध्याच्या वेळेच्या एक दशांश वेळेत कापली जाणार आहेत. ही टय़ूब रेल्वे वीजेवर चालणार आहे. सध्याच्या बुलेट ट्रेन पेक्षाही या रेल्वेचा वेग चौपट असणार आहे.

अमेरिकेप्रमाणे काही जपानी कंपन्याही भारतात असे प्रकल्प उभे करण्यात स्वारस्य दाखवत आहेत. त्यांनी अशा काही मार्गांची कागदावरील चाचपणीही सुरू केली आहे. भारतात असे मार्ग उभे करणे शक्य असल्याचे या कंपन्यांचे मत आहे.

मुख्य प्रश्न खर्चाचा

असे अतिवेगवान रेल्वेमार्ग विकसीत करण्यात मुख्य प्रश्न खर्चाचा आहे. सध्या बुलेट ट्रेनचा मार्ग विकसीत करण्यासाठी एका किलोमीटरला सुमारे 300 कोटी रूपये खर्च येतो. एवढा खर्च केल्यानंतर या प्रवासाचे तिकिट किती असणार हाही प्रश्न उभा राहतो. पण हायपरलूपच्या म्हणण्यानुसार हे तुलनेने किफायतशीर तंत्रज्ञान आहे. त्याचा खर्च प्रतिकिलोमीटर 72 कोटी आहे, जो बुलेट ट्रेनच्या मानाने बराच कमी आहे. त्यामुळे विमान प्रवासाच्या खर्चापेक्षा कमी खर्चात प्रवाशांची ने आण करणे कालांतराने शक्य होईल, असा या कंपन्याचा दावा आहे.
अशा मार्गांचा विकास करण्यासाठी अनुमती देण्यास सरकारची ना नाही. तथापि, तिकिटांचा दर सांगितला जाताच सरकार काढता पाय घेते, अशी माहिती एका रेल्वे अधिकाऱयाने दिली. त्याच्या म्हणण्यानुसार भारतात अशा रेल्वे सर्वसामान्यांना परवडणाऱया वाटत नाहीत. तसेच त्यांच्या सुरक्षेचाही मुद्दा महत्वाचा आहे.

कंपन्यांचा आशावाद

तरीही विदेशी कंपन्या आशावादी आहेत. भारतातील विमान प्रवाशांची स ंख्या पाहता अशा रेल्वे येथे चालू शकतील, असे त्यांचे मत आहे. तसेच एकदा गुंतवणूक झाल्यानंतर कालांतराने या मार्गांचा ऑपरेटिंग खर्च कमी कमी होऊ शकतो. सध्या सानफ्रान्सिस्को ते लॉस एंजल्स अशी अतिवेगवान टय़ूबरेल्वे प्रस्तावित आहे. तिचा अनुभव चांगल्या आल्यास भारतात ही कल्पना मूळ धरू शकेल, असे त्यांचे म्हणणे आहे. येत्या 10 वर्षात ही प्रवासक्रांती भारतीयांना अनुभवावयास मिळेल, असेही म्� ��टले जात आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹407 रुपयांत विमान प्रवास

प्रवाशांना कमी किमतीत विमान प्रवास करण्याची संधी देणाऱया एअरएशिया कंपनीने नवीन ऑफर सुरू केली आहे. कंपनीने '2017 अर्ली बर्ड सेल' नावाच्या ऑफरनुसार केवळ 407 रुपयांत विमान प्रवास करता येणार आहे. याव्यतिरिक्त निवडक विदेशी मार्गांवरही कंपनीकडून सवलत देण्यात येत आहे. मात्र ही ऑफर केवळ एका मार्गावरच्या प्रवासासाठी आहे.

या ऑफरन� �सार गोवापासून हैदराबाद अथवा बेंगळूर प्रवासभाडे केवळ 877 रुपये आहे, तर इम्फालपासून गुवाहाटी भाडे सर्वात कमी 407 रुपये आहे.

 पुण्याहून बेंगळूर, बेंगळूरहून हैदराबाद, कोचीपासून बेंगळूर या कमी अंतराच्या मार्गावर सर्वात कमी दर आहेत. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी कंपनीने काही नियम आणि अटी लागू केल्या आहेत. सर्वात कमी दराने प्रवास करण्यासाठी 22 जानेवारीपर्यंत तिकीट नोंदणी करणे गरजेचे आहे. � ��ा तिकिटांच्या सहाय्याने मे 2017 ते 6 फेब्रुवारी 2018 दरम्यान प्रवास करू शकतात. याचबरोबर निवडक विदेशी मार्गावरही सूट देण्यात आली आहे.
मलेशियाच्या क्वालांलपूर  ते थायलंडच्या बँकॉकपर्यंत एकाच मार्गाने प्रवास करण्यासाठी 999 रुपये देता येतील. या दरम्यान प्रवास करण्यासाठी 31 जुलै 2017 पर्यंत तिकीट नेंदणी करता येईल.

https://t.me/chalughadamodi/3722

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नीति आयोग राज्यांचे मानांकन ठरविणार

डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी नीति आयोगाने पुढाकार घेतला आहे. आयोगाने राज्यांतील स्पर्धा वाढण्यासाठी पुढील दहा दिवसा� ��त डिजिटल व्यवहारांची माहिती मागितली आहे. या माहितीच्या आधारे राज्यांचे मानांकन ठरविण्यात येणार असून कॅशलेस सोसायटीचे प्रमोशन करण्यास मदत होईल असा अंदाज आहे.

राज्यांकडून पुढील दहा दिवसांत ही माहिती गोळा करण्यात आल्यानंतर मानांकन करण्यात येईल असे वरिष्ठ सरकारी अधिकाऱयाने सांगितले. 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दे� �्यासाठी सरकारकडून अनेक निर्णय घेण्यात आले. गेल्या महिन्यात कॅशलेस व्यवहारांत वाढ होण्यासाठी सरकारकडून 340 कोटी रुपयांची प्रतिदिनी, सप्ताह आणि मेगा बक्षिसे घोषित करण्यात आली. यानुसार सामान्य ग्राहक आणि व्यापाऱयांकडून कॅशलेस व्यवहारांना वाढ होईल.

सरकारच्या आकडेवारीनुसार यूएसएसडी व्यवहारात 5,135 टक्क्यांनी वाढ झाली. 8 नोव्हेंबरला हे व्यवहार प्रतिदिनी 97 होत होते, तर 25 डिसेंबर� �ा हा आकडा 5,078 वर पोहोचला. याचप्रमाणे यूपीआय व्यवहारांत 1,342 टक्क्यांनी वाढ झाली. 8 नोव्हेंबरला 3,721 व्यवहार होते, ते 25 डिसेंबरला प्रतिदिनी 53,648 वर पोहोचला. पहिल्यांदा 1.93 कोटी रुपयांचे व्यवहार होत असून आता 647 टक्क्यांनी वाढ होत 14 कोटी रुपये प्रतिदिनावर पोहोचले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ज्येष्ठ शास्त्रज्ञ सी. व्ही. विश्वेश्वरा यांचं निधन

दोन कृष्णविवरांचा आघात होऊन ते एकमेकात विलीन होऊन एकच कृ� �्णविवर तयार होते व त्या वेळी गुरुत्वीय लहरी बाहेर पडतात, असे भाकित करणारे जेष्ठ शास्त्रज्ञ सी. व्ही. विश्वेश्वरा यांचं सोमवारी रात्री निधन झाले. ते 78 वर्षांचे होते.

सी. व्ही. विश्वेश्वरा यांना विशु नावाने ओळखले जात होते. त्यांनी 1970 साली मेरीलँड येथील विद्यापीठातून शिक्षण घेत असताना पहिल्यांदा कृष्णविवरांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी दोन कृष्णविवरांचा एकमेकांवर आघात हो� �न ते एकमेकात विलीन होऊन एकच कृष्णविवर तयार होते आणि त्यावेळी गुरुत्वीय लहरी बाहेर पडतात, असे भाकित त्यांनी वर्तविले होते.

सी. व्ही. विश्वेश्वरा यांच्यामागे त्यांची पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या दोन्ही मुली सुद्धा शास्त्रज्ञ आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹निरजला मुष्टीयुद्धात सुवर्णपदक

रविवारी सर्बियात झालेल्या सहाव्या नेशन्स चषक महिलांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत � �ारतीय स्पर्धकांनी चार पदकांची कमाई करत तिसरे स्थान मिळविले. महिलाच्या 51 किलो वजन गटात विद्यमान राष्ट्रीय विजेती हरियाणाची निरजने कझाकस्तानच्या जे.शेकेरबिकोव्हाचा पराभव करून सुवर्णपदक पटकाविले.

या स्पर्धेत भारताच्या सर्जूबालादेवीने 48 किलो वजन गटात तसेच प्रियांका चौधरीने 60 किलो गटात, पूजाने 69 किलो गटात आणि सीमा पुनीयाने 81 किलोवरील गटात रौप्यपदके मिळविली.

#eMPSCkatta_Current_Affairs

� ��जगातील सर्वांत मोठ्या स्टेडियमचे भूमिपूजन

गुजरातमधील मोटेरा येथे होत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमचे गुजरात क्रिकेट संघटनेचे (जीसीए) उपाध्यक्ष परिमल नाथवानी यांच्या हस्ते भूमिपुजन झाले. या स्टेडियमच्या उभारणीसाठी सुमारे ७०० करोड रुपये खर्च होतील. यावेळी नाथवाणी यांनी घोषणा केली की, या स्टेडियमची निर्मिती दोन वर्षात पुर्ण होईल. जुन्या 'सरदार पटेल गुजरात स्ट� �डियम'च्या जागेवर याची उभारणी होत आहे. नाथवानी यांनी यावेळी दावा केला की, 'काम पुर्ण झाल्यानंतर हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखले जाईल. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता १ लाख १० हजार असून हे स्टेडियम आॅस्टे्रलियाच्या ९० हजार प्रेक्षक क्षमतेच्या मेलबर्न क्रिकेट स्टेडियमला मागे टाकेल.'

जागतिक रोजगार व सामाजिक आढावा

        जानेवारी 2017 मध्ये जागतिक क ामगार संघटनेने 'जागतिक रोजगार आणि सामाजिक आढावा' शीर्षकाखाली प्रकाशित केला. त्यानुसार आर्थिक वाढीची परिस्थिती निराशाजनक असून पुरेसे रोजगार निर्माण झाले नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेचे चिंताजनक चित्र उभे राहील. जगाच्या वेगवेगळ्या भागात होणार्‍या स्थलांतर व सामाजिक अशांततेच्या घटनांमागे इतर कारणांसह जागतिक अनिश्‍चितता आणि चांगल्या रोजगाराचा अभाव ही कारणे महत्त्वाची आ� �ेत.

जागतिक कामगार संघटनेच्या अहवालानुसार -

*    जगभरात बेरोजगारांच्या संख्येत 2017 मध्ये 34 लाखांची वाढ होईल. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सर्व देशांचे सामूहिक प्रयत्न आणि सार्वजनिक गुंतवणुकीत वाढ झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेला प्रेरणा मिळून जागतिक बेरोजगारीचा दर 2018 पर्यंत 2 दशलक्षने कमी होऊ शकतो.

*    उपलब्ध रोजगार व बेरोजगार व्यक्तींच्या आकड्यातील तफावत वाढणार असून � �ागतिक बेरोजगारीचा दर 5.7 टक्क्यांवरून 5.8 टक्क्यांवर जाऊ शकतो.

*    उदयोन्मुख देशांत 2 पैकी 1 कामगाराचा रोजगार असुरक्षित आहे, तर विकसनशील देशांमध्ये ही स्थिती 5 पैकी  4 आहे. भारताचा समावेश उदयोन्मुख देशांच्या यादीत आहे.

*    विकसनशील देशांत पुढील 2 वर्षात दिवसाला 3.10 डॉलरपेक्षा कमी मिळकत असणार्‍यांच्या संख्येत 5 दशलक्ष ने वाढ होण्याची शक्यता आहे.

*    जगातील एकूण काम करणार्‍या लोका� �पैकी 60 टक्के आशिया-पॅसिफिक भागातील आहेत. 2016 मध्ये त्यांच्या संख्येत 1.1 टक्क्याची (20 दशलक्ष) वाढ झाली व 2017 मध्येही अशीच वाढ अपेक्षित आहे.

*    सध्या दक्षिण आशियात सर्वात जास्त रोजगार निर्माण झाले असून यापैकी बहुतांश रोजगार भारतात निर्माण झाले आहेत.

*    2017 मध्ये अल्प रोजगार मिळणार्‍यांच्या संख्येत घसरण होईल परंतु लोकसंख्या वाढीमुळे असुरक्षित रोजगाराचा दर कमी असूनही असुरक्षित र� ��जगाराच्या संख्येत मात्र वाढ होऊ शकते.

*    2017 साली भारतातील बेरोजगारांची संख्या 1 लाखांनी वाढण्याची शक्यता असून 2018 मध्ये त्यात आणखी 2 लाखांची भर पडण्याची शक्यता आहे.

*    भारतातील एकूण बेरोजगारीचा दर 2017 मध्ये  3.5 टक्क्यांवरून यावर्षी 3.4 टक्क्यांवर येईल.

*    भारतात 2016 मध्ये बेरोजगारांचा आकडा 17.7 दशलक्ष इतका होता. 2018 पर्यंत हा आकडा 18 दशलक्ष इतका वाढण्याची शक्यता आहे.

*    जागतिक कामग� ��र संघटनेतील वरिष्ठ अर्थतज्ज्ञ व या अहवालाचे प्रमुख लेखक स्टीव्हन तोबीन
mahesh waghmare(mali)
 वन-चायना धोरण

        अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तैवानच्या राष्ट्राध्यक्ष तसाई इनवेंग यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करण्याच्या घटनेला काही आठवडे उलटल्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या वेबसाइटवर एक निवेदन प्रसिद्ध देऊन चीन 'वन-चायना' धोरणात हस्तक्षेप खपवून घेणार नसल्याचे सांगत अमेरिका आणि चीन यांच्यातील बिघडते संबंध अधोर ेखित केले आहेत.

       चीनच्या परराष्ट्र विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात 'अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंधाचा आधार वन चायना धोरण हेच असून त्यात तडतोड होणार नाही. अमेरिकेने तैवानच्या विषयाचे गांभीर्य लक्षात घ्यावे,' असे स्पष्ट केले आहे.  'वन-चायना' धोरणानुसार चीनच्या मते तैवान हा त्यांचा एक हिस्सा आहे. ट्रम्प यांनी या भूमिकेला हरताळ फासण्याचा प्रयत्न केला.

      अमेरिक� ��चे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या होत्या. ही माहिती ट्रम्प यांनीच ट्विटरवर दिली आणि या ट्विटरमध्ये 'तैवानच्या राष्ट्राध्यक्ष' असा उल्लेख केला होता.

काय आहे 'वन-चायना' धोरण  ?

1)   'वन - चायना' धोरणाचा अर्थ असा  की 'चीन नावाचे एकच राष्ट्र असून तैवान हा चीनचा एक प्रांत आहे.'

2)   पीपल्स रिपब्लिक ऑ फ चायना (पीआरसी) म्हणजे सध्याचा चीन होय. याची निर्मिती 1949 ला झाली आहे. यात मेनलँड चायना आणि हाँगकाँग-मकाऊ असे दोन प्रमुख प्रांत येतात.

3)   1911 ते 1949 या कालावधीत चीन हा पूर्णपणे 'रिपब्लिक ऑफ चायना'च्या ताब्यात होता. आता रिपल्किकल ऑफ चायनामध्ये तैवान आणि काही बेटांचा समूह आहे.

4)   'वन-चायना' धोरणानुसार ज्या देशांना 'पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना म्हणजे चीन'शी राजनैतिक संबंध ठेवायचे आह� �त, त्या राष्ट्रांना 'रिपब्लिक ऑफ चायना म्हणजे तैवान'शी संबंध तोडावे लागतील.

5)   अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध 'वन-चायना' धोरणानुसार ठरलेले आहेत. पण विशेष म्हणजे अमेरिका हा तैवानसाठी शस्त्रास्त्रांची मोठा पुरवठादार देश आहे. त्यामुळे अमेरिकेचे राजनैतिक नसेल तर व्यावसायिक पातळीवर तैवानशी उत्तम संबंध आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹प्रतीक्षा यादीतल्यांना रेल्वेचा दिलासा

रेल् वेच्या प्रतीक्षा यादीत ताटकळणाऱ्या लहान स्थानकांवरच्या प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांना फक्त निवडक स्थानकांवरच उपलब्ध असलेला "डिस्टन्स रजिस्ट्रेशन'ची अट असलेला "पुल्ड कोटा' खुला करून सर्व प्रवाशांनाच सर्वसाधारण प्रतीक्षा कोटा लागू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.

निर्धारित अंतराऐवजी संबंधित रेल्वेगाडीच्या पूर्ण अंतरासाठी � ��कच कोटा लागू करून "डिस्टन्स रजिस्ट्रेशन'ची प्रथा संपुष्टात आल्याने तिकीट कन्फर्म होणे सुलभ होणार आहे. रेल्वे मंडळाचे प्रवासी विपणन संचालक विक्रमसिंह यांनी विभागीय व्यवस्थापकांना याबाबतचा आदेश दिला आहे. यानुसार रेल्वेच्या देशातील संगणकीय प्रणालीतही बदल केले जातील व नंतर ही यंत्रणा लागू होईल.

"डिस्टन्स रजिस्ट्रेशन' प्रणालीत तुलनेने छोट्या स्थानकांना वेगळा कोटा नसतो. त् यांच्यावरील तिकिटे "पुल्ड कोट्या'तून दिली जातात. म्हणजेच ती तिकिटे कन्फर्म व्हायची असतील, तर त्याच कोट्यातील अन्य तिकिटे रद्द व्हावी लागतात. उदा. हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेसला (12617-12618) 2761 किलोमीटर अंतरापैकी निवडक स्थानकांवरच कोटा असतो. म्हणजे हजरत निजामुद्दीन स्थानकानंतर थेट भोपाळ स्थानकावरच मुख्य कोट्यातून (डिस्टन्स रजिस्ट्रेशन) तिकिटे जारी होतात. या दरम्या न आग्रा, झाशी व ग्वाल्हेर या स्थानकांना असा कोटा नाही. त्यामुळे तेथून चढणाऱ्या प्रवाशांना एखादे तिकीट कन्फर्म होण्यासाठीही यातायात करावी लागत असे. कारण तेथे कोटाच नाही. आता तिकिटे आरक्षित करतानाच प्रतीक्षा यादी सर्वसाधारण ठेवली जाणार असल्याने निर्धारित अंतराऐवजी पूर्ण देशातील रेल्वेमार्गांसाठी ताजा आदेश लागू राहील, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे. हा आदेश प्रत्यक्षात ये� �्यासाठी रेल्वेच्या सॉफ्टवेअरमध्ये मोठे फेरबदल करावे लागणार आहेत. त्यासाठी मार्च महिनाही उजाडू शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

"डिस्टन्स रजिस्ट्रेशन' प्रणाली
सध्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचा आरक्षण कोटा प्रवासाच्या अंतरावर ठरविला जातो. "डिस्टन्स रजिस्ट्रेशन' प्रणालीत तुलनेने छोट्या स्थानकांना वेगळा कोटा नसतो. त्यांच्यावरील तिकिटे "पुल्ड कोट्या'तून दिली जातात. म्हणजेच ती तिकिटे कन्फर्म व्हायची असतील, तर त्याच कोट्यातील अन्य तिकिटे रद्द व्हावी लागतात.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आर्ची-परशा निवडणूक आयोगाचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर

तरुण ाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या 'सैराट' सिनेमातील आर्ची-परशा आता निवडणूक आयोगाचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर झाले आहेत. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये मतदानासाठी मतदारांना आवाहन करताना ते बॅनरवर दिसतील.

निवडणूक आयोगाचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर झाल्याने आर्ची-परशा म्हणजे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर पुन्हा बॅनरवर झळकले आहेत. पण यावेळी ते चित्रपटासाठी नाही तर मतदानासा ठी मतदारांना आवाहन करताना दिसून येतील. आर्ची-परशाला ब्रॅण्ड अॅम्बेसिडर करण्यासाठी 'सैराट' चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी मंजुरी दिल्याचं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी ही कधीच समाधानकारक राहिलेली नाही. म्हणूनच महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. न वीन मतदारांमध्ये तरुणांची संख्या वाढती आहे. आर्ची आणि परशाला अॅम्बेसिडर करून या तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. राज्यात ८.३४ कोटी मतदार आहेत. त्यापैकी १२.१६ लाख नोंदणीकृत मतदार आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मुंबईतील पाच स्टेशनांचा होणार कायापालट

मुंबईतील सर्वच रेल्वे स्टेशनांवर सुरू असलेली कामं प्रवाशांचं लक्ष वेधून घेत असतानाच, इथल्या पाच स्टेशन� �ंचा चेहरामोहराच बदलून टाकण्याचा 'चमत्कार' आता रेल्वेमंत्री सुरेश प्रभू करणार आहेत. देशातील २३ प्रमुख स्टेशनांचा कायापालट करण्यासाठी खासगी कंपन्यांशी करार करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला आहे. त्या अंतर्गत, मुंबई सेंट्रल, वांद्रे, बोरीवली, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि ठाणे ही स्थानकं चकाचक-टकाटक होणार आहेत.

देशातील ४४ स्टेशनांचं नूतनीकरण करण्याच्या प्रस्तावाला क� �ंद्र सरकारने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात मंजुरी दिली होती. परंतु, या कामासाठी खासगी कंपन्यांनी फारसा उत्साह न दाखवल्यानं हा प्रस्ताव कागदावरच राहिला होता.

 शेवटी, गुजरात सरकार आणि रेल्वेनंच गांधीनगर स्टेशनच्या विकासाचं काम काही दिवसांपूर्वी सुरू केलं होतं. परंतु, आता २३ स्टेशनांच्या नूतनीकरणाच्या कामासाठी खासगी कंपन्या पुढे आल्याचं कळतं. भोपाळजवळच्या हबीबगंज स्टे� ��नपासून ही 'कायापालट मोहीम' लवकरच सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कामाला हिरवा झेंडा दाखवतील, असं समजतं.

रेल्वे स्टेशनांच्या नूतनीकरणासाठी सुमारे ४ हजार कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज असून रेल्वेला विकासकांकडून साधारण ४ हजार कोटींचे अग्रीम शुल्क मिळेल, असं सूत्रांनी सांगितलं. रेल्वे स्टेशन अद्ययावत करण्यासोबतच, स्टेशनलगतच्या जागेचा विकासही विकासक करू शकतात. त� �यांनी तिथे हॉटेल आणि प्रवाशांसाठी अन्य सुविधा उपलब्ध करून देणं अपेक्षित आहे. ४५ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर हे स्टेशन विकासकांना दिलं जाणार आहे. त्यामुळे त्यांनाही आर्थिक फायदा होईल, सरकारलाही पैसे मिळतील आणि प्रवाशांची उत्तम सोय होऊ शकेल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹कपिल देव यांचा 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांचा माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर, सुनील � �ावस्कर आणि नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या उपस्थितीत बुधवारी क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश करण्यात आला. भारतीय संघासाठी १९८३ साली विश्वचषक जिंकून देणाऱया कपिल देव यांना भारताचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जाते. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि लेजड्ंस क्लबचे अध्यक्ष माधव आपटे यांच्या हस्ते कपिल देव यांना 'हॉल ऑफ फेम'चे प्रशस्तीपत्रक देऊन सन्म� �नित करण्यात आले. कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा गाठणारे पहिले फलंदाज सुनील गावस्कर यांचाही प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. गावस्कर यांचा याआधीच ११ जुलै २०१३ साली क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश करण्यात आला आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अमिताभ बच्चन यांच्या हस्ते भावना सोमय्या यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांन� �� सिनेसमीक्षक आणि लेखिका भावना सोमय्या यांच्या 'वन्स अपॉन टाइम इन इंडिया' या पुस्तकाचे प्रकाशन केले. या पुस्तकात जुन्या सिनेमांचे नावाजलेले संवाद, काही न माहित असलेले मजेशीर किस्से सांगण्यात आले आहेत. भावना सोमय्या यांनी आतापर्यंत १२ पुस्तके लिहिली असून त्यात हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन यांच्या चरित्राचाही समावेश आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹जर्मन पासपोर्ट सर्वांत शक्तिशाली
भारतीय पासपोर्ट ७८व्या क्रमांकावर

जगभरातील पासपोर्टची क्रमवारी करणाऱ्या आर्टन कॅपिटलच्या 'पासपोर्ट निर्देशांका'च्या नव्या आवृत्तीत जर्मन पासपोर्टने पहिले स्थान पटकावले आहे. भारतीय पासपोर्ट ७८ व्या क्रमांकावर आहे.

या पद्धतीमध्ये जगभरातील पासपोर्टची माहिती संकलित केली जाते, ती दर्शवली जाते आणि पासपोर्टच्या प्रभावीपणानुसार त्यास क्रमवारी दिली जाते; तसेच पासपोर्ट� ��ारकाला किती देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश करता येऊ शकतो किंवा देशात प्रवेश केल्यावर व्हिसा घेता येतो (व्हिसा ऑन अरायव्हल) त्यानुसार संबंधित पासपोर्टला 'व्हिसा-फ्री स्कोअर' दिला जातो. जर्मनीचा व्हिसा स्कोअर सर्वाधिक १५७ आहे, तर १५६ स्कोअर नोंदवून सिंगापूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा स्कोअर ४६ असून, चीन व पाकिस्तान अनुक्रमे ५८ व ९४व्या स्थानावर आहेत. केवळ २३ स्कोअर मिळ� �लेला अफगाणिस्तानचा पासपोर्ट सर्वांत कमी प्रभावी आहे.

नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 'वर्ल्ड ओपननेस स्कोअर'मार्फत (डब्लूओएस) जगभरात कोठेही जाण्याच्या स्वातंत्र्याचा मागोवा घेतला जातो. गेल्या वर्षी हा स्कोअर १७ हजार ९२५ होता, तर यंदा पहिल्याच महिन्यात तो १७ हजार ९४८ झाला आहे.

थोडक्यात स्थान हुकले

येत्या वर्षभरातील वाढीचा अंदाज घेता, भारताचा समावेश जगातील सहा प्रम� ��ख देशांमध्ये करण्यात आला आहे. भारतात केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीच्या प्रमाणात मात्र घट झाली आहे. पीडब्लूसीने जाहीर केलेल्या वार्षिक जागतिक सीईओ पाहणीमध्ये हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. वाढीच्या दृष्टीने सर्वांत आघाडीवर अमेरिका आहे, तर त्यानंतर चीन, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, जपान व भारत यांचा क्रमांक लागतो. गेल्या वर्षी भारताला पहिल्या पाचांमध्ये स्थान मिळाले होते. यंदा ते थोडक� �यासाठी हुकले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹विदर्भातील शेळीपालकांसाठी शासनपुरस्कृत शेळीबाजार

मटणाचे भाव गगनाला मात्र शेळीपालकांचे पोट खपाटीला, हे चित्र पालटण्यासाठी विदर्भात प्रथमच शेळीबाजार व शेळी संशोधन केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाच्या पशूसंवर्धन विभागातर्फे प्रस्तावित हा शेळीबाजार अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम ठरणार असून विदर्भातील शेळीपालकांना दिलासा मिळण्याचा दावा केला जातो.

मांसाहारींमध्ये प्रथम क्रमांकाची पसंती असणाऱ्या मटणाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच मासे व ब्रॉयलर कोंबडी तुलनेत स्वस्त असूनही त्याकडे न फि रकता हा वर्ग ५०० रुपये किलोच्या मटणास प्राधान्य देतो. असे बाजारातील चित्र आहे. मटणाची वाढती मागणी असूनही शेळीपालकांना मात्र या गरम बाजाराचा पुरेसा लाभ मिळत नाही. ठोक विक्रेते १५० रुपये किलोने बोकड किंवा शेळी � ��िकत घेतात. शेळीपालक शेतकऱ्यांकडे गावातच विकण्याचा दुसरा पर्याय नसल्याने दलाल किंवा थेट खरेदी करणाऱ्या खाटकालाच शेळी विक्री करतो. हाच दलाल १५० रुपयात खरेदी केलेली शेळी २०० ते २५० रुपये दराने कत्तलखान्याकडे देतो. गावातच बाजार असल्यास शेळीला चांगला भाव मिळू शकतो, हे सर्वच मान्य करतात. सध्या विदर्भात टेंभूर्णा (चंद्रपूर) व पोथरा (अमरावती) येथेच पारंपरिक शेळीबाजार भरतो. कत्तलखा न्याशी संपर्क असणारे दलाल येथेच मोठय़ा प्रमाणात खरेदीस येतात, पण उर्वरित विदर्भात गावपातळीवरच शेळी विक्री होत असल्याने शेळीपालकांना अपेक्षित भाव मिळत नाही.

याच पाश्र्वभूमीवर शेळीबाजाराची प्रेरणा मिळाली तरी अडचणी होत्या. कारण, शासन शेळीबाजार कसा भरविणार, हा अडचणीचा प्रश्न उभा राहिला. शेळीपालकांची संघटना नाही म्हणून पशूसंवर्धन विभागाने जिल्ह्य़ातील शेळीपालकांची माहिती गोळा केली. एकूण २२० सदस्य मिळाले. 'गोट फोर्मिग' करणारे प्रामुख्याने समुद्रपूर व हिंगणघाट तालुक्यात आहेत. उर्वरित भागात प्रामुख्याने आर्वी, आष्टी, सेलू, कारंजा या तालुक्यात व्यक्तिगत शेळीपालन करणारे शेतकरी आहेत. समुद्रपूर तालुक्यातील सर्व जाम महामार्गामार्गे हैदराबादला जातात, परंतु तेही शेळीपालक सहकारी संघाचे सदस्य होण्यास तयार झाले, परंतु संस्था तयार करण्यावरच भागणार न� �्हते. या टप्प्यावर शासनाने मदतीचा हात दिला. शेळीबाजार उभा करण्यासाठी शेड, चारा, पाणी या प्राथमिक सुविधा पुरविण्याचा निर्णय झाला. वर्धा व सेलू तालुक्यातील वनखात्याची जमीन आहे. पाच एकर जागेची मागणी जिल्हाधिकारी शैलेश नवल यांच्याकडे करण्यात आली. या योजनेचे प्रेरक जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ.सतीश राजू प्रस्ताव घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्यावर प्रभावित झालेल्या जिल्हाधिका� �्यांनी स्वत: एक सूचना मांडली. केवळ शेतीबाजार स्थापन न करता संशोधन केंद्रही तयार करा. सूचना करतांनाच निधी उपलब्ध करून देण्याची खात्रीही दिली. शेळीबाजाराबाबत बोलतांना डॉ.राजू म्हणाले की, विदर्भभरातील शेळीपालकांना या बाजारामुळे फोयदाच मिळेल. संशोधन केंद्र अत्यंत उपयुक्त ठरू शकते. भरपूर मांसाचे, लवकर मोठे होणारे, शेळीपालकांचे उत्पादन वाढविणाऱ्या वातावरणपूरक प्रजाती निर्माण केल्या जाऊ शकतात. ३६ लाख रुपयांचा हा प्रस्ताव आहे, असे डॉ.सतीश राजू म्हणाले.

या अनुषंगाने पहिली समस्या चाऱ्याची होती, पण गवळाऊ गाईचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतूने पशूसंवर्धन खात्याने स्वतंत्र 'फ ोडर कॅफे टेरिया' तयार केला आहे. राज्यभरातील पशूपालकांचा प्रतिसाद मिळालेल्या चाराबागेत मोठय़ा प्रमाणात वैविध्यपूर्ण चारा पिकविला जातो. प्रस्तावित शेळीबाजारासाठी येथूनच चारा उ� �लब्ध होईल. बाजारात प्रारंभी टिनशेड तयार केले जातील. आठवडय़ातून एकदा बाजार भरेल. विदर्भभर त्याची माहिती दिली जाईल. खरेदीसाठी येणाऱ्या दलालांना हमीभाव बांधून दिला जाईल. म्हणजे, कोणताही शेळीपालक अंदाजित २०० रुपये किलोखाली विक्री करणार नाही. शेळी किंवा बोकडाच्या दर्जानुसार जास्तही भाव मिळू शकेल, अशी अपेक्षा ठेवण्यात येते.

 शेळीपालकास प्रारंभी तीन महिनेच बकरीचे पिल्लू जपावे � �ागते. त्यानंतर फोरसा धोका उद्भवत नाही. त्यामुळे या तीन महिन्यात येणाऱ्या रोगराईवर त्वरित उपचार करण्यासाठी पुरेशी व्यवस्था करण्याची पशूसंवर्धन खात्याने खात्री दिली आहे. या प्रस्तावाच्या अंमलबजावणीनंतर कत्तलखान्याचाही विचार होणार आहे. या शेळीबाजारातील दलालामार्फ त होणाऱ्या खरेदीखेरीज हैदराबादच्या कत्तलखान्यात थेट पुरवठा करण्याचाही विचार होत आहे, परंतु तोपर्यंत या बा� �ारात किमान दोन ट्रक भरून शेळी विक्री होऊ शकेल, अशी जुळवाजुळव शेळीपालकांमार्फ त केली जाईल. गावात ३ हजारात खपणारी शेळी, बाजार सुरू झाल्यास ६ हजारापर्यंत विकली जाण्याची खात्री दिली जाते. तसे झाले तर मटणावर ताव मारणाऱ्या खाद्यप्रेमींप्रमाणेच शेळीपालकांनाही उत्पन्नाचा आनंद मिळेल, अशी प्रतिक्रिया सुरेशराव गेडाम या शेळीपालकाने दिली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ज्येष्ठ साहित्यिक, कवी पुरुष ोत्तम पाटील यांचे निधन

प्रसिद्ध साहित्यिक, ज्येष्ठ कवी आणि महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे माजी सदस्य प्रा. पुरुषोत्तम श्रीपत पाटील उपाख्य 'पुपाजी' यांच्या निधनाने धुळ्यातील साहित्य क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याची भावना मान्यवरांकडून व्यक्त केली जात आहे.

सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास येथील राहत्या घरी पाटील यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते ८९ वर्षांचे � ��ोते. साहित्यप्रेमींमध्ये 'पुपाजी' म्हणून ते प्रसिद्ध होते. मंगळवारी देवपूर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 नवसाहित्यिकांसाठी प्रेरणास्थान असलेले पाटील यांचे अनेक कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. पाटील यांचा जन्म ३ मार्च १९२८ रोजी जळगाव जिल्ह्यातील बहादरपूर (ता.पारोळा) येथे मामांच्या घरी झाला. त्यांचे मूळ गाव ढेकू (अमळनेर, जिल्हा जळगाव) हे आहे. स� �तवीपर्यंत बहादरपूरला शिक्षण घेतल्यावर अमळनेरच्या प्रताप हायस्कूलमधून १९४६ मध्ये मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे ते पुण्याला गेले. फग्र्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर त्यांच्या कविता 'सत्यकथा'मधून प्रकाशित होऊ लागल्या. त्यांनी पुढे 'जनशक्ती'मध्ये उपसंपादक म्हणून काम केले. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील चिंचोली, हातेड येथील विद्यालयांमध्ये मुख्याध्यापकाची जब� �बदारी सांभाळली. कला शाखेची पदवी घेतल्यावर १९६१ मध्ये धुळे येथील श्रीशिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९४७ पासून काव्यलेखन करणाऱ्या पाटील यांचा पहिला काव्यसंग्रह 'तळ्यातल्या सावल्या' १९७८ मध्ये प्रकाशित झाला. त्यास राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. 'अनुष्टुभ' या नियतकालिकाचे संपादक म्हणून त्यांनी साडेपाच वर्षे काम केल� �. कवितेसाठी वाहिलेले 'कवितारती' हे द्वैमासिक त्यांनी १९८५ मध्ये सुरू केले. ते आजतागायत सुरू आहे. अनेक वर्तमानपत्रांमधून त्यांनी साहित्यिक व सामाजिक विषयांवर लेखन केले. 'तुकारामाची काठी' आणि निवडक मराठी कवितांचे मर्म उलगडून दाखविणारे 'अमृताच्या ओळी' ही त्यांची दोन पुस्तके अशा सदर लेखनांचा संग्रह आहेत.

 अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व स� �स्कृती मंडळ यांचे ते सदस्य होते. १९८५ मध्ये प्रजासत्ताकदिनी झालेल्या अखिल भारतीय बहुभाषिक कविसंमेलनात त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे ते सदस्य होते.

 धुळ्यातील एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक असताना त्यांनी युवा साहित्यिकांना प्रेरणा दिली. कवी बा. भ. बोरकर, वि. स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काम � �ेले. विं. दा. करंदीकर, रणजित देसाई आदी साहित्यिकांसोबत त्यांचे स्नेहाचे संबंध होते. कवी कुसुमाग्रज हे त्यांचे प्रेरणास्थान होते. साहित्य क्षेत्रात धुळ्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या अशा ज्येष्ठ साहित्यिकाच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹दिल्लीचे पोलीस प्रमुख अलोक वर्मा नवे सीबीआय प्रमुख

26 जानेवारीला स्वीकारणार पदभार, नियुक्तीवरू� � प्रशांत भूषण यांनी दाखल केली होती याचिका,

सीबीआय प्रमुख म्हणून दिल्लीचे आयुक्त अलोक वर्मा यांची निवड करण्यात आली आहे. 26 जानेवारी रोजी ते पदभार स्वीकारणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. प्रभारी प्रमुख राकेश आस्थाना यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेत प्रशांत भूषण यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

सोमवारी सीबीआय प्रमुख नियुक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेख� �ली बैठक घेण्यात आली होती. परंतु त्या बैठकीतही कोण संचालक होणार यावर ठोस निर्णय घेण्यात आला नव्हता. 2 डिसेंबरला अनिल सिन्हा यांच्या निवृत्तीनंतर गुजरात केडरचे आयपीएस राकेश आस्थान हे प्रभारी संचालक म्हणून काम पाहात आहेत.

नवीन संचालकांची निवड पंतप्रधान, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, सरन्यायाधीश जे. एस. खेहार यांची समिती करणार होती. यासाठी सुमारे 45 अधिकाऱयांच्या नावाची यादी पंतप्रधान कार्यालयास पाठवण्यात आली होती. यामध्ये दिल्लीचे पोलीस आयुक्त अलोककुमार वर्मा, अरूण बहुगुणा, एस. सी. माथुर आणि कृष्णा चौधरी यांची नावे आघाडीवर होती. यातून अलोक वर्मा यांच्या नावावर एकमत झाल्याचे सुत्रांनी सांगितले. वर्मा 26 जानेवारी रोजी पदभार स्वीकारणार असल्याचेही सांगण्यात आले.

गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी असलेल्या राकेश आस्थाना यांची प्रभारी संचालक म्ह� ��ून नियुक्ती करण्यात आली होती. परंतु त्यावर ऍड. प्रशांत भूषण यांनी न्यायालयात धाव घेतली होती. सीबीआय डायरेक्टरची नियुक्ती पंतप्रधान, विरोधी पक्ष नेता आणि सरन्यायाधीश यांची समिती करत असते. परंतु सरकारने या नियमाचा भंग करत आस्थाना यांची नियुक्ती केल्याचा भूषण यांचा आक्षेप होता. सरकार सीबीआय प्रमुख नियुक्तीमध्ये मनमानी करत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. याबाबतच्या याचिकेव� � 20 रोजी सुनावणी होणार आहे. त्याआधी न्यायालयाच्या आदेशानुसार ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सोमवारी याबाबत कॉलेजियमची बैठक होणार असल्याचे सांगितले होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹व्हेनेझुएलाने चलनात आणल्या नव्या नोटा

गगनाला भिडलेल्या चलन फुगवट्याच्या समस्येचा सामना करणाऱ्या व्हेनेझुएलाने नव्या नोटा चलनात आणल्या आहेत. नव्या नोटा मिळविण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा एट ीएम आणि बँकांसमोर दिसून येत आहेत.

भारताच्या पावलावर पाऊल ठेवून व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांनी गेल्या महिन्यात १00 बोलिव्हरची नोट चलनातून रद्द केली होती. त्याजागी ५00 आणि २0 हजार बोलिव्हरच्या नोटा आणण्याची घोषणा केली होती. त्यानुसार नव्या नोटा चलनात आण्यात आल्या आहेत. आकड्यामागे अनेक शून्य असलेल्या नोटा पाहून नागरिक हैराण झाले आहेत. व्हेनेझुएलातील महागाई� ��ा दर तीन अंकी आहे. विदेशी चलन साठा कमालीचा घसरला आहे. त्यामुळे खाद्य वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे. मोठ्या रकमेच्या नोटा व्हेनेझुएलाला फार काळ दिलासा देतील, असे जाणकारांना वाटत
नाही.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹गुंतवणुकीत भारताच्या स्थानात घसरण

पहिल्या पाच देशांतून बाहेर : अमेरिकेकडे ओघ वाढला

गेल्या तीन वर्षात भारतात गुंतवणूक करण्यासाठी विदेशी उद्योजक आकर्षिले जात होते. मात्र आता या गुंतवणूकदारांचे आकर्षक भारताप्रति कमी झाले आहे. गेल्या वर्षापर्यंत गुंतवणुकीच्या बाबतीत पाचव्या स्थानावर असलेला भारत आता सहाव्या स्थानावर घसरलेला आहे, असे पीडब्ल्यूसी य� �� जागतिक पातळीवरील सल्लागार संस्थेने म्हटले आहे.

पीडब्ल्यूसी संस्थेच्या अहवालानुसार आंतरराष्ट्रीय सीईओ सर्व्हेक्षणाच्या अनुसार, वृद्धीच्या बाबतीत अमेरिका प्रथम स्थानी आहे. अमेरिकेला 43 टक्के सीईओंनी प्रथम स्थान दिले असून चीन 33 टक्क्यांसह दुसऱया स्थानी आहे. यानंतर जर्मनी, ब्रिटन आणि जपान या देशांचा क्रमांक लागतो. भारत सहाव्या स्थानी घसरला आहे. गेल्या वर्षी याच सर्व्हेमध ्ये भविष्यातील शक्यतांबाबत भारत पाचव्या स्थानी होता. गेल्या काही महिन्यात मुख्य कार्यकार अधिकाऱयांचा भारताच्या बाबतीत काही प्रमाणात उत्साहामध्ये कमी आली आहे. या मागील मुख्य कारण भारताकडून सुधारणा करण्यासाठी वेळकाढू धोरणाचा अवलंब केला जात आहे. याचप्रमाणे दोन महिन्यापूर्वी नोटाबंदी करण्यात आल्याने अल्पकालीन समस्या उद्भवल्या आहेत. या बाबींव्यतिरिक्त भारत आपला विकास आण� � आर्थिक सुधारणांसाठी वेगळी ओळख कायम ठेऊन आहे, असे म्हणण्यात आले.

बाजारात होणाऱया बदलांमुळे देशाच्या चलनामध्ये चढ-उतार होत असतात. यामुळेच कंपन्यांची सीईओ विभिन्न देशांकडे वळत आहेत. या वर्षी गुंतवणूकदारांनी अमेरिका, जर्मनी आणि ब्रिटन या देशांना प्राधान्य दिले आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत भारत, ब्राझील आणि अर्जेंटिना या देशांचे आकर्षण कमी झाले आहे.

चालू घडामोडी:-
स्पष्टीकरणा सहित उत्तरे:-
---------------------------------------------
१) डोनाल्ड ट्रम्प:-
• रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प याने पुरेशा फरकाने अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली (२८९ विरुद्ध २१८)
• त्यानी १९६८ मध्ये पेन्सिलवेनिया विद्यापीठाची अर्थशास्त्राची पदवी प्राप्त केली आहे
• १४ जून १९४६ रोजी जन्म  झालेले ट्रम्प हे आतापर्यंत अध्यक्ष पद धारणकरणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहेत (वय ७० वर्ष) या अगोदर रोनाल्ड रीगन ६९ वर्ष ११ महिने असताना राष्ट्रपती झाले होते
• ते अमेरिकेचे ४५  वे अध्यक्ष आहेत

२) जुआन मॅन्युएल सँटोस:-
*  हे कोलंबियाचे अध्यक्ष आहे (२०१० मध्ये सँटोस यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली)
* कोलंबिया येथील फार्क बंदखोराच्या संघटनेमधील यादवी युद्ध संपूष्टाट आणण्यासाठी जुआन मॅन्युएल सँटोस यांना २०१६ सालचा ' शांततेचा' नोबेल पारितोषिक  जाहीर झाला

३) जोड्या लावा उत्तरे
• रजत चौहान – तिरंदाजी
• सुब्रता पॉल – फुटबॉल
• शिवा थापा – बॉक्सिंग
• व्ही आर रघुनाथ – हॉकी

४) पी.व्ही.सिंधू:-
• पी.व्ही.सिंधू ही ऑलिम्पिक मध्ये रौप्य पदक जिंकून देणारी पहिली महिला ठरली
• साक्षी मलिक ही कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे
• साक्षी मलिक ही भारतीयामधून ऑलिम्पिक पदक जिंकणारी पाचवी महिला खेळाडू आह
• पी.व्ही.सिंधू ही भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारी सर्वात लहान वयाची खेळाडू ठरली आहे(वय २१ वर्ष)

५) देवेंद्र झाझरिया:-
• त्याने पॅरा लिम्पिकमध्ये, २०१६ मध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले
• त्यानी पॅरा लिम्पिकमध्ये, २००४ मध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले
• त्यानी २००४ मध्ये अर्जुन पुरस्कार प्राप्त केला (२०१२ साली त्याला पद्मश्री हा किताबही देण्यात आला होता)

६)  कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा २०१६:-
• सर्वात जुनी स्पर्धा आहे (१९१६)
• विजेता(२०१६):- चिली .उपविजेता :-अर्जेंटिना
• गोल्डन बॉल – अॅ१लेक्सिस सांचेझ (३ गोल)
• गोल्डन बूट – एडुआडरे व्हॅर्गास (६ गोल)
• गोल्डन ग्लोज – क्लाउडीओ ब्राव्हो

७) जोड्या लावा ;-
पद्म विभूषण - अविनाश दीक्षित
• पद्म भूषण - राम वी सुतार
• पद्मश्री - मधुर भंडारकर
• रामानुजन पुरस्कार - अमलेंदु कृष्णा

८) कमाॅव्ह;- २२६ टी :-
• नुकताच भारत आणि रशियाने कमाॅव्ह;- २२६ टी हेलिकॉप्टर सयुक्तपणे उत्पादित करण्याचा करार केला आहे (रशियाची  रोस्टेक कंपनी द्वारा कामोव हेलीकॉप्टर ची निर्मिती भारतात एचएएल हिन्दुिस्ताषन एयरोनॉटिक्सा लिमिटेड... द्वारे केली जाणार आहे )
• कमाॅव्ह;- २२६ टी ही चित्ता आणि चेतक हेलिकॉप्टर जागा घेतील
• कमाॅव्ह हे दोन इंजिन असलेले लहान हेलिकॉप्टर आहे

९) बिमस्टेक (द बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अॅोन्ड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन) या सात राष्ट्रांच्या संघटनामध्ये भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार, थायलंड श्रीलंकेया देशांचा समावेश आहे दक्षिण आणि पूर्व या आशियाई खंडाना एकत्र आणणारी ही संघटना आहे . या संघटनेच्या सर्व सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांना गो� ��्यातील ब्रिक्स परीषदेसाठी निमत्रीत करण्यात आले होते

१०) नीती आयोगाने नुकतीच कृषी व्यापार आणि शेतकरी मैत्री सुधारणा सूची (दर्शक) तयार केली आहे. कोणत्या राज्याने विविध सुधारणांच्या अमलबजावणीमध्ये प्रथमच स्थान प्राप्त केले आहे :-महाराष्ट्र

११) बराक ओबामा यांची पुस्तके:-
• आत्मचरित्र :-ड्रीम्स फ्रॉम माय फादर (Dreams from My Father)
• द ऑडासिटी ऑफ होप (The Audacity of Hope) हे पुस्तक २००६ मध्ये प्रकाशित झाले
• पुस्तका  वर  आधारित आडियो बुक  ला २००८ मध्ये प्रतिष्ठित ग्रैमी पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले होते

१२) बराक ८:-
* डी.आर.डी.ओ आणि इस्राईल यांनी विकसित केलेले अत्याधुनिक क्षेपणास्त्र
* बराक ८ हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे लांब पल्याचे क्षेपणास्त्र आहे
* माऱ्याचा पल्ला:- ६० ते ८० कि.मी
* वेग:- २ मॅच(प्रती सेंकद १ किमी)
* सरक्षणदलाची सवेंदलशील आस्थापने व गर्दीच्या शहरांच्या हवाई सरक्षनासाठी प्रभावी

१३) कैलास सत्यार्थी:-
• त्यांचा जन्म ११ जानेवारी १९५४ रोजी मध्यप्रदेशमध्ये विदिशा या गावी झाला
• त्यानी इलेक्ट्रिक इंजिनिअरींग पदवी प्राप्त केली
• त्यानी बचपन बचाओ आंदोलना ची स्थापना केली
• त्यानी ग्लोबलमार्च अगेन्स्ट चाईल्ड लेबरचे नेतृत्व केले

१४) भारताच्या कोणत्या राज्यामध्ये पहिल्या मेरीटाईम इंडिया परिषदेचे आयोजन करण्यात आले:-महाराष्ट्र
(मुंबईतील गोरेगाव येथील बॉम्बे कन्व्हेंशन ॲन्ड एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित पहिली  मेरीटाईम इंडिया परिषद 14 एप्रिल 2016 रोजी आयोजित केली होती. कोरिया हा देश सहयोगी आयोजक असणाऱ्या या तीन दिवसीय परिषदेत जगातील 40 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.)

१५) १ एप्रिल २०१६ रोजी महाराष्ट्र शासनाने कोणतीयोजना सुरु केली? :-माझी कन्या